Monday, June 11, 2012

आत्मा

आत्मा-१
पिंपळाच्या फ़ांद्यांवर लटकतांना
झाडांच्या गात्रा गात्रात तु पोहचला
आणि सुसाट वारा जेव्हा आला
तू पानांच्या सळसळीतून निसटतांना
अंगणात सैरभैर धावला
तिथे दिवा होता लावलेला
त्याच्या ज्योती एकटक तू पाहत बसला
मग दिव्याखालच्या अंधारात तू नाहिसा झाला


ते लोक उगाच कुजाबुजता अजून ...त्यांनी तुला पाहिले॥
-भक्त्ती

आत्मा-२
मऊशार ह्र्दय धडधडत होते
तेव्हा तू दूर होता ...कसल्या तरी शोधात
ते ह्र्दय आता धडधडत नाही
तरी तू दूर आहेस....कसल्या तरी शोधात॥
-भक्त्ती

आत्मा-३
तू मनापेक्षा सुदैवीच आहे...
मन ,शरीरासह मरूंन जाते?
पण तू अमर आहे?
जन्मभर मनाला शब्दांचे घाव
कावळ्यांसारखे टोचतात...
मेल्यावर कावळ्य़ांना घास घालतात
तू शांत असावा म्हणून...
तू मात्र खरच मनापेक्षा सुदैवीच आहे....



-भक्त्ती

No comments: