Tuesday, July 18, 2023

चीझी पालक मका

 चीझी पालक मका 





पालकावर माझा विशेष लोभ आहे.पण आतापर्यंत तो पाण्यात उकळून प्युरी करत धपाटे,पुरी,पालक पनीर,पालक इडली -डोसा,पालक चिला असेच बनवले आहे.नुसता न उकळता चिरून पीठ पेरून भाजी घाईच्या वेळेत होते.डायट पाळणं सात दिवस झालं जमलंच नाही.

मका होता पालक होता.न उकळता फक्त  पालक चिरून तेव्हा झटपट रेसिपी केली.

साहित्य -दोन वाटी उकडलेले मक्याचे दाणे,अर्धी जुडी चिरलेला पालक, अर्धा चिरलेला कांदा, लसूण, एक चमचा मैदा,तीन चमचे दूध ,२५ ग्रम चीझ,

एक चमचा हर्ब्स,तिखट , मीठ चवीनुसार,एक चमचा लिंबाचा रस.


कृती-

एक चमचा पनीर  कढईत टाकून गरम झाल्यावर बारीक लसूण फोडणीला दिला.कांदा परतून घेतला.मक्याचे दाणे परतले.हर्ब्स,तिखट मीठ टाकले.चिरलेला पालक फोडणीत टाकला.मक्याचा पिवळसर रंग आणि पालकाचा हिरवा रंग सुंदर दिसू लागला.यत एक चमचा मैदा आणि नंतर दूध घातले.एका वाफेनंतर किसलेले चीझ टाकले.हळूहळू चीझी स्टेक्चर आले.किंचित लिंबू पिळले.

याच पुढे ब्रेड टोस्ट करायचे होते पण ब्रेड विसरले.मग पोळीच तुपात गरम कळून हे चीझी मिश्रण त्यावर पसरून पोळीची घडी घालून कडक खरपूस भाजली.

लेकीला याचा मक्याचा गोड आणि मेल्टेड चीझचा यम्मी स्वाद आवडला.आणि तिच्या पोटात पालक गेला याच आई म्हणून समाधान मिळालं.

या मका पालक चीझी मिश्रणाचे स्प्रिंग रोलही बनवता येतात.झटपट भरपेट पदार्थ आहे.

-भक्ती

No comments: