Wednesday, May 29, 2013

O2 ऑक्सिजन

1.
काळे ढग दाटले,म्हणून पाऊस येईलच असे नाही।
स्वप्नातली फुले आयुष्यात उमलतीलच असे नाही.....................
.हां ती फुले अंतरंगाला मात्र सुगंधित करतील।।(ऑक्सिजन)@भक्ती

2
पुन्हा पुन्हा घोँगावत वादळ,
मनातल्या घरात कल्लोळ
........... पंखात विश्वासाचे बळ.....परत भरारी!
(ऑक्सिजन)@भक्ती

3.
मोङला ङाव कोणी,
विचारे ङोळ्यातले पाणी
...........वेङया राधा-कृष्णाची'ही' अधुरी कहाणी।।(O2)@भक्ती

4.

सुख-दुःखाची लाट कधी मोती नेती,हाती खडे देती।
घर वाहून नेताना,पायाखालची घेऊन जाते रेती
............लाटांना भिऊन किनारेही नाही लाभती।।
(O2)@भक्ती

5.

जीव हजारो वाटा धुंडाळतो,खरा मार्ग ना मिळतो
कधी पत्ता चुकीचा,कधी पत्ता सांगणारा चुकीचा असतो।
..............पण पाय अजुन चालते आहेत तेव्हा जीव नाही दमतो।।(O2)@Bhakti

6. 
खचत इवल मन
कुठेतरी पोकळी
दोन मुठभर व्यापुन
राहू दे माती कोवळी

भक्ती

 (O2)@Bhakti

7. 

निभावत येत जीवन
कुंपणाच्या आत तीन दगड मांडुन
चार नात्यात रमुन
सापडत जीवन
कुंपणाच्या बाहेर ठेचाळुन
त्या रक्ताचा मळवट भरुन।।
गाता येत गाणं
स ला स जोडुन
मान डोलवुन
बहरत गाणं
दिलाच्या हाकेतुन
बोलक्या डोळ्यांच्या भाषेतुन।।
भक्ती
(O2)

No comments: