Sunday, August 25, 2024

कृष्ण निळा निळा

 


कृष्ण निळा निळा

बासुरीचा लावितो लळा..


कृष्ण(विष्णू )का तो निळा आहे? कोणी म्हणतो कालिया नागाच्या विषामुळे तो निळा झाला.कोणी म्हणे तो सागरात राहतो

पण कृष्णच काय,रामही निळा होता.एवढचं‌ काय तर पहिल्या वनवासानंतर आणि महाभारतानंतर पांडव जेव्हा पुन्हा वानप्रस्थाश्रमाला निघाले.तेव्हा युद्धिष्ठिरही निळा होत गेला.तो तर देवही नव्हता?


आता हे सर्व आपल्याला असे समजते तर या गोष्टींवरून काढलेल्या चित्रांमुळे,हो पण सर्व निळे का?


ते सर्वज्ञ होते.सर्व गोष्टींचे ज्ञान सुख -दु:खाच्या पलीकडे ते गेले ,स्वधर्माची संपूर्ण जाणीव झाली.त्यांनी स्वतःमध्ये ते ज्ञान सामावून घेतले.त्यांच्या ज्ञानाची सीमा आकाशाप्रमाणे,सागराच्या तळाप्रमाणे थांग न लागणारी होती.म्हणून निळ्या नभासम ते निळे 🩵 युद्धिष्ठिरला धर्माचे, स्वत्वाचे संपूर्ण ज्ञान झाल्याने तोही निळा जाहला.


एक विज्ञान शिक्षिका असल्याने जरा ,ध्यानभंग करते😄

आकाश सगळ्या रंगांची फ्रेक्वेन्सी अबसॉर्ब करतो फक्त निळ्या रंगाची नाही,निळा रंग त्याचा काही कामाचा नाही म्हणून त्याला निळा नकोय,तरी तो आपल्यासाठी निळा😄.

सूर्यप्रकाश पृथ्वीच्या वातावरणात पोहोचतो आणि हवेतील सर्व वायू आणि कणांद्वारे सर्व दिशांना विखुरला जातो. निळा प्रकाश इतर रंगांपेक्षा जास्त विखुरलेला आहे कारण तो लहान, लहान लहरी म्हणून प्रवास करतो. त्यामुळेच आपल्याला बहुतेक वेळा निळे आकाश दिसते.

वसंत बापट यांची या निळ्या रंगावर एक अफलातून कविता / गीत आहे . त्यांनाही समजलं अंतरंग निळा म्हणून तो निळा😊


देव माझा निळानिळा | 


देव माझा निळानिळा, डोळे माझे निळे

माझा समुद्रही निळा, आभाळही निळे


श्रावणाच्या खुळ्या धारा आल्या तशा गेल्या

तेव्हा ओल्या उन्हातून मोर आले निळे


आश्विनात आठ दिशा निळ्यानिळ्या झाल्या

नदीकाठी लव्हाळ्यांना तुरे आले निळे


फूलवेड्या वसंताची चाहूल लागली

निळ्यानिळ्या फुलांवरी पाखरू ये निळे


कशी बाई सावळ्याची जादू अशी निळी?

श्रीरंगही निळे आणि अंतरंग निळे


गीतकार-वसंत बापट

 

-भक्ती

No comments: