फलाफल
काहीतरी चुरचुरीत खायची इच्छा होती.खुप दिवस अख्खे हिरवे मूग वापरून रेसिपी झाली नव्हती.
रात्री दीड वाटी हिरवे मूग ,एक वाटी हरभरा डाळ,अर्धी वाटी तांदूळ आणि अर्धा चमचा मेथ्या एकत्र भिजवलेल्या.सकाळी जिरे, आलं तुकडा,दोन मिरच्या टाकून मिक्सरमधून भिजलेल्या डाळी जाडसर वाटून घेतल्या.
आता कांदा आणि कोथिंबीर चॉपरमधून बारीक केले.वाटलेल्या मिश्रणात चिरलेला कांदा, कोंथिबीर,धनेपूड,एक चमचा तिखट, स्वादानुसार मीठ घातलं.
छानपैकी मध्यम आकारात थापून खरपूस तळून घेतले.नुसत्या दह्याबरोबर खात आस्वाद घेतला.
नंतर परदेशी स्थायिक मैत्रिणीने सांगितले की मागची मूग-हरभराडाळ वडे म्हणजे फलाफलसारखीच रेसिपी आहे.तेव्हा थोडं फलाफल विषयी शोधलं तर त्यात हरभरा डाळीऐवजी काबूली चणा किंवा हरभरे वापरतात हे समजलं. लगेच तीसुद्धा परत करून पाहिले.रेसिपी मागच्या सारखीच.
नंतर एका मैत्रिणीने सांगितले श्राद्धासाठी असेच डाळी धुवून वाळवून त्याची भरड करून वडे करतात ते भरड वडे.
-भक्ती


No comments:
Post a Comment