Thursday, January 30, 2020

'आईपण देवकी -यशोदा ' #100wordsstory


कॅन्सरग्रस्त सीमा दोन महिन्यांची प्रेग्नंट होती. डॉक्टरांनी प्रेग्नंन्सीमुळे कॅन्सर उपचार गुंतागुंतीचे होतील असे सांगितले ,सर्वांनी समजावले तरीही सीमा आईपणाची देणगी नाकारणार नव्हती.एका निरपराध जीवाला ती सुंदर जग दाखवणार होती. नऊ महिन्यानंतर गोंडस मुलीला जन्म सीमाने जन्म दिला. नंतर काही दिवस तिची जग सोडायची वेळ आली,ठरवल्या प्रमाणे सीमाने तिची नि:संतान मैत्रीण रेखाला ही गोड परी दत्तक दिली ,तेव्हा सीमाने रेखाला 'यशोदा' अशी हाक मारली सर्वांना अश्रू अनावर झाले. एका देवकीने आईपण निभावून यशोदेला आईपणाचा हक्क दिला होता.

-भक्ती जामगांवकर

2 comments:

सह्याद्री SAHYADRI said...

नमस्कार
आपले ब्लॉग वाचले ,छान, रसग्रहण करण्यासाठी चांगली माहिती मिळाली.

BHAKTI said...

खुप खुप धन्यवाद.