Sunday, July 16, 2023

प्रकाशवाटा


 अमावस्येला आकाश काळ्या चादरीवर चांदण्यांचे बुट्टे लेवून असते. त्याचा सखा शशी आज दूर फिरायला गेलाय जणू! तेव्हा या आकाशाचे पृथ्वीच्या निजरातीशी हितगुज मनमोकळे होत असावे.

म्हणूनच का दिव्यांचे उत्सव त्या आकाशाचा एकाकीपणा घालवायला अमावस्येलाच असतात का?दीपअमावस्या ,दीपावली हे त्यातले उत्सव अग्नि तत्वाशी एकरूप!

मला जशी जाण आली तशी अनेक गोष्टी पंच तत्वाशी जोडायची सवयस जडली. दीपावलीला दिव्यांची रांग ओळ मांडताना ती संपूच असं वाटतं .सगळं जग लखलख उजळून निघताना मनातला अंधार नाहीसा होतो .तिथे एक दीप मंद तेवतो .

दीप अमावस्याचे तत्वही अग्नी! आधी त्या दिव्याला पितांबरी इतर अनेक गोष्टींनी घास घास घासून तो दिवा लख्ख दिसू पर्यंत चैनच पडत नाही. तेव्हा अनेक गोष्टी ज्या आत कुठेतरी मनाच्या, भावनांना तंतूत उगाच चिकटलेल्या आहेत त्याही याबरोबर निघून जाऊ पाहतात .नंतर तो स्वच्छ सुंदर दिवा सम ई पाहून प्रसन्न वाटते.तेल- तूप त्यात ओतताना तेल स्निग्धता देणारी माणसांनी असेच आयुष्य त्यांनी भरून जावे असे वाटते .कापसाच्या वातीचे वळण त्या तेलात सामावल्यावर मऊ होते माणसांची स्निगधता माझाही बिन कामाची सरळता एकरूप करावी असेच वाटते :).
वात प्रज्वलित होत असताना खाली वाहिलेले एक सुंदर फुल त्या अग्नी प्रकाशालाच सुगंधित भासवते.
त्या मंद मंद जळणाऱ्या दिव्या कडे पाहत त्याचे तेजोवलय पाहत आपल्याही भोवती एक सुंदर प्रकाश वलय कायमच असावा असेच वाटते.

त्या अग्नी तत्वाचे दिव्य अंश नेहमी आपल्या मार्गाला पुढे प्रकाशमान करत राहावं असंच वाटतं .
प्रकाशवाटा कायम लाभत राहो.
-भक्ती

No comments: