Saturday, February 15, 2025

गीतारहस्य -प्रकरण ३-कर्मयोगशास्त्र

 #गीतारहस्य 

#३

#कर्मयोगशास्त्र 



"तस्माद‌योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्"(गीता २.५०)


"म्हणून तू योगाचा आश्रय कर, कर्म करण्याची जी शैली, चातुर्य किंवा कुशलता त्यास योग म्हणतात."

योग शब्दाची व्याख्या लक्षण आहे.


कर्माकर्माच्या विवंचनेत अनेक अडचणी उद्‌भवतात, तेव्हा ते काम सोडून कर्माचा लोप न करता', योग' म्हणजे युक्ती शहाण्या पुरुषाने स्वीकारली पाहिजे, तुहि स्वीकार.

' तस्माद‌द्योगाय युज्यस्व' हे श्रीकृष्णाचे अर्जुनास प्रथम सांगणे आहे, आणि हा योग म्हणजे कर्मयोगशास्त्र होय.


#कर्म 

कर्म शब्द 'कृ' धातूपासून निघाला आहे. अर्थ- करणे, व्यापार हालचाल असा आहे.


वैदिकनुसार ही कर्म विभागणी


१.यज्ञार्थ (ऋत्वर्थ) श्रौत- स्वतंत्ररीत्या फल न देणारी अतएव अबंधक.

२.पुरुषार्थ - पुरुषाच्या फायद्याची अतएव बंधक संहिता, ब्राह्मण ग्रंथात या कर्माचे महत्त्व आहे

३.स्मार्त कर्म

उपनिषदांत ब्रम्हज्ञान प्राप्ती यज्ञाहून श्रेष्ठ मानली गेली. "यज्ञाथर्यात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धन यज्ञार्थ केलेली कर्म बंधक नाहीत, बाकीचीं सर्व कर्म बंधक आहेत.

याज्ञयागादि वैदिक कर्म म्हणजे स्मार्त कर्म तर याशिवाय दुसरे हि क्षत्रियास यु‌द्ध, वैश्यास वाणिज्य वगैरे ही कर्म

४.पौराणिक कर्म - केवल पुराणांतूनच पहिल्याने विस्ताराने प्रतिपादिली असलेली व्रत, उपोषण वगैरे कर्म.


*या कर्मांचे पुन्हा नित्य, नैमित्तिक काम्य आणि निषिद्ध हे भेद आहेत. 


पण गीतेचा मुख्य विषय केवळ ही कर्म इतका संकुचित नाही. प्रसंगानुसार 'जगणे किंवा मरणे' या दोन कर्मही कोणते पत्करावे याचाहि विचार करण्याची जरुरी पडते, तो कर्तव्यप्रती  विहितकर्म हा अर्थ होतो.


#योग - 

पातंजलसूत्रोक्त समाधि किंवा ध्यानयोग हा उपनिषदांतूनहि या शब्दाचा वापर होतो परंतू गीतेत हा अर्थ आणखी व्यापक आहे.

योग हा शब्द युज म्हणजे जोडणे या धातूपासून निघाला आहे. अर्थ - जोड, जुळणी, मिळवणी, संगति, एकत्रावस्थिती आहे. 


पुढे तशी स्थिती प्राप्त होण्याचा 'उपाय, साधन, युक्ति इलाज म्हणजे कर्म असाहि अर्थ आहे.


*एकोहि योगोऽस्य भवेद्वधाय'

 द्रोणाचार्याना जिंकण्याचा एकच मार्ग- योग (साधन, युक्ती) आहे हे कृष्णाने सांगितलेले आहेच. (मभाः द्रो. १८१.39)


गीतेत योग, योगी किंवा योगी शब्दापासून झालेले सामासिक शब्द सुमारे ८० वेळा आलेले आहेत. कोठेही ,चार-पाच ठिकाणी सोडता 'पातंजल योग' अर्थ अभिप्रेत नाही.


 "योगः कर्मसु कौशलम” [गीः २.५०]


योग म्हणजे कर्म करण्याची काही विशेष प्रकारची कुशलता, युक्ति वा चतुराई, शैली. उदा 'द्रव्यप्राप्तियोग'


पुढे जाऊन श्रीकृष्ण सांगतात योगस्थ होत आसक्ति सोडून कर्म कर (गी२.४१-४६,४८)


• योग म्हणजे सि‌द्धी व असिद्‌धी यांचे ठायी समत्वभाव फलाशने कर्म करण्यापेक्षा समत्वबुद्‌धीवा योगच श्रेष्ठ (गीता १. ४९)


*योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन (गी. ६.३)

ज्ञानप्राप्तीनंतर संन्यास आणि कर्मयोग या दोन मार्गाचा स्वीकार करावा हे वैदिक काळात सांगितले आहेच. [गी-५.२] सांख्ययोगौ या संज्ञा यालाच(ज्ञान-कर्म) उद्‌देशून आहेत (गी. ५.४).


म्हणूनच अर्जुनाला गीतेत वेळोवेळी योगी हो (गी २.४८,२.५०, ४.४२, 3.3.) हे जे सांगितले आहे, त्याच्या अर्थ तपस्वी । पातंजली योगी अशा नव्हे तर योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत' म्हणजे 'युक्तीने कर्म करणारा योगी- कर्मयोगी हो असा आहे. कर्मयोग या शब्दाऐवजी केवळ 'योग' हा शब्द महाभारतातही वापरला आहे.


ब्रम्हविद्यायां- योगशास्त्र यातील योगशास्त्र यालाच समानार्थी शब्द कर्मयोगशास्त्र गीतारहस्यामध्ये वापरला आहे.


#शास्त्र 

कर्म करण्याचे मार्ग ज्या शास्त्राद्‌वारे चांगले, वाईट इ. ठरवले जाते ते कर्मयोगशास्त्र. कोणत्याही कर्मार्ची शास्त्रातील विषयांची चर्चा तीन मार्गांनी होते.


१) आधिभौतिक - जड सृष्टीतील पदार्थ इंद्रियांना ज्याप्रमाणे प्राप्त होतात त्याचप्रमाणे ते आहेत-


उदा सूर्याचे वजन, अंतर, प्रकाश इ. गुणांचे परीक्षण करणे. 


२.आधिदैविक-जड सृष्टीतील पदार्थाच्या मुळाशी काय आहे, यामागे दुसरे काही तत्व आहे का?


उदा. सूर्याच्या गोळयात तदधिष्ठात्री सूर्य नावाची देवता आहे, हे मानले.


३.आध्यात्मिक विवेचन [metaphysical] - जड सृष्टीमध्ये हजारो जड पदार्थ हजारो देवता न मानता, सृष्टीचे व्यवहार चालवणारी व मनुष्याचे शरीरांत आत्मस्वरुपाने राहून त्याला सृष्टीचे ज्ञान देणारी एकच

इंद्रियातीत विचिच्छक्ति आहे. उदाः सूर्य, चंद्र आदिचे व्यवहार था अचिंत्य शक्तीच्या प्रेरणेने होते.


#धर्म

अर्जुनाला मी हे जे यु‌द्ध करीत आहे ते धर्म्य की अधर्म्य, पुण्य का पाप हा प्रश्न पडला. कोणते कर्म चांगले कोणते वाईट हे दाखविण्यासाठी धर्म आणि अधर्म या दोन शब्दांचा वापर झाला आहे.


'धर्म' हा शब्द पारलौकिक धर्म आणि व्यावहारिक धर्म म्हणजेच नीतीधर्म आणि धर्म हा एकेरी शब्द असा येतो.


समाजधारणा

धर्म या शब्दाचा व्यावहारिक दृष्टीने उपयोग 'सर्व समाजाचे धारण व पोषण कशाने होते हे आपण पाहतो. 


धर्म हा धृ = धारण करणे धातूपासून आला असून धमर्मानेच सर्व प्रजा बद्ध झालेली आहे, ज्याने सर्व प्रजेचे धारण होते तोच धर्म हा निश्चय होय.


धारणाद्‌धममित्याहु: धर्मा धारयते प्रजा: ।

यत्स्याद्‌धारणसंयुक्तं स धर्म इति निश्चय:|

(मभा.कर्ण ६९.५९.)


भारताअखेर व्यास म्हणतात -


उध्वबाहुर्विरोग्येषः नच कश्चिच्छ‌णोति माम

धर्मादर्शश्च कामश्च स धर्मः किं न सेव्यते ।


" अरे बाहू उभारून मी आक्रोश करीत आहे, (परंतू माझे कोणी ऐकत नाही। धर्मानेच अर्थ, धर्मानेच काम प्राप्त होतो,

(तर) असला धर्म तुम्ही का आचरीत नाही?


*आत्म्याचे कल्याण?

 पण हा कधी प्रक्टिकल बुद्‌धीबरोबर शुद्ध बुद्धी व्यावहारिक कर्माबरोबर (critique of Practical Reason) आत्म्याच्या चर्चा,

आधिभौतिक कर्माबरोबर अध्यात्मिक नीतीशास्त्राचा विचार व्हावा, हेही मत वेदांत व पाश्चात्य येथे या सांगितले आहे. विचारवंतांनी सांगितले आहे.


*धर्म शब्दाची दुसरी व्याख्या 'चोदनालक्षणोर्थो धर्म' चोदना म्हणजे प्रेरणा !

अर्थात कोणी तरी अधिकारी पुरुषाचे "तू अमुक कर" अगर "करू नकोस असे सांगणे वा आज्ञा करणे. परंतू स्वैर मनोवृत्तीस आळा घालणे असे जे धर्माचे लक्षण आहे (गी 3.38].


धर्म- आचारप्रभव, धारणात्, प्रेरणा लक्षण म्हणा.


*

काही सामान्यजण समाजातील महाजन शिष्टाचार पाळणाऱ्याा लोकांच्या मागे चालत राहतात.


"महाजनो येन गतः स पन्था" ही युक्ती सामान्यांसाठी जरी सोपी असली तरी त्याने निर्वाह न लागता अखेरीस महाजनांच्या वर्तनाचे खरे तत्त्व कितीही गूढ असले तरी आत्म ज्ञानात शिरून विचारी पुरुषांस तेच शोधून काढणे भाग पडले.


*तसेच कोणताही सद्‌‌गुण अति होऊ देऊ नये, कारण हाच पुढे दुर्गुण होऊ शकतो कर्मनिर्णयाची ही युक्ती आहे तसेच नेमस्तही होऊ नये.


अविरोधातू यो धर्म : स धर्मः सत्यविक्रम

 विरोधिषु महीपाल निश्चित्य गुरुलाघवम्

न बाधा विद्यते यत्र तं धर्म समुपाचरेत् ।


परस्परविरोधी धर्माचे तारतम्य किंवा लाघवगौरव,पाहूनच प्रसंगी आपल्या बुद्‌धीने खऱ्या धर्माचा किंवा कर्माचा निर्णय लागतो ( ममा. वन. १३१. ११, १२)


शास्त्र- अनेक शंका जेव्हा निघते तेव्हा मेंदूसमोरील ही गुंतागुंत काढून अर्थ सुगम करणे, डोळ्यासमोर घडणाऱ्या वा न घडणाऱ्या गोष्टींचे यथार्थ ज्ञान करुन देणे हे शास्त्राचे लक्षण आहे.


" अनेक संशयोच्छेदि परोक्षार्थस्य दर्शकम्"

Wednesday, February 12, 2025

सूर्य पाहिलेला माणूस

 


#सूर्यपाहिलेलामाणूस

#नाटक

मी एक ठार सूर्य वेडी आहे.दूर डोंगरावर जाऊन होणारा सूर्योदय पाहणं माझ्या आयुष्यातील मोलाचे क्षण आहेत.सूर्यनमस्काराने माझ्या शरीरातील चैतन्याचे नातं त्यांच्याभोवती फिरत राहतं.सर्वत्र त्यांच्या उष्णतेची दाहकता नाही तर ऊब..स्निग्ध ऊब सृष्टी धारण करत असते.खुप लहानपणीच मी 'सूर्य पाहिलेला माणूस ' या वेगळ्याच नावाच्या नाटकाने भारावले होते.लागूंचे ते पोस्टर पाहत मोठे झालं की हे नाटक पाहायला हवं अशी सुप्त इच्छा मनाच्या कोपऱ्यात रूजली होती.आयुष्यात काही अशा रूजलेल्या गोष्टी नक्कीच पूर्ण करायचा ध्यास हवा नाहीतर त्या हरवतात कायमच्या.. तसंच झालं हे नाटक प्रत्यक्ष पाहिले नाही.लागू गेल्यावर तर ..संपलच!

याच मनात रूजलेल्या गोष्टी मग तुम्हाला शोधत समोर येतात.तुमची दृष्टी आणि मन स्वच्छ करतात, शांती देतात.

तसेच हे नाटक परवा समोर युट्यूब वर मिळालं.अक्षरक्ष: पाहतांना खुपच आनंद वाटत होता.

सूर्य दृष्टी स्वच्छ करतो, वाटा उजळून टाकतो.पण तो सूर्य सगळ्यांच सहज मिळत नाही.त्यासाठी अंधाराशी लढा द्यावा लागतो तेही शहाणं होऊन पहिल्या तत्त्ववेत्तया प्रमाणे सॉक्रेटिस प्रमाणे.

त्याने पहिल्यांदा समाजातल्या 'अतिशहाण्या',अतिमानवी लोकांचा,लोकांना अंधारात ढकलणाऱ्या रूढींचा अंधार ओळखला.त्यातल्या स्वयंसूर्याने त्याच्या आभाळात प्रकाशाचे लयलूट केली.आणि हाच सूर्य त्याने प्लेटो, ज़ेनोफ़ोन, अरिस्टिपस, एल्सीबिएड्स, क्रिटियास यांना दिला.एक सूर्योदय झाला.. सगळ्यांसाठीच!

या सूर्य पाहिलेल्या लोकांतील संवाद,संभाषण पुढे अजरामर झाले.तरीही झांथिप्पिला तो अधिक समजला असेही शिष्य म्हणत राहिले,कारण सॉक्रेटिसच म्हणायचा ..

By all means marry. If you get a good wife, you'll be happy. If you get a bad one, you'll become a philosopher. Socrates.


पण असा तरूणाईलाच अतिमानवी ऐवजी साम्यक सूर्य देणारा कसा परवडणार अतिमानवी जणांना?खटला भरा, मृत्यू दंड द्या हा सोपा मार्ग.पण सॉक्रेटिस म्हणाला होता "मला असा दंड देऊ नका, पुढच्या अनेक पिढ्या या कृत्यावर प्रश्न करतील,मी अशा मरणाने मरणारच नाही"

पुढे त्याने शेवटच्या दिवशी तुरुंगातून पळवण्याची वाटही तो धुडकावून लावतो.मरणाला घाबरून पळू नयेच हे तो सांगतच होता.

सॉक्रेटिस सर्वात शहाणा आहे, कारण 'आपल्याला पूर्ण ज्ञान नाही' याचे त्याला ज्ञान आहे... सूर्याचा शोध ज्याने त्याने घेत राहावा,अगदी डोळे दिपतील इथपर्यंत..

-भक्ती

Sunday, February 9, 2025

फुलांचे हास्य, बहरलेली भाषा..



फुलांचे हास्य, बहरलेली भाषा..

फुल कधी आहे मागत नाही फक्त देण्याची त्यांची वृत्ती आहे,गोड मंद सुगंध,रंगाचे इंद्रधनू,कोवळा मकरंद, जीव लावणारं प्रेम!

सकाळी फिरून घरी येतांना अनेकांच्या दारात बहरलेली ही किमयागार फुलं दोन लोकांत हास्य उमलू देतात.

 खुपदा या फुलांच्या मालकांना विचारून फुलं घेते,आता न विचारताही त्यांचे हसू याची मूक परवानगी देतात.

शब्दांपेक्षा हास्याची भाषा मनाचा मृदू कोपरा उघडणारी आहे.

झालं असं की एक काकू आहेत, खुप काळापासून एकट्याच आहेत.त्यांच्या दारातला पारिजात त्यांना सुगंधाच्या राशींसह अंगणात केशरी गालिचा घालून देतो.ती प्राजक्ताची फुलं वेचतांना त्यांच एक हसू प्रेमाचा धागा विणत राहते.

एकदा बोगलविलाची लाल, गुलाबी,पांढरी,केशरी अशी भरपूर रंगांच्या फुलांच्या फांद्या घरी नेत होते.तेव्हा वाह! किती सुंदर कागदी फुलं आहे,असं म्हणत ररस्त्याभर खुप जणींच्या सुंदर हास्यांना निरखत जात होते.

रातराणीच्या मालकीण बाई लगबगीने फुलं देतांना खुप मोलाचं स्मित त्यांच्याबरोबर देतात.

कुंदा घ्या मालकीण बाई अजून घे गजरा होईल असा नाजूक नात्यांचा दोर विणतात.

आणि मग रोज डे ला विसरला ना,असं 'ह्यांना' लाडिक म्हणतांना रात्रीच पंधरा मिनिटे आसपास शोधून कोणत्या तरी झाडावरून गुलाब जणू टुणकन ह्याच्या हातात येतो!!

वसंत आता कुठे फुलायला लागलाय... अजून निर्मळ हास्याचा ऋतू खुप बहरणार आहे,मला अनोखी भाषा परत परत शिकवणार आहे...मी तय्यार आहे ❤️

-भक्ती

Monday, February 3, 2025

गीतारहस्य १.विषयप्रवेश आणि २.कर्मजिज्ञासा

 #गीतारहस्य१-कर्मयोगशास्त्र

१.विषयप्रवेश



अद्वैत मोक्ष द्वैत विशिष्टाद्वैत, पातंजलयोग हे निवृत्तिपर मार्ग गुलामी होती असे कोणी म्हटले तर ?

भगवद गीतेवर टीका | भाष्य लिहिण्याचा प्रत्येक सांप्रदायसाठी एक आवश्यक बाबच होती. पहिल्यांदा आदिशंकराचार्यानी मायावादात्मक अद्वैतवाद व

कर्मसंन्यास, श्रीरामानुजार्यानी मायासत्यत्त्वप्रतिपादक विशिष्टाद्वैत व वासुदेवभक्ती मध्वाचार्यानी है विष्णुभक्ती, श्री वल्लभाचार्याती शुद्धद्वैतावादद व शांकरद्वैत व भक्ति, ज्ञानदेवांचे पातंजलयोग व भक्ति किंवा नुसती भक्ती, नुसता योग अगर नुसते ब्रम्हज्ञान अनेक प्रकारचे केवळ निवृत्तीपर मोक्षधर्मच गीतेत प्रतिपादय आहेत, असा निरनिराळ्या सांप्रदायिक भाष्यकारांनी। टीकाकारांनी आपल्यापरी गीतार्थाचा निश्चय केला आहे.

भगवद्गीता कर्मयोग प्रधान । प्रवृत्तिपर आहे असे कोणीच का म्हणत नाही.

अशाप्रकारे १००० वर्ष गीता निवृतिपर (भक्ती । संन्याय मार्ग विविध सांप्रदायांनी दाखवून प्रवृत्तिपर गीतेला का पाहिलेनाही? हे परखड मत टिळकांना ठेवले आहे. 

 तसेच ग्रंथतात्पर्य 'उपक्रमोपसंहारो' म्हणजे ग्रंथाचा आरंभ व शेवट या दोन गोष्टी होत. परंतू अनेक टीकाकार सरळवाट सोडत अनेक वाटा घेत भक्ती ,योग ,निष्कामकर्म यांचाच उहापोह करीत आपआपल्या  सांप्रदायाचे अर्थवाद करीत  राहिले.

#गीतारहस्य२

#कर्मजिज्ञासा१.

पुढील प्रकरणात टिळकांनी कर्म करतांना अनेक नीती शास्त्रानुसार कशा करायच्या,पाळायच्या यांचा संभ्रम पडत असतो‌ तेव्हा अपवाद कसा ओळखावा हे सांगितले आहे.तेव्हा काळानुसार धर्म बदलतो.नीतीस अनेक अपवाद असतात.अर्थात ते समजण्यासाठी सूक्ष्म अभ्यास असावा अथवा कृष्ण साथीला हवा.

"सूक्ष्मा गतिर्हि धर्मस्य " - धर्माची तत्त्वे सूक्ष्म आहेत इतकेच नव्हे तर पुढे "बहुशाखा हह्मनंतिका " त्यास अनेक फाटे फुटलेले असून त्यापासून निष्पन्न होणारी अनुमानेही निरनिराळी असतात असे महाभारतात म्हटले आहे (वनः २०८.२) महाभारतात अशाच थोर पुरुषांच्या अनेक प्रसंगाचा, त्यांच्या वागण्याचा उहापोह कथा स्वरुपात केला आहे. हेच मर्म सामान्यांना, सामान्य मर्म शास्त्रीय विवेचनानंतर) अर्जुनाचा कर्तव्यमोह घालविण्याच्या निमित्ताने श्रीकृष्णांनी पूर्वी जो उपदेश केला त्या आधारे व्यासांनी भगवद्‌गीतेत प्रतिपादले आहे.

किं कर्म किमकर्मेति कवयोडप्यत्र मोहिता: । गीता ४१६

अर्थ-कर्म कोणते आणि अकर्म कोणते याबददल पंडितांनाहि मोह पडत असतो;

अकर्म - कर्माचा अभाव आणि वाईट कर्म

अर्जुनाला कर्तव्यजिज्ञासा व मोह युद्‌धारंभी झाला. तसेच कर्त्या पुरुषांवर पुरुषांवर पुष्कळदा असे प्रसंग येतो , हे करू का लेकरू असे विवंचनेचे प्रसंग येतात.

पुढे कर्मजिज्ञासा प्रकरणात अहिंसा, सत्य, अस्तेय (चोरी) कायावाचामनाची शु‌द्धता आणि इंद्रियनिग्रह या पाच नीतीधर्माची विश्लेषण मनुचे श्लोक, महाभारत, गीता, उपनिषदातील कथांद्‌वारे त्यातील अनुमानानुसार केले आहे.

**अहिंसा- हिंसा करु नये, हिंसा म्हणजे केवळ नुसता जीव घेण्यास होणेच नव्हे तर दुसऱ्या प्राण्यांचे मन किंवा शरीर यांस इजा करणे याचाहि त्यांत समविश होतो.

पण आत्मसंरक्षणासाठी आतातायी, अधर्मीच्या हत्येचे पाप लागत नसते. परंतू हवेत, पाण्यांत, फळांत वगैरे सर्व ठिकाणी जे शेकडों अत्यल्प जीव भरलेले आहेत त्यांची हत्या कशी बंद होणार?

सूक्ष्मयोनिनि भूतानि तर्कगम्यानि कानिचित् ।

पक्ष्मणोऽपि निपातेन येषां स्यात् स्कन्थपर्ययः ॥ (भमाशां.१५.१६)

जगामध्ये कोण कोणाला खात नाही?जीवो जीवस्य जीवनम्|

प्राणस्य न्नमिदं सर्वम" अहिंसेच्या नियमांतहि कर्तव्याकर्तव्याचा तारतम्य विचार सुटत नाही.

अहिंसाधर्माला धरूनच क्षमा, शांती, दया है गुण येतात. न श्रेयः सततं तेजो न नित्यं श्रेयगी क्षमा ।

तम्मानित्यं क्षमा तात पण्डिलैरपवादिता ।।

'नेहमीच क्षमा किंवा नेहमीच तापटपणा श्रेयस्कर होत नाही, यासाठीच बाबा! ज्ञात्यांनी क्षमेस अपवाद सांगिलले आहेत, पण असे सूक्ष्म प्रसंग ओळखून तत्त्व समजून घेणे महत्त्वाचे आहे.

**सत्य - नास्ति सत्यात्यरो धर्म (ममा.शां १६२-२४)

सत्यं हि परमं बलम् = (अनु. १६७.५०) परंतू यासही अपवाद‌ आहे .

नापृष्टः कस्यचिद्ब्रूयान्न बचान्यायेन पृच्छतः (, मभा शां)

"विचारल्या खेरीज कोणाशी बोलू नये आणि अन्यायाने जर कोणी प्रश्न करीत असल्यास विचारिल्यावरही उत्तर देऊ नये. माहित असले तरी वेड्‌यासारखे हू हू करून वेळ - मारुन न्यावी - 'जानन्नपि हि मेधावी जडवल्लोक आचरेत्।

पण वेळ बोलूनही टळणारी नसेल तर...

अकूजनेन चेन्मोक्षो नावकूजेत्कथंचन अवश्यं कूजितव्ये वा शंकरन्वायकूजनात् ।

श्रेयस्तमानृतं वक्तुं सत्यादिति विचारितम् ।

"न बोलता मोक्ष म्हणजे सुटका होण्यासारखी असेल तर काही झाले तरी बोलू नये आणि बोलणे अवश्यच असेल तर, किंवा न बोलल्यामुळे (दुसऱ्यास) शंका येण्याचा संभव असेल तर, त्यावे‌ळी सत्यापेक्षा खाटे बोलणे अधिक प्रशस्त असे विचारांनी ठरलेले आहे! ' (शां. १७९,१५,१६).

'सत्यस्य वचनं श्रेया संत्यादपि हितं वदेतू ।

यद्‌भूतहितमायन्तं एतत्सत्यं मतं मम । (शां ३२९, १३)

 "सत्य बोलणे हे प्रशस्त होय, पण सत्यापेक्षांहि सर्व लोकांचे ज्यांत हित असेल ते बोलावे, कारण सर्व जनांचे ज्यांत अत्यंत हित हेच माझ्या मते खरे सत्य होय'.

अपवाद? 'राजकीय गुपित लपवण्यास, चोरांसमोर, अन्यायाने प्रश्न करणाऱ्यास, वकिलांना धंद‌यात खोटे बोलणे गैर नाही? (सिन्विक)

पण फायद्यासाठी व्यापाऱ्यांनी खोटे बोलणे कसे चालेल ? सत्य हे वाचिक सत्य वा वास्तव (सर्वभूतहितकारक) सत्य असू शकते. 

परंतू

'आताहेतोः परार्थ वा नर्महास्याश्रयात्तथा 988 ये मृषा न वदन्तीह ले जराः स्वर्गगामिनः । मभा अनु) 

"स्वार्थाकरितां परहितार्थ किंवा थट्‌टेनेहि जे पुरुष था जगी कधी देखील खोटे बोलत नाहींत त्यांसच स्वर्गप्राप्त होते."

हा देखील शास्त्रांकारकांचा अखेरचा तात्विक सि‌द्धांत आहे.

 सत्य बोलण्यात वचन, प्रतिज्ञा पाळणे याचा समावेश होतो. पण याचे सूक्ष्म मर्म जाणून कृती अपेक्षित आहे यासाठी अनुभव - संपन्न व्हावे वा अशांचा सल्ला जरुर घ्यावा.

(टीप- यातील संस्कृत श्लोक अशुद्ध लिहिले असू शकतात,मुळ श्लोकांचा शोध घेत आहे.पण भावार्थ जरूर जाणावा)

#गीतारहस्य३

#कर्मजिज्ञासा२


* अस्तेय (चोरी)


एकाने यथान्याय मिळवलेली संपत्ती चोरून किंवा लुटून नेण्याची इतरांना मोकळीक मिळेल तर द्रव्यसंचय करण्याचे बंद पडून सर्वांचेच नुकसान होईल, समाजाची घडी विस्कळून सर्वत्र अनवस्था होईल हे निर्विवाद आहे. पण यासही अपवाद आहेत चोहोंकडे दुष्काळ पडल्यामुळे विकत, मजुरी करून, धर्मार्थहि अन्न मिळत नाही अशी आपत्ति प्राप्त झाल्यावर चोरीने आत्मसंरक्षण करण्याचे कोणी मनांत आणिल्यास त्यास आपण पापी समजू का?

बारा वर्ष दुष्काळ पडून विश्वामित्रावर असाच दुर्धर प्रसँग आला, व श्वपचाच्या ( कुत्र्याच्या मांसाची तंगडी) चोरून त्या अभक्ष्य अन्नाने आपला बचाव करण्यासाठी ते प्रवृत्त झाले (शां १४९).. '

जीवितं मरणात्श्रेयो जीवन्धर्ममवाप्नुयात्"


जगेल तर पुढे धर्म, म्हणून धर्मदृष्ट्याहि मरण्यापेक्षा जगणे श्रेयस्कर असे विश्वामित्रांनी यावेळी म्हंटले आहे.


पण जगणे हाच काहीं जगातील पुरुषार्थ नव्हे.


'मुहूर्त ज्वलितं श्रेयो न च धूमयितं चिरं (मभा उ१३२१५)


अंथरुणावर पडून कूजून किंवा घरांत शंभर वर्ष फूकट धुमसत पडण्यापेक्षा घटकाभर पराक्रमाची ज्योत दाखवून मेलास तरी बरे "

कारण 'देह त्यागिता कीर्ती मागे उरावी ।मना सज्जना हेचि क्रिया करावी||'


कोणत्या प्रसंगी जिवावर उदार होणे योग्य आणि कोणत्या प्रसंगी अयोग्य हे समजण्यास कर्माकर्मशास्त्राचाहि त्या बरोबर विचार करावा लागेतो. नाहीपेक्षा जीवावर उदार होण्याचे यश मिळणे दूर राहून मूर्खपणाने आत्महत्या केल्याचे पाप मात्र पदरांत पडण्याचा संभव असतो.


माता, पिता, गुरु वगैरे वंद्य व पूज्य पुरुषांची देवाप्रमाणे पूजा, शुश्रूषा करणे हाहि सामान्य व सर्वमान्य एक प्रधानधर्म आहे. कारण तसे न करणे कुटुंबाची, गुरुकुलाची किंवा एकंदर समाजाचीही नीट व्यवस्था कधीच राहणार नाही.


'न तेन वृद‌धो भवति येनास्य पलितं शिरः।


यो वै युवाप्यधीयानस्तं देवाः स्थविरं विदुः ।


डोके पांढरे झाले म्हणजे तेवढ्यानेच एखादा मनुष्य वृद्‌ध होत नाही, तरुण असला तरी ज्ञानवान त्याला देव म्हातारा समजतात. (म.भा.वन११३.)


राजा तर गुरुपेक्षांहि श्रेष्ठ अशी देवता आहे, परंतू त्यासही धर्म सुटत नाहीत, सोडिल तर नाश पावतो [म भा.शां ५९)


* काम, क्रोध आणि लोभ ही तिन्ही नरकाची द्वारे असून आपला नाशाची कारणे आहेत, पण काम व क्रोध हे शत्रू खरे के पण केव्हा? अनावर राहू दिल्यास....


सृष्टिक्रम चालू राहण्यास योग्य मर्यादेचे आंत त्यांची अत्यंत आवश्यकता आहे, ही गोष्ट शास्त्रकारांसहि संमत आहे.


लोके व्यवायामिषमदयसेवा नित्यास्ति जन्तो नहि तत्र चोदना । व्यवस्थितिस्तेषु विवाह यज्ञसुराग्रहैरासू निवृत्तिरिष्टा ।


या जगांत मैथुन, मांस व मद्य यांचे सेवन कर म्हणून कोणांस सांगावयास नको, ती मनुष्यास स्वभावतःच हवी असतात या तिहींची हि काही व्यवस्था लावावी, म्हणजे त्यांस मर्यादा किंवा आळा घालून व्यवस्थित रूप द्यावे या हेतूने विवाह, सोमयाग व सौत्रामणि यज्ञ यांची अनुक्रमे योजना केली आहे, त्यांतही निवृत्ती म्हणजे निष्कामाचरणच इष्ट होय. (निष्काम बुद्‌धीचे कर्म] (मम भाग - ११,१०-१४


* शौर्य, धैर्य, दया, शील, मैत्री, समता इ. सर्व सद्‌गुणांस काही मर्यादाही लागू आहेत.


' विपदि धैर्यमथाभ्युद‌ये क्षमासदसि वाक्‌पटुता युधि विक्रमः ।


संकटकाली धैर्य, उत्कर्षाचे वेळी क्षमा, सभेत वकृत्व व युद्धात शौर्य के गुण आहेत,


'देशे काले च पात्र च तद्‌द्दानं सात्विक विदुः' 

देश, काल व पात्रता पाहून दिलेले जे दान तेच सात्विक होय.

* आचार कालामानाप्रमाणेच देशाचार, कुलाचार किंवा ज्ञातिधर्मति जमेंस धरावे लागतात, तरीही आचाराआचारांतहि तारतम्य पहावे लागते.


'न हि सर्वहितः कश्विदाचारः सम्प्रवर्तते ।


तेनैवान्यः प्रभवति सो ऽ परं बाधते पुनः ।।


सर्वांना सर्वदा एकसारखाच हितकारक असा आचार सापडत नाही. एक आचार घ्यावा तर दुसरा त्याच्या वरचढ असतो, व हा दुसरा आचार पत्करावा तर तो तिसऱ्याला पुनः विरुद्ध पडतो. "(शां२५९)


संसारात अनेक वेळी कठीण प्रसंग येतात कधी अहिंसा आणि आत्मरक्षण, कधी सत्य आणि सर्वभूतहित, कधी देहसंरक्षण आणि यश, कधी भिन्न भिन्न नात्यांनी उपस्थित होणारी कर्तव्ये यांत लढा पडून सर्वमान्य नीतीनियमांनी काम न भागता अनेक अपवाद कसे उत्पन्न होतात, त्यावेळ कर्तव्याकर्तव्याधमर्माचा निर्णय करण्यास काही कायमचे धोरण किंवा युक्ती आहे की नाही हे जाणण्याची इच्छा मनुष्यास होते.

त्यावेळी सूक्ष्म अभ्यासाची  गरज असते.