Monday, June 11, 2012

सहवास

मनातला गाव:सहवास
मनातल्या गावात जेव्हा
जोडली जाते नवी वाट
दबकत पावले पडतात तेव्हा
डोळे शोधती ओळखीचा ठाव॥१॥

घडु लागतो संवाद
बोलु लागतात झाडे,फ़ुले
अनोळखी सुर घालतात साद
त्याच्या हातात माझा हात झुले॥२॥

काटा टोचता, हळूवार फ़ुंकर
ओंजळभर पाण्यास अम्रुत स्पर्श
माथ्यावरल्या उन्हात पदराची झालर
आता दूर लोटता येतो प्रखरही संघर्ष॥३॥

गावात आता उडती स्वछंद पाखरे
सैरभैर आनंदाचा वाहतो वारा
झरा,तारे ,चंद्र सारे पुकारे
हव्याशा सहवासाचा खेळ सारा॥४॥

॒भक्ती(७\२\१२)

No comments: