माझा साक्षात्कारी हृदयरोग
डॉ. अभय बंग
शोधग्राम, गडचिरोली येथील प्रसिद्ध सामाजिक नेते डॉ अभय नंग यांनी त्यांच्या हृदयरोगावर कशाप्रकारे काम करत यशस्वीपणे हा आजार दूर केला याबाबतचे 'माझा साक्षात्कारी हृदयरोग' हे पुस्तक आहे, जे अनेकांना प्रेरणा देणारे आहे.
पहिल्या 'आघात' प्रकरणात हृदयरोगाचा झटका (हार्टअॅटक) आल्यानंतर कशाप्रकारे दवाखान्यात पोहचेपर्यंत, पोहचल्यानंतरची धावपळ सांगितली आहे. यामध्ये अनेक वैदयकीय संज्ञा, वैदयकीय उपचारपद्धती या समजतात. शस्त्रक्रियेच्या दरम्यान(angioplasty )जेव्हा खुद्द डॉक्टरांचीच अभय बंग यांची हृदयाची नस फाटते. तेव्हा फारच भीती वाटते, डॉक्टरांना देखील 'अणुविसर्जनाची (मृत्यूची) वेळ आली आहे असे वाटते. मृत्यूबाबत 'अणुविसर्जन हा अनोखा शब्द छानच वाटला. [ पान नं. 32]
पुढच्या 'ऑर्निश'प्रकरणात ऑर्निशच्या शाकाहार, योगासने, शवासन, अध्यात्मिक समाधानावर आधारित उपचार पद्धतीचा अभय बंग यांनी हळूहळू कसा स्वीकार केला हे लिहिले आहे. यामध्ये 'भोजध्यान' जेवणाच्या सवयी, गरज नसताना जास्त खाणे, खाण्याचा खरा अस्वाद 'सुचवला.
याच प्रकरणात व्यायामाबाबत सांगतांना, चालण्याचा व्यायाम करताना हृदयगती कशी महत्त्वाची हे लिहिले आहे. तसेच पुढे ७.७ प्रकरणात चालण्याच्या व्यायामाच्या तीन Strolling, Brisk walking, Aerobic walking विषयी नवी माहिती मिळाली. या चढता क्रम सवय, नियमितपणाने प्राप्त करता येतो.
पुढील 'क्षणस्थ' हे प्रकरण अत्यंत सुंदर आल्हाददाय आहे. अध्यात्म ही या भूमीची/संस्कृतीची मोठी देणगी आहे.
परंतु या गोष्टी सध्याच्या धावपळीत अनेकांना अध्यात्म अगम्य वा वेळेचा अपव्यय वाटतो. परंतू माझ्या वैयक्तिक अनुभवानेही हे मान्य करते की, एकदा यातील साधनेची किल्ली गवसली की आपल्या गतीनुसार ही दिव्य शांती आयुष्य सुकर करते.
अभय बंग यांवर विनोबा भावे, महात्मा गांधी यांचा विशेष प्रभाव आहे. अभय बंग यांना विनोबा भावे यांचा मार्गदर्शक सहवासही आयुष्याचा प्रारंभी मिळाला आहे. त्याचमुळे या प्रकरणात विनोबांच्या लिखाणातील,आचरणातील 'गीतेतील तत्व डॉक्टरांच्या भाषेतून वाचायला मिळते. योगनिद्रा, ध्यान याचे महत्त्व यात अधोरेखित करताना 'स्वधर्म, म्हणजेच कर्म करण्याची चालना हेच निरोगी आयुष्याचे रहस्य अनेक उदाहरणांनी सांगितले आहे. मन एकाग्र करण्यासाठी 'स्वसंवेद्य सत्य' जागृत करणे व अनुभवणे म्हणजे काय याचा उहापोह आहे.
पुढील 'दर्शन' प्रकरणात विपश्यना त्राटक, श्रवण, मन केंद्रित करणे इ. ध्यानावर आधारित पद्धतीवर काम कसे झाले याचे अनुभव कथन आहे. यात अनेकदा भारतीय संत, साहित्यातील अध्यात्म - ध्यान अनुभव का सुंदर वचनांतून मांडला आहे.
स्वधर्म प्रकरणात अर्जुन विषाद या गीतेतील प्रकरणा प्रमाणेच आता काय करावे? युद्ध की निवृत्ती?असा प्रश्न हाताळला आहे.
अध्यात्माची गोडी लागली तरी संन्यास हा मार्ग कसा नाही हे सांगतांना 'स्वधर्म' म्हणजेच 'कर्म' करण्याचे महत्त्व आधुनिक पद्धतीने आहे. कर्म करताना ताण कसा दूर ठेवावा सांगितले आहे ,जो हृदयाला हानीकारक आहे. कर्मक्षेत्र व धर्मक्षेत्र एक झाल्यास ताणरहित, नैसर्गिक, अध्यात्मिक कर्म हे आपसुक प्राप्त होते हे सांगितले आहे.
शांती प्रकरणात
"मी अजूनही माझ्या मनाचे शेत नांगरत आहे पाऊस अजून पडलेला नाही. पण हे नांगरणच किती सुंदर अनुभव आहे! "
हे वाक्य खुपच आवडले.अनेक मोह,वासना,ताण हे ध्यान, वाचन, योग साधनेने दूर करणे ही खरच शांती मिळवण्याची नांगरणी आहे.
पुढच्या प्रकरणात व्यायामाची आहाराची यथोसांग वैज्ञानिक दृष्टीकोनातून उत्तम माहिती आहे . वजन, कोलेस्टेरॉल कमी करण्याच्या आहाराची माहिती आहे.
पुस्तकातील एक वाक्य खुपच गमतीशीर आहे.
"सर्वांना मी एकच शुभेच्छा देऊ शकतो, प्रत्येकाला एकदा तरी मृत्यूचं दर्शन अवश्य व्हावं."
खरोखर स्वानुभवातून मृत्यूच्या साक्षात्कारी अनुभव अभय बंग यांना आला व ते पूर्ण बदलले.
पण याची आपण वाट न पाहता यावर सदैव हृदयावर, आरोग्यावर काम करीत स्वधर्म पाळायला हवा.
-भक्ती

No comments:
Post a Comment