Tuesday, July 30, 2024

हरभरा डाळ इडली

 #केरळीफूड

#मोरमिलागाई 

#ताकातलीमिरची

-हरभरा डाळ इडली



इडली करण्यासाठी दीड वाटी हरभरा डाळ आणि दोन वाटी तांदूळ रात्री भिजत ठेवले.उडीद डाळ अजिबात वापरली नाही. दीड डाळीशिवाय इडली कशी होईल उत्सुकता होती.

सकाळी मिश्रण वाटून घेऊन बाजूला ठेवलं.संध्याकाळी घरी आल्यावर पाहिलं तर पिवळसर मिश्रणाला पिवळसर रंग आला.नेहमी पांढरं फटक मिश्रण पाहायची सवय असलेल्या घरी सगळ्यांना वाटलं मिश्रण खराब झालं 😄.

मी म्हटलं कूल डाऊन 😄 हरभराडाळीचा रंग उतरला आहे.चवीपुरते मीठ,चिमूटभर सोडा घातला.

मस्त इडली पात्रात इडल्या लावल्या.मस्त टम्म फुगल्या.रंगही फिकट पिवळा जसं बागेतलं एखादं फुलच 😊 आता या फुलाबरोबर हिरवी पानं नको का😂 मग दोन चमचे उडीद डाळ,हिरव्या मिरच्या,जिरे,तीळ,कडीपत्त्यासह कमी तेलात परतली.साखर व ओल्या खोबऱ्यासह मिक्सरमधून चटणी पाणी टाकून बारीक वाटली.दह्यात मिक्स केली.



फोडणीसाठी तेलात मोहरी आणि केरळी मोर मिलागाई  म्हणजे ताकातल्या वाळवलेल्या मिरच्या चांगल्या तळल्या.चटणीला चरचरीत फोडणी दिली.

या ताकातल्या मिरच्यांची चव तिखट ही तरीही सुसह्य मस्तच होती‌.

याच मिरच्या तळून भाताबरोबर,उपम्यात वापरू शकतो.

Saturday, July 27, 2024

केरळी स्टाईल गव्हाचा हलवा

 #केरळाफूड 

#गव्हाचा हलवा






केरळ फुड सिरीज मध्ये आता पुढचा केरळी पदार्थ आहे गव्हाचा हलवा!

 तसं पाहिलं त्याला गव्हाची आपण बर्फी सुद्धा म्हणू शकतो कारण की हे खाताना आपण वड्या पाडून खात असतो‌. तर पाहूया याची कृती आणि साहित्य.


अगदी कमीत कमी साहित्यात आपण तयार करणार आहोत. ते म्हणजे आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ, एक वाटी गुळ, इलायची सुंठ पावडर, ड्रायफूट पावडर.


पहिल्यांदा  मी इथे जरा जाडसर गव्हाचे पीठ घेतले. जे मी दाळ बट्टी साठी केल होत, तुम्ही नेहमीचेच बारीक गव्हाचे पीठ वापरू शकता.हे दोन वाट्या जे जाडसर पीठ ते कणिका सारख भिजवून घ्यायचा आहे. कणिकाचा उंडा आहे तो पूर्णपणे पाण्यामध्ये बुडेल अशाप्रकारे एका भांड्यामध्ये अर्धा तास ठेवायचा आहे. अर्ध्या तास ठेवल्यानंतर त्या कणिकाचे तंतू बाहेर पडतात. मग ते आपण अजून थोडे हाताने त्याला स्मूदन करायचं त्याला मोकळं करायचं.पाण्यातले हे जे गव्हातले तंतू आहेत त्यामध्ये ते विरघळतात किंवा त्यामध्ये तरंगतात.मग काय वेळाने ते पूर्ण सेटल झाल्यानंतर हे जे आहे त्यातलं वरवरचं पाणी दुसऱ्या भांड्यामध्ये काढायचा आहे.


 तोपर्यंत एका कढईमध्ये थोडंसं तूप टाकून किसलेला बारीक गूळ त्या पॅनमध्ये टाकायचा. त्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. हा जो पाक तयार झालाय त्याच्यामध्ये थोडी सुंठ आणि इलायची पावडरची तयार केली आहे ती टाकायची आहे. या पाकामध्ये हे गव्हाच्या पिठाचे मिश्रण(पाणी) जे आपण पाणी तयार केलेले आहे. त्यामध्ये हळूहळू ओतत जायचं आहे आणि ते सतत हलवत राहायचं आहे ढवळत राहायचं आहे त्यानंतर ते पूर्णपणे ढवळत राहिल्यानंतर हळूहळू दहा मिनिटानंतर त्याच्यामध्ये आपण ज्या प्रकारे गव्हाचा चिक आपल्याला दिसतो तशा प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये चिकटपणा दिसतो.असा हा एक गोड प्रकारचा चिकच तयार होतो. यात  आता तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स टाकू शकता. एक पंधरा मिनिटानंतर हा चिक पूर्णतः सेट होण्यासाठी तयार होतो .


आता एका चौकोनी किंवा गोल उभट भांड्यात आहे आधी तूप लावून त्यात हा गव्हाचा हलवा ट्रान्सफर करायचा आहे. भांड्यात आधी ड्रायफ्रूट्स टाकू शकता. त्यानंतर  हलवा सेट करण्यासाठी ओतल्यानंतर वरतून सुद्धा ड्रायफ्रूट टाकायचे आहेत.हा हलवा सेट व्हायला जवळपास पाच ते सहा तास लागू शकतात. तुमचं ज्या प्रकारे गुळाचा पाक जास्त तयार झालेला आहे त्यावरती किंवा तुम्ही ज्या प्रमाणात गव्हाच्या पिठाच पाणी वापरलं त्या प्रमाणात त्याला सेट व्हायला वेळ लागतो. त्यामुळे जास्त घाई न करता एक सहा तास तरी मिनिमम ठेवा. 


जर गव्हाचं पाणी जर जास्त घट्ट असेल तर तो लवकर हलवा सेट होऊ शकतो. यामध्ये अजून तो लालसर हलवा दिसावा म्हणून लाल फूड रंग सुद्धा वापरतात.

अशा प्रकारे एक छान पैकी अशी एक मऊसर स्पंजी  चिकट (भोपळ्याचा मिठाई सारखी)आणि छान मुलायमदार अशी ही बर्फी तयार होते.


कृतीसाठी युट्यूब लिंक

https://youtu.be/E8xw0iG-fwA?si=xMZzO_4M26jxaUeD


असा हा एक वेगळा पदार्थ  करायला काहीच हरकत नाही. सदा गोडधोड खाऊ या गोडगोडच बोलूया

-भक्ती



Wednesday, July 24, 2024

कृष्णाच्या गोष्टी-८

देशात धर्मसाम्राज्य निर्माण व्हावे सांस्कृतिक जीवन मूल्यांची प्रतिस्थापना व्हावी. राजमंडळाने लोककरंजनात् राजा ही त्याग पूर्ण निस्वार्थ भूमिका मान्य करून राज्य करावे ,हे कृष्ण जीवनाचे ध्येय होते. ते साध्य करण्यासाठी देशातील राज्यसंस्थांचे शुद्धीकरण हाच उपाय आहे हे कृष्ण जाणत होता. हे शुद्धीकरण दोन प्रकारांनी होण्यासारखे होते.

 एकतर भ्रष्ट राज्यसंस्थेत शिरून आपल्या आदर्श वागणुकीने तिला पुन्हा नियंत्रित व धर्मन्मुख करणे किंवा संपूर्ण तयारी शुद्ध तत्वावर आधारलेली धर्माधिष्ठित नवी राज्यसंस्था निर्माण करणे. कृष्णाच्या वेळी अनियंत्रित भ्रष्ट अधिकार व सुखभोग यांच्या अधीन झालेल्या राजसंस्थेला पुन्हा नियंत्रित आणि धर्मन्मुख करणे. हे केवळ अशक्यप्राय होते अशा स्थितीत विशुद्ध तत्वावर विश्वास असणारी नवीन राज्यसंस्था निर्माण करणे हा एकच मार्ग शिल्लक होता कोणाला हाताशी धरून आपल्या अभिप्रेत असलेली विशुद्ध राज्य संस्थान निर्माण करता येईल याचा विचार करीत असता कृष्णाचे पांडवांकडे लक्ष गेले. त्यांच्यावर अन्याय होत होता तरीही धर्माधिष्ठित मार्ग सोडायला हे संघटित नेतृत्व तयार नव्हते. त्यांच्याजवळ सामर्थ्य होते अत्यंत कष्ट करण्याची तयारी होती. अपार सत्यनिष्ठा होती व धर्माचे नियंत्रण मानण्याची स्वाभाविक प्रवृत्ती होती. राज्यावरील स्वतःचे न्याय हक्कांपासून वंचित केले जात असल्यास यांच्या नेतृत्वाला सिंहासनस्थ करणे हा एकच धर्म संस्थापनेचा उपाय आहे हे कृष्णाने ओळखले आणि आपल्या कार्याचे साधन म्हणून पांडवांचा उपयोग करून घेण्याचे ठरवले.द्रौ

*द्रौपदी  स्वयंवर



पांडव आणि आपली आत्या कोणती लाक्षागृहाच्या दाहातून खरोखरच जळून मेली असतील असे कृष्णाला वाटत नव्हते त्यांनी गुप्तपणे पांडवांचा शोध चालविला होता.आपल्या हेरांकडून कृष्णाला पांडव कुंतीसह लाक्षागृहातून निसटून गेल्याची वार्ता समजली होती. पांडव असतील तेथून स्वयंवरासाठी कांपिल्य नगरीत उपस्थित होतील याची अटकळ त्याला होती. म्हणूनच बरोबरच्या सर्व यादवांना द्वारका सोडण्यापूर्वी कृष्णाने आपण या स्वरांवरात फक्त प्रेक्षक म्हणून जात आहोत 'पण' जिंकून द्रौपदी मिळवण्यासाठी जात नाही हे स्पष्ट केले. भारत वर्षातील जवळजवळ सर्व राज्यांनी द्रौपदी स्वयंवर स्थळी गर्दी केली होती. छताशी फिरणाऱ्या लाकडी माशाचा पाच बाणात डोळा फोडण्याची अट द्रौपदीला जिंकण्यासाठी ठेवली होती. शिशुपाल, जरासंध, दुर्योधन, कर्ण सगळ्यांचे प्रयत्न विफल झाले. यादवांपैकी कोणी उठणारच नव्हते.

कृष्णाने ब्राह्मण वेशातील पांडवांना चटकन ओळखले‌ त्यात अलौकिक दैवी वगैरे असा काही भाग नव्हता. सर्वसाधारण माणसापेक्षा कृष्णाची बुद्धी दृष्टी कितीतरी तीक्ष्ण होती ,आधुनिक भाषेत त्याचा 'बुद्ध्यांक' कितीतरी जास्त होता. जमलेले ख्यातमान धनुर्धर राजे 'पण' जिंकण्यात हतप्रभ ठरल्यानंतर ब्राह्मण वृंदातून एक तरुण उभा राहिला आणि त्याने युवराज दुष्टदुम्नजवळ मत्स्य यंत्र भेदण्याची अनुज्ञा घेतली. त्यांना असे उद्गार काढले की "ती परीक्षा कौशल्याची होती. त्यामुळे 'पण' जिंकण्याचा प्रयत्न कोणी केला अगदी ब्राह्मण काय वैश्य काय शूद्रानेही केला आणि पण जिंकला तरी आपली बहीण  त्याला माला घालेल हे आव्हान विलक्षण होते.

तिथे ठेवलेल्या धनुष्याला सहज त्याने प्रत्यांच्या जोडली आणि मन एकाग्र करून पहिल्याच बाणाने त्यांने भेद घेतला. उपस्थित सभाजनांना याचा आनंद वाटण्याऐवजी त्यांना त्यांचा अपमान वाटला. राजमंडळाने रागाने द्रुपद आणि दृष्टधुम्न यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण पांचाल आणि त्यांच्या बाजूने उभे राहिलेले राजे तो ब्राह्मण कुमार यांनी आपल्या सामर्थ्याने त्या सर्वांचा पराभव केला.या उभ्या राहिलेल्या लढाईत त्या तरुण ब्राह्मण कुमाराच्या बाजूने आणखी चौघे ब्राह्मण कुमार उभे ठाकलेले पाहून रामकृष्णांची ती पांडव असल्याबद्दलची खात्रीच पटली. 

कृष्ण पांडव राहत असलेल्या त्यांच्या  मागेमागे जात घरात शिरून युधिष्ठिराला वंदन केले. आणि मी कृष्ण आहे असे सांगून तिथे जवळच बसलेल्या आत्याला कुंतीलाही वंदन केले. तुम्ही सारे लाक्षागृहातून वाचलात हीच सौभाग्याची गोष्ट आहे .पांचाली मुळे पांचाल आता तुमच्या पाठीशी उभे राहतीलच. पण बलाढ्य धनसंपन्न यादवीही तुमचे पाठीराखे आहेत हे सांगायला मी येथे आलो आहे. तुम्ही येथे भेटाल याची मला अटकळ होती. द्रौपदीचे पाची पांडवांशी लग्न लावून द्यायला त्याने द्रपदालाही राजी केले. यादव बल पांडवां मागे उभे राहिले तरीही विपत्तीच्या काळात नवे राज्य उभा राहण्यासाठी सर्वात अधिक धनाची आवश्यकता लागेल हे ओळखून आहेराच्या रूपाने कृष्णाने अमाप धनसंपत्ती पांडवांना दिली.पांचालाचा आणि यादवांच्या या जोरदार पाठिंबामुळे दुर्बल आणि अगदी निर्धन झालेले पांडव सबल झाले. 

ही बातमी हस्तिनापुरात पोहोचतात दुर्योधनाच्या विरोधालाही न जुमानता कुरुवृद्ध पितामह भीष्म आणि महामंत्री विदूर यांच्या सल्ल्याने राजा धृतराष्ट्राने महामंत्री विदुराला कांपिल्य नगरीला पाठवून पांडवाना त्यांच्या करवी हस्तिनापूरी बोलवून घेतले. कांपिल्य नगरी द्रौपदी स्वयंवराला पांचालावर हल्ला करण्यात दुर्योधन कौरवांचा पुढाकार होता तरी ही गोष्टी ध्यानी घेऊन पांडवांच्या रक्षणार्थ कृष्ण त्यांच्याबरोबर स्वतः हस्तिनापुरी गेला. खांडवप्रस्थचे राज्य आपण युवराज युधिष्ठिरला बहाल करीत असल्याचे धृतराष्ट्रने घोषित केले. 

यावर कृष्ण हसला त्याने युद्धिष्ठिराला राजाचे हे राज्य मान्य करण्याचे सूचना दिली. खांडवप्रस्थ पूर्वीच्या काळी कुरुंची राजधानी होती . वर्षानुवर्षे शेती ओसाड पडली होती ,सारा प्रदेश घनदाट जंगलाने व्यापलेला होता. तरी हे ओसाड गाव राज्य युधिष्ठिराला घ्यायला कृष्णाने अनुभूती दिली. कारण अविकसित प्रदेशाचा योजनाबद्ध रीतीने विकास करता येतो. "तुझ्या चुलत्याने उदार मनाने दिलेल्या या तुझ्या अर्ध्या राज्याकडे पहा. अंधराजाने हा अन्याय करावा आणि भीष्मा सारख्या कुरुवृद्धाने त्याला संमती द्यावी?. केले त्याची फळे ते भोगतीलच म्हणा !पण निराश व्हायचे कारण नाही या भकास भागाचा विकास करून त्या अंध राजाला आपण वेगळाच धडा शिकवू." 

विश्वकर्माला मग द्वारका उभारणार्‍या स्थापत्यशास्त्रज्ञाला त्वरित निमंत्रण दिले गेले. खांडवप्रस्थाची ओसाड राजधानी नव्या योजनेप्रमाणे पुन्हा उभारण्याचे काम झपाट्याने सुरू झाले. राजधानी उभारण्याच्या कामावर स्वतः कृष्णाची देखील देखरेख होती. काही दिवसातच त्या वैराण ओसाड भूमीवर उभारलेल्या नव्याने राजधानीतील उंच उंच इमारतींनी आकाश रेषा भेदून टाकल्या. कृष्णाने त्या सुंदर राजधानीचे नाव बदलून इंद्रप्रस्थ असे ठेवले. दीर्घ कालावधीत पांडवांशी त्याचे खूपच सख्य निर्माण झाले आणि विशेषतः अर्जुन त्याचा जिवाभावाचा सखा झाला. कृष्णाच्या रूपात पांचालीला एक निर्मळ प्रेमळ भाऊ मिळाला. रक्ताच्या नात्यापेक्षाही नातेपुढे अधिक सुदृढ झाली.



 *सुभद्राहरण 


-राजा रविवर्मा यांचे अर्जुन आणि सुभद्रा यांचे एक चित्र 

इंद्रप्रस्थ राहणाऱ्या पांडवांनी आपल्या सामायिक पत्नीशी वर्तनाचे नियम ठरवले होते.एकदा अर्जुनाने चोरांनी पळवलेल्या ब्राह्मणांच्या गाईंचे रक्षण करण्याच्या घाईत युधिष्ठिर आणि द्रौपदी यांच्या एकांताचा भंग केला. ठरल्याप्रमाणे अर्जुनाने तीर्थयात्रेला जायचे ठरवले. युधिष्ठिर नको नको म्हणत असतानाही त्याने आपला निर्णय बदलला नाही. या काळात आपल्या भारतभराच्या भ्रमणामध्ये त्यांनी नागकन्या उलुपी त्यानंतर चित्रांगदा यांच्याशी विवाह केला. परतीच्या प्रवासात द्वारके जवळच्या प्रभासपट्टण तिर्थावर तो आला. तिथे त्याला विशेषत्वाने सुभेद्रेची आठवण झाली. सुभद्राच्या सौंदर्याबद्दल द्रोणाचार्यांकडे धनुर्विद्या शिकत असता भेटलेल्या गद नामक सुभद्रा आणि कृष्णाच्या धाकट्या भावाकडून त्यांनी खूप ऐकले होते. अर्जुन वेष बदलून प्रभास तिर्थावर प्रवेशकर्ता झाला. तरी त्याच्या आगमनाची बित्तम बातमी कृष्णाला त्याच्या हिराकडून कळली कृष्णाच्या सांगण्यावरून अर्जून रैवतक पर्वतावर जाऊन राहिला. तिथे त्याने तपाचे सोंग मांडले. एक दिवस सुभद्राही दर्शनासाठी आली आणि अर्जुनाच्या डोळ्याचे पारणे फिटले. रामाने हा कोण  विचारणा करता?हा यती चातुर्मासाचे चार महिने रैवतक पर्वतावर काढणार असल्याचे त्याला समजले. यतीच्या व्यक्तिमत्त्वाचा बलरामाच्या मनावर विलक्षण परिणाम झाला. पावसाळ्याचे चार महिने डोंगरावर काढण्याऐवजी यतीने ते द्वारकेत व्यतीत करावे अशी विनंती त्यांनी याला केली. यतीने आढेवेढे घेत का होईना ती मान्य केली. बलरामाने लगेच कृष्णाला यतीची सोय द्वारकेत सुभद्रेच्या महाला शेजारी बागेत करण्याचे आज्ञा केली. चातुर्मासात सुभद्रेने अशा तपस्वीची सेवा केल्यास तिला पुण्य लाभेल व तिचे पुढचे आयुष्य सुखाचे जाईल अशी बलरामाची धारणा होती. कृष्णाने मात्र या कल्पनेला कडाडून विरोध केला होता पण किंबहुना त्यामुळे संतापलेल्या बलराम याने आपला हट्ट पुरा केला आणि पुढील चार महिने येतील द्वारकेत सुभद्रा महाला शेजारच्या बागेत प्रस्थापित केले. 

स्त्रियांना आपला भाऊ मुलगा किंवा पती अर्जुनासारखा असावा असे वाटत होते सुभद्राही त्याला अपवाद नव्हती. अर्जुनाला न पाहताही ती त्याच्यावर प्रेम करत होती. एक दिवस त्याने आपणच पार्थ असल्याचे सांगून आपलेही तिच्यावर प्रेम आहे असे सांगितले. संधी मिळता सुभद्रेला घेऊन इंद्रप्रस्थि प्रयाण करण्याचे अर्जुनाने निश्चित केले. आणि राजकन्येलाही ते सांगितले. कृष्णाने पुरवलेल्या रथात सुभद्रेला घेऊन अर्जुनाने आपला रथ इंद्रप्रस्थाकडे दौडविला.यतीने सुभद्राचे हरण केले ही बातमी द्वारकेत पसरली. धोक्याची घंटा घणाघणा वाजू लागली. बलरामाला क्रोध अनावर झाला होता. त्याच्या मनात सुभद्रा आपला शिष्य दुर्योधन याला द्यायची होती. अर्जुनाने तिला पळवली यामागे कृष्णाचा हात असावा असा त्याचा संशय. पण कृष्णाने साफ कानावर हात ठेवले. सुभद्रा हरण इतकी नाजूक आणि हृदयस्पर्शी गोष्ट होती की या प्रश्नावरून यादव आणि पांडव यांचे कायमचे वैर उत्पन्न होण्याचा संभव होता. कृष्णाने रागवलेल्या बलराम दादाला आणि सभेतील यादवांना आपल्या नम्र आणि मृदुल वाणीने शांत केले.त्यांच्या पराक्रमाविषयी स्तुती केली आणि आपल्या मुद्देसूद युक्तीवादाने यादवांना पटवून दिले की "अर्जुनासारखं शूरवीर पती सुभद्रेला शोधूनही मिळाला नसता. क्षत्रियाला अनुरूप अशा पद्धतीने त्याने तिचे हरण केले आहे. यात यादवांचा अवमान नसून सन्मान आहे. तेव्हा अर्जुनाशी व पांडवांशी युद्ध करण्याची भाषा या दोघांनी न करता इंद्रप्रस्थी जाऊन सुभद्रेचे अर्जुनाशी यादवांना शोभेल असे थाटामाटात लग्न लावून द्यावे. भडकलेला संघर्षही शांत झाला यादवांनीही विवेक केला आणि सुभद्राचा अर्जुनाशी मोठ्या धुमधडाक्याने विवाह झाला.



 *खांडव वनदाह 



कृष्णा अर्जुनाने या अरण्यास सपत्नीक सहलीसाठी जाणे. तेथे अग्नी भेटणे, आपली भूक शमवण्यासाठी त्यांनी खांडववनाचा ग्रास मागणे. तो देण्याची कृष्णा अर्जुन यांनी तयारी दाखवणे या बदल्यात अग्नीने अर्जुनाला गांडीव धनुष्य ,दोन अक्षय भाते कपिल ध्वज असलेला रथ, गतीमध्ये वाऱ्याशी स्पर्धा करणारे चार पांढरे घोडे आणि कृष्णाला कौमोदकी गदा, सुदर्शन चक्र देणे. कृष्णा अर्जुन आणि पाऊस पडत असतानाही वन जाळून भस्म करणे. त्या तक्षकाचे सारे कूळ पूर्ण नष्ट होणे. मग शरण आल्यामुळे अर्जुन आणि त्याला जीवनदान देणे. मृत्युपकार म्हणून मया सारखा जळास्तूशिल्पज्ञाने कृष्णाच्या सूचनेवरून मयासारखे अलौकिक सभागृह पांडवांना बांधून देणे. सभागृहाच्या बांधणीत विविध रंगी खड्यांचा वापर करून अनेक प्रकारच्या दृष्टीभ्रम निर्माण करणे .पाणी वाटावे तेथे फरशी असणे फरशी वाटावे तेथे पाणी असणे. भिंत वाटावी तेथे दार असणे. दार वाटावे तेथे भिंत असणे.अशा गोष्टी घडल्या.


*राजसूय यज्ञ 

महाभारतात युधिष्ठिराला देवर्षी नारदाने तू राजसूय यज्ञ कर असे सांगून. त्यांच्या मनात आपण सम्राट व्हावे ही इच्छा निर्माण केली असा उल्लेख आहे. सर्वदृष्ट राजसत्तांची जरासंधाच्या नेतृत्वाखाली झालेली कोंडी फोडून त्या सर्व राजसत्तांना एकाच धर्म नियंत्रित साम्राज्याखाली आणण्यासाठी ही संधी फार योग्य आहे असे मनाशी ठरवून कृष्णाने युधिष्ठिराची राजसूयाची कल्पना उचलून धरली. धर्म संस्थापनासाठी जरासंध वध जीवनाचे ध्येय मानणाऱ्या कृष्णाचा यामागे उद्देश थोडा स्वार्थी म्हटला म्हणता आला. तरी तो बराचसा पांडवांना हितकारी होता आणि त्याहून अधिक देशातील जरासंधाच्या अत्याचारामुळे पीडित अशा अखिल राजमंडळाच्या हिताचा तो प्रश्न होता. सर्वसाधारण जनतेच्या हिताचा असाही तो प्रश्न होता.  

जरासंध वध

ब्राह्मणांच्या वेशात कृष्ण भीमार्जुना सह गिरीनगरात दाखल झाला आणि मध्यरात्री जेव्हा यज्ञ शाळेत जरासंधाची भेट घेतली. तेव्हा कृष्णाने आपणा तिघांची ओळख करून देऊन. जरासंधाच्या दुकृत्यांचा पाढा वाचून त्याच्या जवळच बंदीत असलेल्या ८६ राजांच्या मुक्ततेची मागणी केली. यापेक्षा आमच्यापैकी कोणाही एकाला द्वैयुद्धासाठी असे आव्हान दे हे सांगितले .द्वंद्वासाठी भीमाला निवडण्याआधी जरासंधाने केलेली दर्पोक्ती यासंदर्भात खूप बोलकी आहे जरासंध म्हणाला "मी बंदी केलेल्या राजांपैकी प्रत्येकाला युद्धात जिंकले आहे. जेता या नात्याने मी जितांचा जीवनाचा धनी आहे. त्या पराजित जीवनाचे काय करायचं आहे ते मी माझे ठरवेल. त्यात कोणीही लुडबुड करण्याचे कारण नाही. मी तुमचे युद्धाचे आव्हान स्वीकारतो हवे तर आपण सैन्य लढू तुमची इच्छा असेल, जर तिघांची एकाच वेळी लढण्यास मी तयारी आहे किंवा एक एकट्याशी युद्ध करण्याला माझी ना नाही. जरासंध आणि भीमसेन या दोघांचे युद्ध मला युद्ध अहोरात्र असे १४ दिवस चालले चौदाव्या दिवशी रात्री जरासंध थकलेला दिसला असता. कृष्ण भीमाला म्हणाला, भीमा तू वायुपुत्र आहेस आपले संपूर्ण दैवी बल खर्चून जरासंध्याला मारण्याची हीच ती वेळ आहे.कृष्णाच्या उद्गगाराने भीमाचा उत्साहात वेगळाच झाला व त्याने जरासंध्यावर जोराचे आक्रमण केले. त्याला खाली पाडले. हाताचं बल देऊन शिवणीतून चिरून टाकले. त्याच्या शरीराची दोन शकले आखाड्यात टाकून दिली (जरासंध्याच्या जन्माच्या वेळी दोन शकले जन्मास आली आणि जरा नावाच्या राक्षसीने सांधल्यावर ती एकसंध होऊन तो जिवंत झाला होता ).त्यानंतर कृष्णाने जरासंधाच्या मुलाचा सहदेवाचा मगधाच्या सिंहासनावर राज्याभिषेक केला. आणखी एक नवा आदर्श निर्माण करून मग राजाला पांडवांची सत्ता मान्य करायला लावून कृष्णाने अशा प्रकारे अधार्मिक राजसत्तांचा संघ फोडून टाकला.जरासंध वधामुळे राजमंडलावर इतका विलक्षण दरारा निर्माण झाला होता की पांडव बंधूंच्या नुसत्या आगमनानेच बहुतेक ठिकाणी नव्या धर्म सत्तेला मांडलिकत्वाचे करभार मिळाले.

विष्णूचा अवतार असो वा नसो कृष्णाच्या चारित्राचे मर्म मनुष्यत्व असून देवत्व नाही. ही गोष्ट तशी स्वतःसिद्ध असूनही महाभारताच्या पुढील विस्तारात कृष्णाच्या विष्णू रूपाचा पुन्हा पुन्हा उल्लेख येतो? उदाहरणार्थ जरासंधाच्या वधानंतर जरासंधाच्या रथात बसून कृष्ण भीम अर्जुन इंद्रप्रस्थ जायला निघाले तेव्हा आवश्यकता नसतानाही कृष्णाने गरुडाचे स्मरण केले आणि गरुड त्याच्या रथाच्या ध्वजस्थानी येऊन बसला, असा उल्लेख आहे .त्यातच दुसऱ्या प्रसंगामध्ये आम्हा तिघांपैकी कोणाशी युद्ध ला तयार हो असे जरासंध त्यांना आव्हान दिले तेव्हाही कृष्णाला म्हणे जरासंध यादवाकडून अवध्य आहे हा ब्रह्मदेवाचा आदेश आठवला. तो जरासंधाच्या वधाला प्रवृत्त झाला नाही येथेही कृष्णाच्या दैवी करण्याचा प्रयत्न आहे. जरासंध्याच्या बंदीतून कृष्णाने मुक्त केलेल्या ८६ राजांनी कृष्णाला धन्यवाद देण्याकरता काही कारण नसताना त्याला 'हे विष्णो' असे म्हणत पुकारले.


-अत्यंत बारकाव्यासह चित्र रेखाटले आहे, कोणाकडे कोणते काम दिले आहे,या खालील वर्णनाशी पूर्ण मेळ बसत आहे

सूर्यवंशाच्या सर्व राजकुलांचा पाठिंबा मिळवून युधिष्ठिराला राजसूय यज्ञ करण्यासाठी तयार झाला. देश देशांतरीच्या राजांना निमंत्रण गेले ऋषिगण पाचारिले ,देशोदेशीचे विविध वर्गातील लोक राजसूय यज्ञ पाहण्यासाठी राजधानीत हजर झाले. यादव,पांचाल मित्र होते हस्तिनापुराचे धृतराष्ट्र दुर्योधनाधिक कौरव प्राप्त होते. या यज्ञ समारंभात निरनिराळ्या मंडळींकडे वेगवेगळी कामे वाटून दिली होती. भोजन व्यवस्था दु:शासनकडे होती, ब्राह्मणांचा सन्मान अश्वत्थामाकडे होता, येणाऱ्या राजांचे आदरितिथ्य संजयने करायचे होते. भीष्म , द्रोणाचार्य धर्मकृत्यावर देखरेख करायची होती, रत्न पारख दक्षिणा वाटप दान इत्यादीवर कृपाचार्य लक्ष ठेवणार होते, खर्चाचा हिशोब विदुराने ठेवायचा होता, तर येणारे नजराणे दुर्योधनाने स्वीकारायचे होते ‌‌.पण यज्ञात कृष्णाने स्वतःकडे ब्राह्मणांचे पाय धुवायचे काम घेतले होते. असे म्हणतात कृष्ण आदर्श पुरुष होता म्हणून विनयाचा आदर्श प्रस्थापित करण्याकरता म्हणून त्याने हे दासाचे कार्य अंगीकारले?

 वैदिक मंत्रांच्या गजरात युधिष्ठिर आणि द्रौपदी यांच्यावर सप्तसरिता व सप्तसिंधू यांच्या जलाने पांजजन्याद्वारे स्वतः कृष्णाने अभिषेक केला. भारत वर्षाचा सम्राट म्हणून युधिष्ठिराला घोषित केले.


*शिशुपाल वध

प्रथेप्रमाणे पाहुण्यांपैकी एकाची प्रमुख अतिथी म्हणून निवड करून पहिल्याने अर्घ्य देऊन त्यांची पूजा करण्याची पद्धत होती. अग्र पूजेचा मान कोणाला द्यावा म्हणून व पितामह भीष्मांना विचारले असता भीष्माने कृष्णाचे नाव सुचवले. युधिष्ठिरलाही आनंद झाला चेदिराज शिशुपालाला मात्र राज मंडळाचा हा अपमान सहन झाला नाही. त्यांनी छद्मीपणाने मोठ्याने हसून शांतेत विघ्न आणले. अग्र पूजेचा मान एका गवळ्याला देणाऱ्या युधिष्ठिराची आणि पितामह भीष्मांची त्याने टिंगल उडवली. नातेसंबंधातील वरिष्ठतेचा विचार करता तो मन द्रुपदला मिळाला हवा होता. विद्वत्ता निकष धरला असता द्रोणाचार्य कृपाचार्य गुरुपुत्र अश्वत्थामा यांचा अधिकार डावलता आला नसता. तप सामर्थ्याचा विचार केला तर म्हणावे प्रत्यक्ष कृष्णद्वैपायन व्यास सभेत हजर होते. उत्कृष्ट धनुर्धारी म्हणून कृष्णाची निवड झाली म्हणावी तर सभेत निशाद राज एकलव्य आणि अंगराज राधेय हजर होते. कुण्या राजाला हा बहुमान द्यायचा असतात अग्र पूजेसाठी भगदत्त कलिंग विराट  शल्य शाल्व,कांबोज विंध अनुविंध यांची नावे सहज नाकारता कशी आली असती?पण भीष्मांनी युधिष्ठिराने निवड केली ती एका गवळ्याची? शिशुपाल्याच्या म्हणण्याप्रमाणे युधिष्ठराचा हा वेडेपणा होता‌ आणि यज्ञाला जमलेल्या सर्व पाहुण्यांचा तो अपमान होता. 

शिशुपालाने आता आपला मोर्चा कृष्णाकडे वळवला त्याच्या दृष्टीने कंसवध,जरासंधवध घडून आणण्यात कृष्णाचा जो पराक्रम दिसला तो फक्त कपटनीतीचा. त्याला पहिल्याने अर्ध देणे म्हणजे एक एखाद्याने आपली मुलगी छक्क्याला देण्यासारखी होते. युधिष्ठिराने शिशुपालला शांत करण्याचा प्रयत्न केला पण भीष्माने त्याला म्हटले  "शिशुपालला काय भुंकायचे ते भुंकू दे" त्यामुळे  शिशुपाल कुरुवृद्ध भीष्मावर भयंकर चिडला. त्यांनी अगदी घाणेरड्या शब्दात त्यांची निर्भर्त्सना केली त्यांच्या प्रतिज्ञाची चेष्टा केली. षंढ असल्यामुळे त्यावर पांघरून घालण्यासाठी त्यांनी लग्न न करण्याची प्रतिज्ञा केली असे तो म्हणाला. भीष्माला तो नदीपुत्रही म्हणाला .भीम  शिशुपालला ठार मारण्यासाठी निघाला पण भीष्माने सावरले. कृष्णाला युद्धाचे आव्हान दिले. म्हणाला "कृष्णा हे युद्धाचे आवाहन आहे कुणाची वागदत्त वधू लढाई न करता पळून नेण्याइतके हे सोपे नाही. गोपींची वस्त्रे पळवणे अगर त्यांना प्रेमात भुलवित ठेवण्यात इतकेही सोपे नाही.

 कृष्णाने शिशुपालाच्या आजवरच्या अपराधांचा पाढा वाचला म्हणाला "मी नरकासुराशी युद्ध करीत असताना द्वारकेवर हल्ला करून जी जाळणाऱ्या शिशुपालने ,वृद्ध उग्रसेनाला सतावणाऱ्या शिशुपालने ,प्रत्यक्ष आपल्या मामाचा वसुदेवाचा अश्वमेध यज्ञाचा घोडा पकडून ठेवणाऱ्या शिशुपालने, आणि दुसऱ्यांच्या बायका पळून नेणाऱ्या शिशुपालने आपल्या शौर्याच्या व पराक्रमाच्या गप्पा मारू नये." अलौकिक कथेप्रमाणे युद्ध उभे राहिले तेव्हा कृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राचे स्मरण केले आणि शिशुपालावर ते सोडले क्षणात शिशुपालाचे शीर धडापासून वेगळे झाले. 

याच प्रसंगी कृष्णाचे नाव अग्रपूजेसाठी सुचवितांना पितामहा भीष्म त्याचा 'जगदीश्वर' म्हणून उल्लेख करतात. कृष्ण सर्वश्रेष्ठ बलवंत क्षत्रिय आहे. पण कृष्णासारखा वेद वेदांगाचे ज्ञान असणारा पुरुष विराळाच असेही ते म्हणाले.पण युधिष्ठिराच्या धर्मराज संस्थापना घोषित करणाऱ्या राजसूय यज्ञात जेव्हा शिशुपाल विघ्न निघाला तेव्हा एका दृष्टीने आपल्या सामाजिक बांधिलकी म्हणून शिशुपालाला त्वरित ठार करण्याचे धर्म संस्थापनेतील तो अडसर कृष्णाने दूर केला होता. कृष्ण नेत्याच्या करवी निर्माण केलेले धर्म राज्याचे स्वरूप काय होते.ते वर्णन महाभारतातील सभापर्वातील ३३ व्या अध्यायात आले आहे.



Thursday, July 18, 2024

घारगे



लालभोपळा

#आषाढ

 खरं म्हणजे मागच्या आठवड्यात दोनदा आषाढात आखाड तळून झाला.तोवर लाल भोपळा आणला नव्हता.चार दिवसांपूर्वी आणला पण वेळच झाला नाही.आज भोपळ्याचे घारगे करत उपवास सोडला.मराठी घरांत , काळ्या मेघांच्या झालरीत, उधाणलेल्या पावसात लाल भोपळ्याचे घारगे/घाऱ्या का अबाधित आहेत.गुळाचा मुरलेला गोडवा,जायफळ वेलचीचा मंद सुगंध, वाफवलेल्या भोपळ्याचा मऊसर गोडसर ओलावा जिभेला कमाल तृप्त करतो. 

कृती

भोपळ्याच्या बिया,शिरा व सांगली काढून टाकायची.बारीक किसून घ्यायचा ,एक मोठी वाटी किस घ्यावा.तूपात परतून घ्यायचा.अर्धी वाटी गूळ,वेलची,जायफळ पावडर घालून मऊसर शिजवून घ्यायचा.हे मिश्रण थंड झाल्यावर बसेल तेवढी कणीक+तीन चमचा तांदळाची पिठी घालत मळून घ्यायचे.घारगे पुरीच्या आकारात लाटून तळून घ्यायचे.

गुळाचे योग्य प्रमाण असेल तर पुरी छान फुगते.

Tuesday, July 16, 2024

कृष्णाच्या गोष्टी-७

 #कृष्णाच्यागोष्टी७

*स्यमंतक मणी

रुक्मिणी नंतर कृष्ण कुटुंबात मान होता सत्यभामेला! ती सुंदर होती पण राजकन्या नव्हती. द्वारकेतील सत्राजित नामक एका यादव गणप्रमुखाची ती मुलगी होती. एका अलौकिक कथेप्रमाणे सत्राजिताने सूर्य देवाला प्रसन्न करून स्यमंतक नावाचा एक मणी प्राप्त करून घेतला होता. तो एक विशेष प्रकारचा मणी होता जो रोज दोन तोळे सुवर्ण निर्माण करत असे.असे रत्न गणप्रमुख ऐवजी राजाच्या आगार संघप्रमुखाच्या पदरी असावे म्हणून कृष्णाने सत्राजितच जवळ त्या त्या मणीची मागणी केली पण त्याने चक्क नकार दिला. 

एका दिवशी सत्राजितचा भाऊ प्रसेन हा मणी गळ्यात घालून जंगलात शिकारीला गेला.अचानक वाघाने त्याच्यावर हल्ला केला व प्रसेन ठार झाला आणि त्या सिंहालाही जांबुवंत नामक एका अस्वलाने हल्ला करून ठार मारले. जांबुवंताने तो मणी हस्तगत करून आपल्या मुलाच्या गळ्यात बांधला.

प्रसेन परतला नाही. त्याच्या गळ्यात स्यमंतक मणीही होता. तो कृष्णाला पाहिजे होता त्या प्रयत्नांत कृष्णाने प्रसेनचे बरे वाईट केले असावे असा सत्राजितला संशय वाटला आणि त्याने सुधर्मा सभेत ते व्यक्त करून कृष्णावर जाहीर आरोपही केले. कृष्ण काही न बोलता सभेतून बाहेर पडला आणि आपल्या काही सहकाऱ्यांसह प्रसेनच्या शोधात जंगलात गेला. त्याला तेथे प्रसेनचे प्रेत सापडले.सिंहाच्या पंजाचे ठसे होते, त्याचा मागवा घेत पुढे गेल्यावर कृष्णाला आता सिंहाचेदेखील प्रेत सापडले. पण मणी तिथे नव्हता. पुढे अस्वलांच्या पावलांच्या ठशांचा मागवा घेत कृष्ण डोंगराजवळील एका गुहेत पोहोचला. तिथे आत शिरला तेव्हा अस्वलाच्या पिल्लाच्या गळ्यात बांधलेला तो मणी दिसला. पण तो जांबचवंताने परत द्यायचे नाकारले त्यामुळे कृष्णाला जांबुवंताशी युद्ध करावे लागले. जांबुवंताच्या ध्यानात आले की हे आपले प्रभू श्रीराम आहे व ते युद्ध थांबून कृष्णाच्या पाया पडला व आपली कन्या जांबुवंती त्यांनी कृष्णाला अर्पण केली व स्यमंतक मणीही त्याच्या स्वाधीन केला.



 नंतर कृष्णाने सर्वांसमक्ष तो मणी  सत्राजिच्या हाती ठेवला. सर्व हकीकत समजल्यावर आपण कृष्णावर चुकीचा आरोप केला आहे याची सत्राजितला जाणीव झाली व त्यासाठी सत्राजितने आपली सुंदर मुलगी सत्यभामा कृष्णाला देण्याचे ठरवले. तिचा स्वीकार करण्याची त्याला विनंती केली कृष्णाने सत्यभामाचा स्वीकार केला. परंतु मणी आपल्या सासऱ्याच्या जवळच राहू दिला. 



हे प्रकरण येथे संपले नाही. कारण कृतवर्मा आणि अक्रूर नामक दोघा गणप्रमुखांना कृष्णविषयी असूया वाटत होती व अक्रुराला स्यमंतकाचा मोह झाला होता. त्यामुळे सत्राजितला मारून कृष्णाचा रोष ओढावून घेण्यासारखे होते. त्यामुळे कृष्ण आणि बलराम द्वारकेत असताना सत्राजाचा काटा काढणे शतधन्व्याला शक्य नव्हते. पण जेव्हा केव्हा ते शक्य होईल तेव्हा कृष्णरोषापासून संरक्षण देण्याचे अक्रूर आणि कृतवर्मा यांनी मान्य केले. त्या बदल्यात शतधन्व्याने सत्राजितकडील स्यमंतकमणी अक्रूरच्या स्वाधीन करावे असे ठरले. तिकडे कुंतीसह पांडवांना वारणावत नगरातील ज्वालाग्रही पदार्थांनी बनवलेल्या राजवाड्यामध्ये राहण्यासाठी पाठवून त्या राजवाड्याला आग लावून कुंती आणि कुंतीपुत्रांना जिवंत जाळण्याचा प्रकार घडला. ही दुःखद बातमी द्वारकेला येऊन धडकली. तेव्हा हस्तीनापुरात होत असलेल्या आत्या कुंती आणि कुंती पुत्रांच्या अंतिम धार्मिक संस्कार प्रसंगी हजर राहण्यासाठी धृतराष्ट्र आणि विदूर आदी मंडळींचे सांत्वन करण्यासाठी रामकृष्ण हस्तीनापुरात पोहोचले‌ हस्तीनापुरात पोहोचले. आणि हीच संधी साधून शतधन्व्याने एका रात्री सत्राजितच्या घरात शिरून त्याचा खून केला आणि त्याचा स्यमंतक मणी पळवला. 

पिताच्या वधाची बातमी सत्यभामांकडून हस्तीनापुरात कळल्यानंतर रामकृष्ण यांना त्याचा अनावर संताप आला.काशी नगरा जवळच्या जंगलात सततच्या तेवढी मुळे मरून पडलेला शतधन्व्याचा घोडा त्यांना दिसला शतधन्वा घाई जंगलात घुसला आहे हे त्यांच्या ध्यानी आले. कृष्णाने पाय उतार होऊन पाठलाग केला व तो सापडल्यावर त्याला ठार मारले.कृष्णाने जंगलाबाहेर येऊन शतधन्व्याला मारल्याचे वृत्त बलराम दादांना सांगितले पण त्याच्या अंगावर  मणी नव्हता हे सांगितले. परंतु बलरामांना येथे वाटले की कृष्णाला आपल्या सासऱ्यांपेक्षा स्यमंतक मण्यातच अजून देखील रस आहे.तेव्हा त्यांना राग आला व ते कृष्णाला दूषण लागत म्हणाले "जोपर्यंत तू मला स्यमंतक मणी आणून दाखवत नाही आणि तो मिळवण्यात तुझा रस नाही हे सिद्ध करत नाही तोपर्यंत मी द्वारकेत पाऊल ठेवणार नाही."आणि जवळच असलेल्या मिथिला देशाच्या राजधानीत राहायचे ठरवून ते मिथिलेकडे वळाले असे.स्यमंतक मण्याचा  कृष्णाला अगदी वीट आला होता. याच काळात दुर्योधनाने मिथिलेत जाऊन बलराम कडून गदा युद्धाचे शास्त्रशुद्ध शिक्षण देखील घेतले. 


पण तिकडे अक्रूर दानशूर म्हणून प्रसिद्ध होत होता यज्ञ दीक्षा घेऊन एका मागून एक असे अनेक यज्ञ करत होता. अमाप संपत्ती सुवर्ण ब्राह्मणांना दान करत होता.स्यमंतक बाबत कृष्णाला आपला संशय येऊ नये म्हणून यज्ञदीक्षा हे सोंग त्यांनी घेतले होते.यज्ञाच्या थाटावरून आपले दोष कृष्णाचे ध्यानी आले आहे असे समजताच अक्रूर काशीला निघून गेला कृष्णाला यादव गण संघात संघर्ष नको होता म्हणून त्याने अक्रूराकडे दुर्लक्ष केले.परंतु त्याने त्याला निरोप दिला,


 "आपल्या जवळ बरेच दिवस आमचा-सत्यभामेचा स्यमंतक मणी आहे ते परत मिळवण्यात आम्हाला विशेष रस नाही. परंतु जनसामान्यात आणि आमच्या जवळच्या नातेवाईकात आमच्या हेतू विषयी काहीतरी गैरसमज निर्माण झाले आहेत.ते दूर व्हावे म्हणून तो मणी मिथिलेत जाऊन बलराम दादांना दाखवून त्यांच्यासह इथे यावे आणि तो मणी आपल्याजवळ आहे हे सुधर्मा गणसभेत सांगावे."


 अक्रूरला कृष्णाची वैर परवडण्यासारखे म्हणून नव्हते म्हणून त्याने कृष्णाचा संदेशाप्रमाणे वागून बलराम दादांसह द्वारकेत प्रवेश केला आणि यादव गणप्रमुखांच्या सभेत मणी सादर केला अक्रुराने ही आपली मुलगी कृष्णाला समारंभपूर्वक देऊन तो मणीदेखील त्याला देऊ केला पण कृष्णाने याचा स्वीकार केला नाही आणि या प्रकरणावर पडदा पडला.


*नरकासुर वध

ब्रह्मदेवाच्या वराने अजय झालेला मातलेला प्रागज्योतिष पुराचा राजा नरकासुर त्याने ब्राह्मण, साधू या सगळ्यांचा छळ मांडीला. त्रिभुवनातील संपत्ती जणू त्याने आपल्या आधीन केली. देवमाता आदितीचेही कुंडले त्याने हिरावून आणली. देव, ब्राह्मण, यक्ष, किन्नर अशा विविध जमातीतील षोडस वर्षीय सुंदर कन्यांचे हरण करून त्यांना आपल्या कैदेत ठेवले. या सगळ्या अक्षतयोनि कन्या त्यांचा नरकासुर अपहरण करून त्यांचा व्यापार करणे असा धंदा होता असे निष्कर्ष काही ग्रंथात काढले आहेत.द्वारकेत स्थिरपत झालेल्या कृष्णाच्या कारणावर नरकासुराच्या भयानक अपकृत्यांची विविध माहिती येत होती. अन्यायाच्या विरुद्ध धावून जाण्याच्या त्याच्या स्वभावामुळेच कृष्णाने त्याच्यावर हल्ला चढवला. 



सत्यभामाला सारथी म्हणून घेऊन एकटा कृष्ण नरकासुरावर चालून गेला. त्यांनी निसुंद, हरग्रीव पंचनद, वीर ,मूर( यावरून मुराला मारणारा मुरारी हे नाव कृष्णाला मिळाले)अशा एकापेक्षा एक शस्त्रनिपुण असुरांचा वध करून शेवटी दहा दिवसांच्या अहोरात्र चाललेल्या लढाईनंतर प्रत्यक्ष नरकासुरालाही अश्विन वद्य चतुर्दशीच्या पहाटे पाच वाजता आपल्या सुविख्यात सुदर्शन चक्राने मारले. परंतु ही एक अनैसर्गिक म्हणावी एवढी ताज्य कथा आहे असे लेखकाचे म्हणणे आहे. त्याऐवजी बलाढ्य यादव सेनेसह कृष्णाने प्रागज्योतिषपुराला जाऊन नरकासुराचा पराभव केला ही अधिक वास्तव कथा आहे.


नरकासुर त्या मुलींची विक्री करो अथवा न करो पण शतावधी चांगल्या घराण्यातील मुली त्याच्या बंदीखान्यात होत्या ही गोष्ट निर्विवाद आहे‌.तरी कृष्ण काळात प्रागज्योतिषपुराचा राजा नरकासुर नसून भगदत्त हे बंकिमचंद्रांचे म्हणण.हे त्यांचे म्हणणे नरकासुरवधाचे श्रेय परंपरेने कृष्णाला देणाऱ्या मंडळींना पटण्यासारखे नाही. पण भारतीय महायुद्धात हत्तीवरून लढणारा भगदत्त(नरकासुराचा मुलगा) वृद्ध दाखवला असून त्याच्या डोळ्याच्या पापण्यांचे स्नायूशीतील झाली असल्याने पापण्यांना बारीक डोळा बांधून डोळे उघडे ठेवण्यासाठी तो दोरा कपाळावर बांधलेल्या पट्टीला बांधून ठेवणाऱ्या भगदत्ताला मारण्यासाठी कपाळावरील ती पट्टी तोडून आंधळे कर मग मार असे कृष्णाने अर्जुनाला सुचवल्याचा उल्लेख महाभारताच्या द्रोणपर्वात आला आहे. त्यावरून बंकीमचंद्रांच्या म्हणण्यात तथ्य आहे असे प्रस्तुत लेखकाला वाटते. तरी कृष्णकाळापर्यंत नरकासुराने खूप वर्षे अनियंत्रित सत्ता भोगली असल्याने त्याचा युवराज भगदत्त नरकासुर वधानंतर कृष्णाने निस्वार्थीपणे प्रागज्योतिष पुराच्या गादीवर बसवला. तेव्हा तो खूपच वयस्कर असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 


त्या काळात मूळच्या समाजात या बंदिवान शतावधी स्त्रियांना प्रतिष्ठेचे व सन्मानाचे जीवन जगणे अशक्य होते अशा स्त्रियांची अवस्था कृष्णाने जाणून घेतली. ते लक्षात घेऊन मानवतेचे महान उद्धार भगवान श्रीकृष्ण हे स्वतः पुढे झाले व जसे सुटकेचे तसेच त्यांच्या चांगल्या घराण्यातील मुलींच्या जीवनाची घडी नीट बसून त्यांना प्रतिष्ठेचे व सन्मानाचे जीवन देण्यासाठी त्यांचे उत्तरदायित्व आपलेच आहे हे त्यांनी ओळखले. त्यांनी त्या कुमारिकांची इच्छा ओळखून त्यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला आणि  स्वीकार केल्यामुळे आपोआपच सामाजिक जीवनातील त्यांचे स्थान निश्चित झाले. भगवंताच्या या लोकोत्तर सामाजिक कार्याला जर विलास म्हणायचे असेल तर तशा महापुरुषांना 'ते के न जानीमहे' एवढेच एक उत्तर असू शकेल. लोकोत्तर पुरुषांचे वागणे असेच असावे लागते औदार्य स्वगृहापासून चालू करावे लागते, असे सांगताना देखील येथे त्यांनी एक उदाहरण दिले आहे.शिवरायांनी ,बाटून मुसलमान झालेल्या बजाजी निंबाळकर याला शिखरशिंगणापूर येथे शुद्ध करून परत हिंदू धर्मात घेतले ९६ कुळाचे मराठा त्याला आपल्या सामावून घेणार नाहीत. याची त्यांना खात्री असल्याने शिवरायांनी आपली मुलगी बजाजी निंबाळकर यांच्या मुलाला देऊन निंबाळकरांशी सोयरीक जोडली आणि त्याला कुळगोतात सामावून घेतले. ही घटना अलीकडची तरीही कृष्णकृतीच्याच तोडीची !

 


*पारिजात आणि पुण्यक व्रत

देवमाता आदितीची नकासुराने अपह्रत केलेली कुंडले परत करण्यासाठी कृष्ण सत्यभामेसह इंद्रपुरीला पोहोचला तेव्हा देव मातेला व इंद्राला भेटून द्वारकेला परत असताना नंदनवनातील पारिजात वृक्ष सत्यभामाला आवडला. तेव्हा नंदनवनातील त्या वृक्षाचे रोपटे घेऊन कृष्ण द्वारकेला परत आला. इकडे रुक्मिणीने देखील कृष्णासाठी एक व्रत केले होते .कृष्ण विजयी होऊन परत आल्यावर तिला आनंद झाला. आपल्या प्रिय पत्नीच्या व्रताचे उद्यापन मोठ्या थाटामानाने कृष्णाने साजरा केला. सत्यभामेला रुक्मिणीच्या या भाग्याचा हेवा वाटला म्हणून तिच्या व्रताच्या उद्यापनासाठी आलेल्या महर्षी नारदांनी आपल्यालाही एखादे व्रत सुचवावयाची तिने विनंती केली.नादानी तिला पुण्यक व्रत कर असे सांगितले.सत्यभामेने व्रताची सुरुवात केली व्रतात महेशाची पूजा केली होती. उपवास करायचा होता आणि आपली अत्यंत आवडती वस्तू शेवटी ब्राह्मणांना दान करायची होती. सत्यभामेने प्रामाणिक व्रत पार पाडून नारदमुनींना निमंत्रण दिले. नंदनवनातून आणलेल्या पारिजाताकाला कृष्ण बांधून त्याचे दान नारदाच्या हातावर सोडले. सत्यभामेला नारदाला दान केलेल्या कृष्णाला परत मिळवण्यासाठी सवत्स कपिला आणि भारंभार सुवर्ण नारदाला दक्षिणा म्हणून द्यावे लागले. सत्यभामेजवळ सुवर्ण अपुरे पडले पण रुक्मिणीच्या तुलसी पत्राने कृष्णाची तुला पूर्ण केली ही सारी कथा ह्रद्यतर खरीच पण अलौकिक म्हणून त्याग करण्यासारखी वाटत नाही.

 इंद्रपुरी आणि पारिजात वृक्षाचे अस्तित्व या कुठल्याच गोष्टीवर आपला विश्वास नसल्यामुळे पारिजात हरण वृत्तांत आपल्याला मान्य नाही हे बंकिमचंद्रांचे म्हणणे आहे. ते लेखकाला पूर्णतः मान्य नाही.

नरकासुराच्या लढाईच्या निमित्ताने कृष्णाला बरेच दिवस द्वारकेबाहेर काढावे लागले या अवधीत शिशुपालाने द्वारकेवर हल्ला केला. द्वारका जिंकता आली नाही तेव्हा काढता पाय घेतला. पण जाता जाता सगळी नगरी जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. कृष्णाने या संधीचा फायदा घेऊन आपल्या विश्वकर्मा नामक वास्तुशिल्पज्ञाच्या सल्ल्यानुसार नगरीचा विस्तार केला आणि ती अधिक सुंदर बनवली व आता प्रशस्त बागाही केल्या .


*पौंड्रवासुदेवाचा वध 


पौंड्र जमात आणि त्यांचे राज्य याचा उल्लेख अनेक देशी-विदेशी ग्रंथात येतो. रामायणात पौंड्राचा दाक्षिणात्य म्हणून देखील उल्लेख येतो पण महाभारतात पौड्र जमात वंग देशाच्या पश्चिम भागात राहणारी होती असा उल्लेख आहे. कृष्णाच्या काळी पौंड्रांचा जो राजा होता त्याचे नाव देखील वासुदेव होते .वासुदेवाचा मुलगा म्हणून कृष्णही वासुदेव आणि सर्व  प्राणीमात्रांच्या आत्म्यांचे अंतिम वासस्थान जो कोणी परमात्मा आहे त्याचे देखील वासुदेव नाव म्हटले जाते.पण पौंड्र राजाचा आपणच खरे वासुदेव आहे असा दावा होता आणि द्वारकावासी वासुदेव कृष्णाला तो तोतया वासुदेव म्हणत असे. कृष्णाला त्याने आपली शंख चक्र गदा पद्म ही चिन्हे वापरू नको व ती मला परत कर असा उद्माम संदेश पाठवला होता.ती परत करण्याच्या मिषाने कृष्ण पौंड्रवर्धन नगरीमध्ये गेला आणि  त्याने पौंड्र राजाची हत्या केली.वाराणसीचा राजा नेहमी पौंड्राचा पक्ष घेत. त्यामुळे त्याला राग आला आणि द्वारकेवर परतणाऱ्या कृष्णावर त्यांनी हल्ला केला.व युद्ध देखील केले पण त्यात काशी राजा मारला गेला. कृष्णाने वाराणसी जाळून टाकली आणि कृष्ण द्वारकेला परतला.


या सर्व घटनाानंतर आता कृष्णाला यादवांची काळजी नव्हती.यादव बलवंत धनवंत असे झालेले होते. विविध यादव कुळात थोड्याफार कुरबुरी असल्या तरी सारे कृष्णाला मानीत होते. कृष्ण राजा नसला तरी राज मंडळाचा सम्राट राजेश्वर होता.

आता कृष्णाला धर्मराज संस्थापनाच्या आपल्या जीवन उद्दिष्टाकडे वळता येणार होते. कृष्ण आता त्या दृष्टीने भारतभराच्या एकंदर राज मंडळाचे अवलोकन करीत होता.


संदर्भ - शोध कृष्णाचा -प्रवासी पूर्णत्वाचा 

लेखक-प्रा डॉ राम बिवलकर



Friday, July 12, 2024

पवनाकांठचा धोंडी-पुस्तक परिचय



गो.नी.दांडेकर हे शिवकालीन गडांचे नाहीतर त्याकाळच्या भोळ्याभाबड्या पण निष्ठावान लोकांचेही अभ्यासक!

असाच शिवाजीमहाराजांनी इनाम  दिलेली तुंगी गडाची हवालदारकी आणि पवनाकाठची दहा एकर जमीन यांचा वारस धोंडी ढमाले!

गोनीदां आपल्याला कोंडीच्या शेतातच नेतात.अगदी  जसे भूमितीचा अभ्यास करून सरळ योग्य अंतरावरच्या शेतातल्या पिकांच्या रांगा, जमीनही अशी कसली की एक ढेकूळ उगा दिसत नाही अगदी सगळी माती एकसारखी!धोंडी तिला काळी आई -माय म्हणायचा.शिवकाल गेला, पवनानगरपासून लोणावळा पर्यंत लोकल सुरू झाली.पण धोंडी मात्र अजून हवालदार या उपाधीचा मान ठेवून होता.खळ्यात मोत्यासारखे धान्य झाल की तो पार लोणावळापर्यंत बलूत देऊन यायचा.गावातल्या अडचणीला सगळ्यांसाठी धावून जायचा.सारा गाव त्याला देवमाणूस म्हणायचा.धोंडीला आपल्या पूर्वजांचा मानमरातब जीवनापेक्षा प्रिय होता.हवालदार घराण्याला साजेशीस अशी त्याची कारभारीन सारजा होती गृहलक्ष्मी,अन्नपूर्णा सारे रूप तिच्यात साठलेले.पण आईपणाच्या दानाला मुकलेली.तरीही याची खंत न बाळगता ती धाकट्या दीरासाठी कोंडीसाठी यशोदेचे रूप घेत रमली.पण नवरा धोंडी अगदी मानी,कष्टाळू तर धाकला कोंडी अजून बाळबोध बुद्धीतून मोठा न झालेला.या गमतीशीर कात्रीत ती अनेकदा अडकत.

कोंडीने भावाच्या विरोधात जात अनेक उचापती केल्या.कुस्तीसाठी खुराक, दुधासाठी स्पेशल म्हैस वहिनीच्या मार्फत सारं दादाकडून पुरवून घेतलं.पण कुस्ती हारला धोंडीने विजयी किशाला उचलून घेतलं...हवालदाराला निरपेक्ष साजेसा वागला.पण कोंडी रूसून कुठंतरी जाऊन बसला ,धोंडी त्याला शोधतोय. पण तो सापडेना , हवालदार कुळाचा एकूलता एक वारीस काहीबाही स्वतः बरोबर केलं नसेल ना?,ना ना शंका धोंडीच्या मनात आल्या.शेवटी रात्री कोंडी घरी आला पण काही अपरित त्याच्या मनाने ठरवले.दुधाचा धंदा करायचा...लोकलने इतर लोकांप्रमाणे सकाळी लोणावळ्याला दूध विकायचे आणि परत लोकलने मागे फिरायचे.पण धोंडी कडाडला हवालदार आता गवळ्याचा धंदा करत कावड उचलणार?धोंडीला हे कधीच आवडले नाही.पण सारजाच्या हट्टाने आणि भावाच्या प्रेमापायी कोंडीला म्हशी घेऊन दिल्या..."पण तुझा तो पाण्यात दूध टाकून विकायाचा पापाचा पैका मला,माझ्या घरासाठी कधी वापरू नको"अशी ताकीद दिली.

धोंडी आपला शेतात कष्ट करीत राहिला.कोंडीच्या खांद्यावर दहा एकर देत तीर्थाला जाण्याची त्याची इच्छा अपूरीच राहणार, हे वाटलं.तिकडे कोंडी पण सिगारेट, खाण्यापिण्याची ऐश, नाचगाणी,वाईट मित्र यांच्या नादाला लागत होता.धोंडीला मेल्याहून मेल्यासारखे होई .पण घराण्याची पुण्याई थोर म्हणून 'सरू' सारखी शिकलेली,सालस बायको कोंडीला मागणी घालून आली असं धोंडीला वाटलं आणि आनंद झाला.धुमधड्याकात कोंडीच लग्न लावून दिलं.सारं घर तीन दिवस बत्तीच्या रोषणाईने उजाळत होता.हुस्सैनच्या म्हातारीने ताकीदच दिली होती.धोंडी सज्जन न चुकता बलूत आणून देतो.त्याच्या घरात आपल्याकडून झगमगाट व्हायलाच पाहिजे.

नव्या सुनेच्या रूपात तर धोंडीला आपली आजीच परत आली आहे असं वाटायचे."काय आज्जे नातवाने शेत चांगलं राखलं ना?" तो सरूला आनंदाने विचारायचा.गडाविषयी,पवनामाय, शेतीविषयी बोलायला लागला की धोंडीच्या राठ डोंगरातून अमृत वर्षाव होतोय असं वाटायचं,ऐकतच राहत बसावें वाटायचे.

"सरूताई ,हे शेत आता तुम्ही घेतला म्हणा, आणि आमाला मोकळं करा"

सरूला समजेना ,पण धोंडीदादा म्हणतो म्हणून तिने तसंच म्हटलं.

धोंडीला सारजाला कृतार्थ वाटलं.पण काळ्या ढगांची अचानक कळा हवालदार कुटुंबावर आली.सारजा तापाचं कारण होऊन जग सोडून गेली.सर्वात मोठा धक्का वहिनीच्या लाडक्या कोंडीला बसला.त्याने डॉक्टर आणला पण धोंडीने दूधाचा पापाचा पैसा नको करत ते उपचार होऊ दिले नाही.हाच राग धरत आणि दादा परत म्हशीसाठी पैसे देईना.तेव्हा  मित्रांच्या सांगण्यावरून कोंडीने चक्क भावावर अंधारात भ्याड हल्ला केला ‌.धोंडीला तर आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी अवस्था झाली.सरूला समजलं काय करावे कोणालाच समजना पण धोंडीने ठरवलं आणि सारं दहा एकर प्रेमाने कोंडीच्या नावावर केलं आणि स्वतः कर्ज घेत म्हशीही घेऊन दिल्या.

सारं सरळ होईल वाटत असतांनाच पवनामाय रागावली,पावसाने पाठ फिरवली,जनावर फिसकीने मेली.आता शेत नांगरायचं कसं?धोंडी सगळा दिवस एकटाच कुदळीने शेत नांगरत राहिला.पण आता कोंडीला दादाचे हाल पाहवेना.त्याने इर्जिक (सगळ्या गावच्या बैलांच्या मदतीने नांगरणी) आणायची ठरवली.

धोंडी कडाडला,"ज्या शेतात शिवाजी महाराजांचे ऋण आहे तिथे इर्जिकी लावणार, हवालदार घराण्यात असं कंदी झालं नाय,माज रगत काळ्या आईत सांडेन पण इर्जिकी शेतात नाय होणार."

दुसऱ्या दिवशी धोंडी एकटाच म्हातार्या बैलाला एकीकडे आणि स्वतःला दुसऱ्या बाजूला जुंपत नांगरणी करीत राहिला.

'तुंगी गडाचा  हवालदार कष्टाने मानाने मातीत मिळाला पण इर्जिकी आणायच्या आधी आपल्या वाटचं काम करीत तिच्यात विलीन झाला '

अनेकदा स्त्री पात्राची सर्व संपन्न रेखाटनी लेखक उभी करतात.पण गोनीदांनी एक रांगड पण तरीही भाबड्या प्रेमाने ओतप्रोत एक पुरुष पात्र लीलया धोंडीच्या रूपाने उभे केले आहे.

आजही तुंगी गड मानाने पवनेकाठी धोंडीच्या निष्ठावानाची साक्ष देत उभा आहे.

या कथेवर आधारित मराठी सिनेमाही आला होता पण तो काही आता कुठे उपलब्ध दिसत नाही.पण गाणी उपलब्ध आहे, खुद्द दीदींच्या आवाजातला "पावनेर मायेला करू" आणि एक प्रसिद्ध गीत  उषाताईंच्या आवाजातले आहे-"काय बाई सांगू कसं ग सांगू?'" 😊

तसेच संपूर्ण ओडिओ पुस्तक तूनळीवर उपलू आहे- https://youtu.be/vCz10U5SX3g?si=Eb_YZGXLsNhQHHja

-भक्ती






Thursday, July 11, 2024

केरळीफूड

 


#केरळीफूड

#अप्पलम

#पायसम

तर काय झालं,जवळच केरळाहून महाराष्ट्रात स्थायिक झालेल्यांच एक स्टेशनरी दुकान आहे.तिथे गेले असता ते फणसाचे वेफर्स पैकिंग करतांना दिसले.तेव्हा त्यांनी इतर केरळी खाद्यपदार्थही दाखवले.मग फणसाचे वेफर्स,राईस गुलगुलासारखा केक,दह्यातल्या खारावलेल्या तिखटजाळ मिरच्या,फुलाच्या आकाराचे मुरूक्कू,पिवळे लांबसर चिरोटे,काळ्या तिळाचे लाडू,लालसर तुकडा तांदूळ,तांदळाचा पुट्टू असे पदार्थ एक एक करत चव घेतली.तिथूनच  वाटीच्या आकाराचे पापड जे उडीद आणि तांदूळ  मिक्सचे असतात ते घेतले.म्हटल पापडासारखे पापड असतील.भाजून पाहिले अजिबात भाजले गेले नाही जळायचे.मग तळून पाहिले तर छान पुरी सारखे टम्म ,खुशखुशीत फुगले.पण हे प्लेन असल्याने नुसते खाण्यात मज्जा येईना‌.मग एक केरळी भटकंती ब्लॉगहून समजलं की ते कसे खायचे😄

तर त्यासाठी केला शेवयाचा पायसम(मी अधिक खोदाखोद न करता खीरीसारखाच बनवला 😅)

मग काय ते अप्पलम(प्लेन पापड)तळला.केळीच्या पानावर आधी अप्पलम ठेवला त्यावर शेवय्या पायसम टाकला,परत अप्पलम परत पायसम 😄शेवटी केळ कुस्करून त्यात घेतले.खुसखुशीत पापड कुडुडुम त्यात क्रश केला.... अहाहा काय ती चव👌🏻😋

खरच कसं खायचं हे शिकवावं लागते कधी कधी😂

पुट्टू कसा खायचा याची कथा पुढच्यावेळी 😊

-भक्ती

Sunday, July 7, 2024

कृष्णाच्या गोष्टी-६

 #कृष्णाच्यागोष्टी६

*बलराम कृष्ण हरी शिक्षण



बालपण आणि किशोर अवस्था ही नंदाघरी गोकुळात गेले. या काळातले कृष्ण बलरामांचे आणि शास्त्रोक्त व धार्मिक संस्कार झाले नव्हते ते आता कुलगुरू गर्गाचार्यांनी केले.धर्माशस्त्रानुसार मौंजीबंधनाची वयमर्यादा २२ असल्याने मुंजी उरकून रामकृष्णांना सांदिपनी यांच्या अवंतीनगराजवळील आश्रमात वेदाध्ययनार्थ पाठविले.तिथे फक्त ६४ दिवसांमध्ये दिवसांमध्ये  सारी विद्या हस्तगत करून मथुरेला परतले हे पुराणात लिहिले आहे.या व्यतिरिक्त राम कृष्णाच्या शिक्षणसंबंधी इतरत्र उल्लेख आढळत नाही. बंकिमचंद्र लिहितात, कदाचित शिक्षणाचे वय होण्याआधीच ते मथुरेत राहायला आले असावेत कारण महाभारतात सभापर्वात शिशुपालकृत कृष्ण निंदेमध्ये तो कृष्णाला "कंसाच्या अन्नावर वाढलेला असा त्याचा उल्लेख करतो" पुराणांतरीच्या गोपी स्त्रियांबरोबरच्या लीला काल्पनिकच आहेत याचा हा भक्कम पुरावा आहे.

 

तसेच कृष्णाच्या गुरु सांदिपनींच्या घरच्या शिक्षणाशिवाय कृष्ण वेदज्ञ आणि चांगला शिक्षित होतात याचा उल्लेख सभा बरोबर भीष्माने ३८ व्या अध्यायात केला आहे ,"वेद वेतांग विज्ञानं बलं चाप्यधिकं तथा..".

 तसेच महाभारतकालात जेव्हा कृष्ण अश्वत्थामाला म्हणतो "गुरुपुत्रा तुझ्या नृशन सकरणीने उत्तरेच्या गर्भातील बालक खालील मृत झाले असले तरी मी त्याला माझ्या तपबल्याने जिवंत करीन" महाभारत काळात तप या शब्दाचा अर्थ ध्यान धरणा असे नसून शिक्षण असा आहे. कृष्णाने हिमालयात जाऊन दहा वर्ष तपश्चर्या केली असा महाभारतात उल्लेख आहे. तसेच पांडव बारा वर्षे वनवासात असताना कृष्णाने त्या बारा वर्षात विविध वेदविद्या ऋषींना द्वारकेत निमंत्रित करून त्यांच्याकडून वेद उपनिषदे यांचे शिक्षण घेतले त्याचा उल्लेख कृष्ण चरित्रात सापडतो.


 *जरासंधाचे मथुरेवर हल्ले


 कंसवधानंतर  कंस विधवा अस्ती आणि प्राप्ती यांनी साधारण वर्षभरानंतर आपल्या वडिलांकडे परत जाण्याची परवानगी मागितली. त्यांच्याकडूनच जरासंधाला मथुरेची इत्थंभूत माहिती समजली. यादवांतील कुलसंघामध्ये भेद निर्माण करून तेही राज्य आपल्या साम्राज्यांना जोडण्याचे स्वप्न कृष्णाने पार धुळीला मिळवले होते. मुलींच्या तोंडून मथुरेमध्ये उग्रसेनापेक्षा रामकृष्णाचे प्रस्ताव अधिक वाढल्याचे कळून मोठ्या सेनेसह हल्ला करण्याचा निर्णय जरासंधाने घेतला. जरासंधाने एकापाठोपाठ एक अशा सतरा स्वाऱ्या केल्याचे हरिवंशकार आणि इतर पुराणांनी म्हटले आहे. महाभारतात २७ आक्रमणांचा उल्लेख नाही परंतु एका हल्ल्यामध्ये त्याचा संघाने जवळपास २७ दिवस मथुरेवर वेढा केला होता.


 हरिवंश याप्रमाणे सतराव्या हल्ल्याच्या वेळी बलरामाचे डिंभक नावाच्या जरासंधाच्या सेनापतीशी युद्ध जुंपले. त्यात तो बेशुद्ध झाला परंतु डिंभक मारला गेला अशी सैन्यामध्ये अफवा उडाली. तर दुसऱ्या आघाडीवर डिंभकाचा मित्र हंस हा होता. डिंभक लढाईत मृत्यूमुखी पडल्याचे ऐकून विव्हल झालेला हंसाने शेजारून वाहणाऱ्या यमुनेमध्ये उडी मारली. थोड्यावेळाने डिंभक शुद्धीवर आला तेव्हा हंसाच्या आत्महत्याचे वृत्त समजतात त्यांनी देखील यामुळे जलसमाधी घेतली. महाभारतात यादव जरासंध संघर्षाचा उल्लेख येतो, तोही एवढाच किती वर्षे जरी यादव जरासंधाशी लढत राहिले असते, तरीही त्याच्या अफाट सैन्याचा संहार करू शकले नसते. हंस डिंभक यांच्या विचित्र मृत्यूची बातमी ऐकून जरासंध विमनस्क झाला व तेथून वेढा उठवून तो परत मगधला परतला. 


परंतु जरासंधाच्या  वेढ्यामुळे मथुरावासी त्रस्त झाले.तेव्हा एका सभेत आपले विचार मांडताना विकद्रू नामक एक वयोवृद्ध मत्सक्ती म्हणाला मागच्या लढाईत खूप माणसे मारली गेल्याने त्यांची जिद्द ही हरवले आहे अशा स्थितीत मथुरा जरा समजा मथुरा जरासंध्याला तोड द्यायला समर्थ आहे रामकृष्णांच्या पराक्रमाबद्दल आमच्या मनात अजिबात संशय नाही पण खरे तर जरा सुंदर राम कृष्ण वर संतापला आहे तेव्हा मला असे वाटते त्या दोघांनी काही दिवस मथुरा सोडून गेले तर मथुरेवर जरासंधाची धाड पडणार नाही. त्यांनी दक्षिणेत जावे.दक्षिणेत यादवांची चार राज्य आहे त्यांनी कुठेही राहावे आणि जरासंध जरा थंडावला की परत यावे. 


कृष्णाने हे मान्य करून दक्षिणेला प्रवास सुरू केला दक्षिणेच्या प्रवासात सह्याद्रीमध्ये वेण्णा नदीच्या परिसरात त्यांना भगवान परशुराम भेटला. त्यांनी आणखी दक्षिणेला जाऊन राम कृष्णांनी गोमांतक पर्वतात आश्रय घ्यावा हे सांगितले. गोमंतक म्हणजे हल्लीच्या काठेवाडातील गिरनार पर्वत असे म्हटलेले आहे. आपण सैन्यासह जरासंध मथुरेला हल्ला करण्यासाठी आला होता. परंतु राम कृष्ण हे मथुरा सोडून दक्षिणेकडे गेल्याची, गोमंतक पर्वताच्या झाडीत आश्रय घेतल्याचे समजल्यावर जरासंधाने आपल्या अफाट सैन्याची गोमांतककडे चाल केली. पण जरासंधसोबत असलेल्या चेदिराज दमणघोषाने  या संदर्भात सल्ला दिला की कृष्ण परत बाहेर येण्याची वेढा घालून एक दिवस वाट बघत बसण्याऐवजी आपण चारी बाजूने पर्वत पेटवून द्यावे. म्हणजे एकदा झाडे जळाली की आत लपून बसले असतील तर जळून जातील किंवा पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास अलगत आपल्या हाती पडतील. अशा रीतीने पर्वताला आग लावली समुद्रावर येणाऱ्या वार्यामुळे ती आग चांगलीच भडकली. 

झाडे जळाली, खनिजे वितळली त्यांचे लोण उतारावरून वाहू लागले. आसमंत धुराने भरून गेला .या आगीचा दाह सैन्यालाही सहन होईना. म्हणून जरासंधा सैन्यासह अर्धा कोसमागे हटले. परंतु तरीही रामकृष्ण तेथून निसटले.मथुरेला परतले. 


मथुरेकडे परत येत असताना वाटेत कृष्ण राम- यांना करवीर पूर्णावाची नगरी लागली. कंसासारखा शृगाल नावाचा एक बलदंड यादव तेथे राज्य करत होता. कृष्णाला त्याने द्वंद्वाचे आव्हान दिले. व 

कृष्णाने सुदर्शन चक्र वापरून त्याला मारले. कृष्णाचे सुदर्शन चक्र म्हणजे धारदार पाती बसविल्याने आणि तुंब्यामध्ये दोरी अडकून देखील मारल्यानंतर परत येणारे बूमरंग सारखे एखादे शस्त्र असावे असे डॉ. शं.के पेंडसे यांनी आपल्या महाभारतातील व्यक्तिदर्शन या ग्रंथातील कृष्ण लेखांमध्ये लिहिले आहे. तर कै.घैसास म्हणण्यानुसार सुदर्शन म्हणजे सैनिकांच्या एक पथक ज्यात २०० बलदंड असलेले सशस्त्र कमांडोज यांचा पोशाख श्रीकृष्णासारखाच असे. तर ते श्रीकृष्णापाठी व सातत्याने राहत असणारे संरक्षक पथक असावी. करवीर गादीवर त्याचा पुत्र शक्रदेव याला बसवण्याची आज्ञा  शृगालची विधवा राणी पद्मावतीला हिला देऊन वाटेत चेदिराज दमणघोष याच्या राजधानीत आपल्या आत्याकडे एक दिवस राहून कृष्ण बलराम मथुरेला परतले‌. 


दक्षिणेच्या खडतर स्वारी मुळे जरासंध देखील हैराण झाला होता. त्यामुळे तो आणखीन तीन चार वर्षे मथुरेकडे येणार नाही हे निश्चित होते. याच काळात कृष्णाने पश्चिम किनाऱ्यावरील रवैतक पर्वताजवळ असणाऱ्या आनर्त राजाची मैत्री केली, राजाने मैत्री शिरोधार्य तर मानलीच पण बलरामाला रेवती नामक आपली एक कन्या देऊन यादवांशी आपले नातेसंबंध प्रस्थापित केले .


श्रीकृष्णाने याच पश्चिमेकडील समुद्रकिनाऱ्यावरील नैसर्गिक संपत्तीच्या दृष्टीने अत्यंत सुंदर भागात अशा कुशस्थली नावांचा ठिकाणी बारा योजने लांब आणि बारा योजने रुंद अशी एक नगरी बांधून काढण्याचे ठरवले आणि याच नगरीला द्वारावती किंवा द्वारका असे नाव ठेवायचे ठरवले.


*रुक्मिणी स्वयंवर 

विदर्भ राज भीष्मक याची सुंदर कन्या रुक्मिणी हिचे एक कुंडीनपुरी स्वयंवर नियोजित झाल्याचे आणि त्यासाठी भारतातील विविध भागातील राजे निमंत्रण केल्याची बातमी कृष्णाला समजली.पण मथुरेला या स्वयंवराचे निमंत्रण नव्हते त्यामुळे तो संतापला. कुंडीनपुरापासून काही अंतरावर सैन्याची छावणी टाकून कृष्णाने स्वतःचा मित्र क्रथ आणि कैशिक नामक राजांच्या छावणीत आपला मुक्काम ठेवला. सम्राट जरासंधाने या सभेत कृष्ण आला म्हणजे संघर्ष आढळ ही गोष्ट स्पष्ट केली व निमंत्रण नसतांनाही तो येथे आला म्हणजे तो विदर्भ राजकन्येच्या मोहाने आला आहे निश्चित‌ म्हणून आपण युद्धाला  सज्ज होणे आवश्यक आहे असे तो म्हणाला. युवराज रुक्मी यानेच या स्वयंवराचा घाट घातला होता.कृष्णविरोधी मंडळाचे दोन तांत्रिक मुद्दे होते एक म्हणजे कृष्ण हा अनाहूतपणे येथे आला आणि दुसरा म्हणजे तो 'राजा' नव्हता. त्यामुळे क्रथ आणि कैशिकांनी त्याच सभेत आपले राज्य आपणहून कृष्णाला देत असून त्याचा राज्याभिषेक उद्या सकाळी स्वयंवरापूर्वी आपल्या छावणीत होईल हे जाहीर केले. त्सर्वांना कृष्णाच्या राज्याभिषेकाचा निमंत्रण दिले तरी जरासंध, शिशुपाल, रुक्मी आणि शाल्व यांच्याशिवाय  सर्व राजे दुसऱ्या दिवशी कृष्णाच्या राज्याभिषेकाला हजर होते. राज्याभिषेकानंतर भीष्मकाने त्याला स्वयंवराचे निमंत्रण न पाठवल्याबद्दल त्याची माफी मागितली. रुक्मीने मला न विचारताच बहिणीचा स्वयंवर ठरवून ही निमंत्रण पाठवली. त्यामुळे कृष्ण म्हणाला मी येथे यावे असे तुला वाटत नव्हते म्हणूनच काल येथे आलो तेव्हा माझे स्वागत करायला तू आला नाही. मी स्वयंवराचा समारंभ पाहण्यासाठी मी आलो होतो. तुझी मुलगी सुंदर आहे हे ऐकले होते पण त्यासाठी मी स्वयंवर मंडपात शिरलो नसतो कारण तिथे आगंतूक म्हणून माझा अपमान झाला असता. यावर भीष्मकने स्वयंवर पद्धतीने मुलीचा विवाह करण्याची इच्छा नसल्याचे जाहीर केले व राजांची माफी मागितली.त्यावर कृष्णाने व इतर राज्याने लगेच तातडीने आपापल्या राज्यात प्रयाण केले.स्वयंवर मोडले. या साऱ्या घटना एकूण राजकन्या रुक्मिणी वैतागली.कृष्णाने वडिलांना आपली इच्छा असल्यास आपल्या विवाहाबद्दल इच्छा व्यक्त केली आहे ही बातमी तिला मिळाली होती त्यामुळे कृष्णालाच वर करण्याचे मनात ठरवले होते.जरासंध पाईक असलेल्या मोठ्या भावाला रुक्मीला ते आवडले नाही तो संतापला. जनसंघाच्या आज्ञाप्रमाणे वाकडी पाठ करून तो शाल्व व कालयवनाच्या भेटीला निघाला.


*राजधानी बदलली



 राजधानीसाठी आनर्तच्या दक्षिणेला एखादे स्थळ निवडण्याची आज्ञा गरुड नामक एका पाहणीकार तज्ञाला केली.रैवतक पर्वतानजीक असलेल्या कुशस्थली नामकरण एका स्थळाची गरुडाने निवड ही केली. मथुरेच्या पश्चिम भागात शाल्व व कालयवन आणि दुसऱ्या बाजूने जरासंध आणि त्याचे मित्र राजे स्वारी संघटित करत होते. ही बातमी कृष्णाला कळाली आणि नवी राजधानी बांधण्याचे काम झपाट्याने पूर्ण करून यादवांची राजधानी मथुरेतून नव्या द्वारावती किंवा द्वारका नामक नगरीत हालवण्यासाठी यादव गण प्रमुखांची संमतीही कृष्णाने मिळवली. कृष्णाच्या द्वारका नगरीच्या प्रकाराच्या भिंती आणि नौकांच्या नांगराचे अवशेष पाहता द्वारका ही त्या प्राचीन काळातील बंदर असावे .आणि तिथून भारताचा परदेशांशी व्यापार चालत असावा असा अंदाज व्यक्त केला गेला आहे .त्या काळात भारताचे प्रवेशद्वार म्हणून या शहराला द्वारका असे नाव पडलेले असावे. द्वारकेत सापडलेल्या एका अत्तराच्या कूपिचे रासायनिक परीक्षण केल्यावर त्या काळातील लोकांना मातीच्या भांड्यावर चमकदार मुलामा देण्याची कला अवगत होती असे दिसते. तेथे सापडलेल्या धातूंच्या तुकड्यांचे परीक्षण केले असता. यांना धातू मिश्रणाचे तंत्र चांगले अवगत होते असा दिसते. यावरून पुराणात व महाभारतात वर्णन केलेली शस्त्र हे खरोखरच अस्तित्वात असावी व ती बनवणारे आणि वापरणारे तज्ञ तंत्रज्ञान काळात होऊन गेले असावेत हे अनुमान काढता येते.

 आता समुद्रवलयांकित द्वारकेला वेगळी सुरक्षा लाभली. रस्ते, बागा, पोहण्याचे तलाव, इंद्र सभेच्या धरतीचे सुधर्म नावाचे गणप्रमुख जमण्याचे सभागृह, विविध कुलप्रमुखांचे राहण्याचे महाल, राण्यांचे महाल बाजारपेठा वगैरे वास्तू उभ्या केल्या. द्वारावती जणू इंद्रपुरी सारखी सजली. द्वारकेचे कृष्णकालीन नाव शंखद्वार होते. येथेच पंचजन असूराला मारून कृष्णाने सांदीपनी याच्या मुलाला सोडविले आणि आपला पांचजन्य नावाचा सुविख्यात शंख मिळवला.


*कालयवन वध



 दोन भिन्न दिशांनी कालयवनाच्या आणि जरासंधाच्या अफाट सेना मथुरे कडे प्रयाण करत असल्याची बातमी कृष्णाच्या कानावर येत होती. त्यामुळे मथुरावासियांना द्वारकेमध्ये सुस्थितीत करून थोड्या सैनिकांसह कृष्ण मथुरे कडे परतला. मूठभर सैनेशी मुकाबला करणे शक्य नव्हते म्हणून कृष्णाने मंत्र युद्धाचा (गनिमी कावा) आश्रय घेण्याचे ठरवले .कालमवनाच्या मदतीला शक,तुखर,दरद,तंगन,पारद अशा अनेक डोंगरी व आदिवासी आनार्य जमातींच्या टोळ्या आल्या होत्या. कालयवनाच्या दृष्टीस पडेल अशा तऱ्हेने कृष्ण पळू लागला. आपले अफाट सैन्य आणि दरारा यांना घाबरून हा प्रख्यात गवळी योद्धा घाबरलेला दिसतो आहे असे कालयवनाला वाटले. कृष्णाने त्याला चकवीत हिमालयाच्या डोंगर रांगांमध्ये नेले आणि सुविख्यात सम्राट मांधात्याचा पुत्र मुचकुंद तेथे शांतपणे झोपला होता त्या गुहेत आणले. कृष्ण झोपेचे सोंग करून पडला आहे असे वाटून कालयवनाने झोपलेल्या मुचकुंद ऋषींना लाथ मारली.त्याने रागाने डोळे उघडून पाहिले कालयवन त्याच्या दृष्टीस पडला त्याची जळून राख झाली. कालयवन मारला गेल्याची बातमी सैन्यात वनव्यासारखी पसरली आणि ते घाबरून सैरावैरा पळू लागले.मोहीम सोडून जरासंध पळाला ही बातमी समजली आणि कृष्ण मनापासून हसला, सुखावला आणि द्वारकेला परतला.


*रुक्मिणी हरण



 जरासंध्याच्या सल्ल्याने युवराज रुक्मीने आपल्या बहिणीचे  जरासंधाचा सेनापती चेदीराज शिशुपालाशी विवाह ठरवला दिन ही ठरवला. देशोदेशी लग्नाची निमंत्रणे पाठवली. रुक्मिणी कृष्णा मध्ये पूर्ण गुंतल्याची कल्पना आल्यामुळे कृष्णाची नव्याने कुरापत काढण्याचा हा प्रकार होता. शिशुपाल हा कृष्णाचा आते भाऊ असल्याकारणाने लग्नाचे निमंत्रण द्वारकेलाही श्रीकृष्णाला मिळाले होते. लग्नाच्या दिवशी विदर्भ राजघराण्याच्या प्रथेप्रमाणे नगरवेशीवरील इंद्र आणि इंद्राणीच्या मंदिरामध्ये जाऊन राजवधुने आपल्या वैवाहिक जीवनासाठी इंद्राणीचे आशीर्वाद घ्यायचे होते. त्यासाठी त्या सकाळी राजकन्या रुक्मिणी आपल्या शरीर रक्षकांसह गावाबाहेरील मंदिरात पोहोचली. राजकन्येच्या दर्शनात निमंत्रिकतांपैकी काही राजही त्या स्थळी उपस्थित होते.इंद्राणीची पूजा बांधून रुक्मिणी मंदिराबाहेर पडते तोच कृष्णाने आपल्या रथात तिला उचलून वेगाने घेऊन मथुरेच्या दिशेने प्रयाण  केले.कृष्णाला शरीरक्षकांनी अडवण्याचे प्रयत्न फोल झाले. जवळच असलेल्या बलराम आणि यादव सैन्याने त्यांचा केव्हाच फडशा पाडला.रुक्मीला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा तो संतापला आणि कृष्णाला ठार मारल्याशिवाय आपण कुंडीनपुरात प्रवेश करणार नाही अशी प्रतिज्ञा करून मित्रांसह कृष्णाचा पाठलाग करत निघाला. 


कृष्णाला त्याने लवकरच गाठले. रुक्मी हा अतिशय घमंडी होता आपल्या शौर्याचा त्याला मोठा अभिमान होता. त्यामुळे त्यांनी कृष्णाला द्वंद्वाचे आव्हान दिले कृष्णाने क्षणात त्याचा पराभव केला आणि त्याला बेशुद्ध केले. रुक्मिणीच्या विनंतीनुसार त्याच्या ज्येष्ठ बंधूंना न मारता त्याला बेशुद्ध अवस्थेत तिथेच टाकून रुक्मिणी सह कृष्ण द्वारकेस निघून गेला. 



आणि बलराम ही लवकरच द्वारकेला परतल्यावर द्वारकेत कृष्ण आणि रुक्मिणीचा विवाह मोठ्या धुमधडाक्याने साजरा झाला. रुक्मिला त्याच्या मित्रांनी कुंडीनपुराला परत नेले पण राजधानीत न येण्याची त्याची प्रतिज्ञा त्यांनी पूर्ण केली व भोजकट नावाची एक वेगळी नगरी बसून तेथे तो जन्मभर राहिला .महाभारतातील रुक्मिणी हरणाची कथा नाही सभापर्वत पण उद्योगपर्वात रुक्मिणी हरणाचा उल्लेख नसला तरी युद्धाचा संदर्भ येतो. बकीम चंद्रांच्या मते रुक्मिणी हरण झालीच नसावे.आपल्या वडिलांच्या संमतीने रुक्मिणीने आपल्या प्रियकृष्णाशी विवाह केला असावा. रुक्मी शिशुपाल आणि जरासंध यांच्यामुळे त्यांनी या प्रसंगाचे भांडण उभे करून युद्धाचा प्रसंग आणला असावा.


*कृष्णाचे वैवाहिक जीवन 

कृष्णाच्या इतर नायिकांची नावे अशी सत्यभामा, सत्या, सुदत्ता किंवा भद्रा ,लक्ष्मणा जांबवती ,मित्रविंदा आणि कालिंदी यापैकी सर्वजणी कृष्णाच्या पराक्रमावर व देखणेपणावर भाळून त्याच्या प्रेमात पडल्या होत्या .



एक दोघींना तर त्यांच्या स्वयंवरातील पण जिंकून कृष्णाने मिळवले होते तर सत्यभामा आणि जांबवती विशिष्ट परिस्थितीत त्यांच्या आई-वडिलांनी कृष्णाला अर्पण केल्या होत्या.

सत्या ही कोसल राज नग्नजीत याची कन्या कोसल राजाने नग्नजीताचे स्वयंवर मांडले पण विचित्र पण लावला होता. जो एकाच वेळी सात मस्त बैलांना नामोहरम करण्याचा पराक्रम करेल त्यालाच आपण जिंकता येईल. बालपण गौळ वाड्यात गेल्याने कृष्णाने सहज हा पराक्रम करून दाखवून सत्या मिळवली.

भद्रा अथवा सुदत्ता ही तर कृष्णाची आते बहीण काय काय राजाशिबी आत्या श्रुतकीर्ती यांची मुलगी तिचे लहानपणापासून कृष्णावर प्रेम होते. लक्ष्मणा ही भद्र देशाची राजधानी राजकन्या तिच्या स्वयंवरात फिरत्या दारू यंत्राचे छतावरील आरशात पडलेले प्रतिबिंब खाली ठेवलेल्या पाण्यात पाहून दारू यंत्राचा बाणाने वेध घ्यायचा होता. कृष्णाने हा कठीण पण देखील सहज जिंकला.

मित्रविंदा ही कृष्णाची आते बहीण अवंती राजाची आणि आत्या राजाधिदेवीची मुलगी!तिच्या स्वयंवराच्या वेळी विंद आणि अनुविंद या तिच्या भावांनी एक युद्ध पुकारले ते दुर्योधनाचे मित्र होते. या युद्धात त्यांचा पराभव करून कृष्णाने मित्रविंदाला घरी आणले.

कालिंदी यमुनाकाठच्या आरण्यात आश्रम करून राहिलेल्या एका यतीची मुलगी! कृष्ण एकदा यमुना काठच्या जंगलात शिकारीला गेला असता कालिंदी त्याच्या दृष्टीस पडली व कृष्ण तिला पाहून मोहित झाला. कालिंदीही त्याला पाहून मोहित झाली.कृष्णाने यतीच्या विनंतीला मान देऊन तिच्याशी विवाह केला त्यामुळे जंगलातील अनेक आदिवासी जमाती कृष्णभक्त झाल्या.


संदर्भ -शोध कृष्णाचा प्रवासी पूर्णत्वाचा 

लेखक प्रा डॉ राम बिवलकर

Thursday, July 4, 2024

कारलं माझ्या आवडीच!



जगातील सगळं सुख एकीकडे आणि परफेक्ट कारल्याची भाजी करण्याचं सुख एकीकडे!! 😊
किंचित कडू -गोट-आंबट-ठसकेदार-चमचमीत!
जीभेच्या रसना तृप्त करणारी!
शरीरालाही गुणकारी!

कृती-
१.कारल्याच्या गोल चकत्या प्रमाणे  फोडी करा.एका कारल्याच्या पाच फोडी होतील.देठ आणि शेंड्याकडचा भाग काढून टाकायचा.
२.त्या फोडीतील बिया काढून टाकाव्यात.कारल्याच्या फोडी आता पोकळ असतील.
३.त्या फोडींना हळद,मीठ,लिंबाचा रस(२-३ लिंबाचा)लावून वीस मिनिटे  तशाच ठेवाव्या.
४.नंतर उकळी आलेल्या पाण्यात त्या मध्यम शिजवाव्या.
५.मसाला-एक मोठी वाटी दाण्याचा कूट,अर्धी वाटी तिळाचा कूट,दोन चमचे तिखट,एक चमचा कोणताही आवडीचा मसाला,अर्धी वाटी चिरलेला गूळ,चिरलेली कोथिंबीर,मीठ ,किंचित लिंबू पिळावे.हा कोरडा मसाला तेलात एकत्र करावा.
६.कारल्याच्या फोडींत तो भरावा किंवा फोडी या मसाल्यात घोळून घ्याव्यात.
७.तेलात मोहरी जिर्याची तडतडीत फोडणी करावी.त्यात भरलेल्या कारल्याच्या फोडी चांगल्या परताव्यात.अर्धा फुलपात्र पाणी टाकून मंद आचेवर भाजी वाफवून घ्यावी.

कडू कारलं साखरेत घोळले,तुपात तळले तरी ते कडू ते कडू,असं म्हणत उगाच त्याला चिडवू नये😄

अशी भाजी करून कारल्याविषयक सकारात्मकता पसरवा😜
तुम्ही कारल्याची भाजी कशी करता?