Monday, September 10, 2007

गवसते.....


दुर झाडाच्या शीतल छायेत
मखमली हिरव्या गवताच्या सुखात
फ़ुलाच्या उडणार्‍या पाकळीच्या गन्धात
टप टपणार्‍या पावसाच्या प्रत्येक थेंबात
काहीतरी शोधताना मीच हरवते …..

वार्‍याच्या सुरेल दरवळणार्‍या स्वरात
सागराच्या भेटिला आतुर नदीत
फ़ुलपाखराच्या कोमल रंगेबेरंगी रंगात
स्वछ्न्द उडणार्‍या पाखराच्या भरारीत
काहीतरी शोधताना मीच हरवते…..

रात्रीच्या किर्र भासणार्‍या अंधारात
लुकलुकणार्‍या चांदणांच्या प्रकाशात
मनीच्या निळ्या निळ्या डोळ्यात
हसणार्‍या गुलाबाच्या गोड खळीत
काहीतरी शोधताना मीच हरवते ….

पण डोकवताना...
उफ़ळणार्‍या ज्वालामुखीच्या उदरात
एखाद्या उदास ह्रिदयस्पर्शी गीतात
बोचर्‍या काट्याच्या खिन्न आसवात
बुद्धाच्या त्या दुर्मिळ हास्यात.....
मी स्व:ताला पुन्हा पुन्हा गवसते.....

भक्ती.

No comments: