Friday, June 21, 2024

गोष्टीकृष्णाच्या १

 #गोष्टीकृष्णाच्या१

मला आवडतात गोष्टी वाचायला.आणि त्याजर मुळापर्यंत नेणाऱ्या असतील तर मनोरंजक वाटतात😄

फोटो -कृष्णा @मथुरा😊



कृष्ण जन्माच्या आधी एक साम्राज्यवादी नेता होता त्याचे नाव जरासंध व मगधचा राजा. तो पराक्रमी , ईश्वर पूजक होता. त्याने ८६ राजांना आपल्या पराक्रमाने जिंकून त्यांची राज्य आपल्या राज्याला जोडून आणि त्यांना कैद केले होते. आता ८६ मध्ये आणखीन १४ राज्यांना जिंकून त्याची संख्या १०० झाल्यावर तो 'शतराज शीर्षमेध' असा एक नरसंहार बेत शंकराला संतुष्ट करण्यासाठी करणार होता.विशेष म्हणजे यातील बरीच मंडळी जरासंध एवढीच दुष्ट होती. त्यामुळे दुष्ट राजांचा एक मोठा संघच देशात निर्माण झाला होता. ८६ मध्ये हस्तीनापुरातील राजा धृतराष्ट्र चे राज्य जरासंधाने जिंकलेले नव्हते अथवा त्यांचे मांडलिकत्व नव्हते. याचे कारण अर्थातच त्यांचा रक्षक म्हणजे भीष्म! भगवान परशुरामाशी युद्ध करणाऱ्या अशा भीष्माचा प्रताप सर्वत्र जाहीर होता. त्यामुळे जरासंधला हस्तिनापूरकडे पाहण्याचे धैर्य झाले नाही.


 कृष्णाचे कूळ

आर्यावर्तात म्हणजेच आजच्या उत्तर भारतात शूरसेन राज्य होते. या देशाचे राजधानीचे नाव होते मथुरा ती मूळची मधुपुरी म्हणून ओळखली जायची. ती आधी सूर्यवंशीय राजांची राजधानी होती परंतु कालंतराने ती चंद्रवंशीय यादवांची विविध कुलाची झाली. यादवांची विविध कुलांची छोटी छोटी गणराज्य या भागात प्रस्थापित होती. आपापल्या विविध सात गणराज्यात यांचे भाग होते. पण ते सर्व मथुरेचे मांडलिक होते. बहूम,कुकुर ,अंधक,दाशार्ह ,यादव,वृष्णी आणि भोज ही या संघांची नावे .


कृष्ण हा यादवांच्या कुळातील यदूपासून ४२ वा पुरुष होता. यदू हा ययाती आणि देवयानी यांचा पुत्र होता. कृष्णाच्या  आधी अंधकापैकी उग्रसेन हा मथुरेचा गणाध्यक्ष होता ,आपला मोठा भाऊ देवक याच्याशी कपटाने ते बळकावले होते. देवकाचे वृष्णी आणि शूरसेन हे दोन मित्र होते. मथुरेमध्ये अंधक आणि भोज यांची असलेली मोठेपणा शूरसेनाला मान्य नव्हता. त्याच दरम्यान उग्रसेनेने  वृष्णी प्रमुख अक्रुराचा विवाह त्याच्या आत्याची आहूकीशी लावला.


 देवक मथुरा सोडून शूरसेनकडे काही कामानिमित्त गेला होता. तेव्हा त्याला हद्दपार केल्याची अफवा पसरवण्यात आली. त्याच दरम्यान आहुक मरण पावला आणि त्यामुळे भोज आणि अंधक, आक्रुर सारख्या दृष्टीकुळातील प्रतिष्ठांच्या मदतीने उग्रसेनला मथुरेचा नवा राजा बनवलं आणि त्याचा बलदंड पुत्र कंस याला राजकुमार बनवलं.


देवकाला चार मुली आणि सात मुले होते. सर्वात  लहान देवकी. देवकाचा मित्र शूरसेनला वसुदेवासह दहा पुत्र होते आणि पाच मुली होत्या. त्यामुळे वसुदेव जावयाला आणखीन दोन मुली देवकाने दिल्या. 


मथुरेसाठी यादवांच्या या दोन कुलांमध्ये रस्सीखेच चालू होते. यात वसुदेवाचे पारडे जड होते त्याच्या पाच बहिणी परिसरातील पाच राज्यांना दिलेल्या होत्या यातील मोठी प्रथा म्हणजेच कुंती हस्तीनापुरच्या राजाला पांडूला, दुसरी सुतदेवा ही करुश याला, तिसरी श्रुतकीर्ती ही कैकेय राज्याला,चौथी श्रुतश्रवा ही चेदी राजाला आणि पाचवी राजाधिदेवी ही अवंती राजाला दिली होती.


 अशा परिस्थितीत देवक शूरसेन , वसुदेव मथुरा येथील भोजांचे व अंधकांचे वर्चस्व नष्ट करणार आहेत असे उग्रसेनाला वाटले आणि त्यामुळेच मगधराज जरासंधाने सुद्धा मथुरेत फुट पाडण्यासाठी अस्ति आणि प्राप्ती या आपल्या दोन मुली कंसाला दिल्या.


संदर्भ -शोध कृष्णाचा,पूर्णत्वाचा प्रवासी 


No comments: