Monday, September 10, 2007


असाच बरस रे
कधी वळव्यानी
कधी धो धो हस रे
तु असाच रोजच ये रे.......

धरतीची लेकरे
तुला मारती हाक रे
हिरवी झाडे कशी डोलती रे
तु असा सुखावुन जा रे......


चातकाची ही तहान रे
मोराचा मनमोहक नाच रे
प्रत्येकाच्या मनातील आस रे
तु असा देवदुत होउन धाव रे......

चिमणीच्या पंखाना ओले कर रे
कोरड्या मनाला न्हाऊ घाल रे
वाफ़ळलेल्या चहाच्या कपात थेंब टाक रे
तु असा अचानक धडक रे........

कधी खळखळ आवाज होईल रे
कधी 'धुडुम धुडुम'धबधबा उतरेल रे
पावसात नाचतानाचा नाद छुमछुम रे
तु असाच आनंद आण रे........

ओलेचिंब हा कवितेचा कागद रे
होडी त्याची केव्हाच झाली रे
अंगणातून वाहणार्‍या झर्‍यात रे
तु तिला दुर घेऊन जा रे....
तु असाच बरस रे
#भक्ती.











No comments: