Sunday, July 17, 2022

रताळीपासून तिखट पुरी

 


एकादशीला हक्काने घरात आलेले कार्बोहाड्रेट म्हणजे साबुदाणा ,बटाटा आणि रताळी !त्यात रताळीला एकादशीलाच जास्त आणंल  जाते.बाकी इतर वेळी तसे दुर्लक्षितचअसतात.रताळी –दाणे किस,रताळ्याची खीर झाली.आता दोन दिवसांनी लेकीसाठी तिखट पुऱ्या करायचं ठरवलं.गुळाच्या पाण्यात गोड पुऱ्याही होतात,पण तिला गोड  जास्त आवडतं नाही.

साहित्य-

४ उकडलेली रताळी

१ मोठी वाटी कणिक पीठ

१ छोटी वाटी रवा

आलं ,मिरची ,लसून,जिरे  यांची एकत्रित पेस्ट

४ चमचे तीळ

१ चमचा तिखट

१ चमचा हळद

१ चमचा धणेपूड

चिरलेली कोथिंबीर

चवी पुरते मीठ

तळण्यासाठी ३ मोठी वाटी तेल

कृती:

तर मग कुकरमध्ये उकडलेल्या रताळ्याची साल काढून चांगली स्मश करायची.

गव्हाच्या पिठात तेल व  हे कुस्करलेली रताळी टाकायची. यात रवा   आणि वरील सर्व जिन्नस आल पेस्ट ,तिखट ,धणेपूड टाकायचे.

शेवटी कोथिंबीर आणि तीळ भुरभुरले की खूपच सुंदर मिश्रण दिसते.आणि हाच तो महत्वाचा क्षण J



हे मिश्रण  एकजीव करून एक गोळा मळायचा.पाण्याची अजिबात गरज लागतं नाही.

एक मोठी  जाडसर पोळी लाटून वाटीने गोल आकाराच्या पुऱ्या बनवायच्या.

गरम तेलात मंद आचेवर तळून घ्यायच्या. जरा ट्यूब पेटली शेप कटर नव्हता ,हातानेच स्टारचा आकार करून तळला.एक छोटासा ट्री शेप कटर होता.बिस्कीट सारखा तो तळला.

महत्वाची गोष्ट –ह्या पुऱ्या गरमा गरमच खायच्या कारण  रताळीमुळे त्या लवकर मऊ होऊ शकतात.



-भक्ती  

 

 

No comments: