Thursday, June 19, 2025

गोफ -पुस्तक परिचय

 #गोफ




कर्वे घराण्यातील तिसरी पिढीतहीस्त्रीयांच्या प्रश्नांवर डोळसपणे पाहण्याचे बाळकडू लाभलेल्या #गौरीदेशपांडे!

पारंपारिक नीती अनीतीच्या पलीकडे स्त्रीला वागण्याची, समजून  घेण्याची मुभा असायलाच पाहिजे हे ओळखूनच 'स्त्री' 'व्यक्ती' म्हणून कांदबरीत दाखवली, गौरी देशपांडे यांची अशी 'गोफ' ही कादंबरी वाचली.


वसुमती आणि मां यांच्यातला गोफ सुलक्षणमुळे विणला गेला पण तो दुर्दैवाच्या फेऱ्यातून या जगातून निघून गेला. तेव्हा हा धाँगा-गोफ तुटक तुटक होऊ लागला. तेव्हा भंते या सर्वस्वी ऋषीतूल्य व्यक्तिमत्त्वाच्या जाणकार विचारांमुळे या दोघीतला गोफ पुन्हा घट्‌ट होऊ लागला.


वसुमती व सुलक्षणा मुलगा आदित्य, ज्याला वसुमतीने कठोर होत, वडिलांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी लांब केलेच होते. पण पण सुलक्षणच्या या अवस्थेच्या आई म्हणून मां जबाबदार?असे वसूला  वाटत तर सुलक्षणमध्ये ही करारी वसुमती बदल का करू  शकली नाही? हा  संभ्रम मां यांना पपडे.

या आपपल्या अपराधी /कमी पडलेल्या भावनेतच दोघी समाजाच्या चौकटीत नांदायचे म्हणून एकत्र येतात. परंतू लवकरच दोघींना एकमेकींचा लळा लागतो. त्यातच जसपालचा मदतीचा आणि वसुमतीसाठी भावनिक गरजेची साथ मिळत राहते. अशाच मधल्या टप्प्यावर 'आनंदाची' मां च्या मानलेल्या मुलाच्या येण्याने अजून 'सुलक्षण' सगळ्यांत उलगडू लागतो. सारे काही स्थिर होताना, आनंदाकडे पाठ न करता त्याला आपल्यात आणूनच  वसुमती जसपालसी पुन्हा लग्नगाठ बांधायचे ठरवते


या साऱ्यात वसुमतीच्या स्त्रीच्या खंबीर भूमिकेचे अनेकदा दर्शन होते. इतर साचेबद्ध कादंबरीप्रमाणे ती परिस्थितीची शोषिक वगैरे कुठेच हे पात्र रेखाटलेले दिसत नाही. स्त्री-पुरुष असे खूप मोठी नेहमीप्रमाणे दरीच दाखवली नाही. निखळ मानवी जीवन त्यांच्या भावनांची अस्तर त्याची उतरंड दाखवली आहे.


पुढे प्रत्येक टप्प्यावर सुखदुःखातही वसुमती कशाप्रकारे आणखीन चैतन्याने उमलत जाते हे वाचायला मजा येते. कधी कधी वाटते अशी कथा आजूबाजूला कुठेतरी घडलेली पाहिली, ऐकली आहे. परिस्थितीच्या रेट्यात स्त्रीची केवळ कीव न करता, तिच्या वागण्यातल्या मानवी संदर्भ मांडणाऱ्या अत्यंत दुर्लभ मांडणीतील अशा कादंबरीपैकी हा गोफ वाचण्यासारखीच आहे.

-भक्ती

Wednesday, June 18, 2025

मिश्र धान्यपीठाची बट्टी

 #मिश्रपीठपाककृती

नाही नाही फुलाला नैवैद्य नाही दाखवला हा पदार्थ मी मुलीला डब्यात #टिफीन देण्यासाठी खास करून झटपट बनवले.



हा पदार्थ गव्हाचे पीठ, रवा, ज्वारीचे पीठ आणि बेसन यांच्यापासून मळून वाफवून आणि तळून बनवला आहे.  हे एक प्रकारचे वाफवलेले आणि तळलेले स्नॅक आहे, जसे की ढोकळ्याचे किंवा मुठिया सारखे पदार्थ.


सामग्री :

गव्हाचे पीठ: २ कप

रवा : १ कप

ज्वारीचे पीठ: १/२ कप

बेसन: १/४ कप

हिरव्या मिरच्या:पेस्ट ३ चमचे

आलं-लसूण पेस्ट: १ चमचा

हळद: १/२ चमचा

मीठ: चवीप्रमाणे

साजूक तूप: २ चमचे (मळण्यासाठी)

जीरे: १ चमचा

तीळ : ४ चमचे 

कोथिंबीर (बारीक चिरून): ४चमचे

तिखट:२ चमचे

पाणी: आवश्यकतेनुसार (मळण्यासाठी)


एका मोठ्या भांड्यात पाणी(१/२ ग्लास) घेऊन त्यात तिखट ,हळद,मीठ,आलं लसूण,हिरवी मिरची पेस्ट,जिरे , कोथिंबीर,तूप एकत्र केले.त्यात गव्हाचे पीठ, रवा, ज्वारीचे पीठ आणि बेसन एकत्र करा. 


मळणे: पाण्याचा वापर करून हे सर्व मिश्रण चांगले मळून घ्या. मिश्रण मऊ आणि गुळगुळीत असावे, परंतु खूप पातळ नसावे. १५ मिनिटे झाकून ठेवा.

 

आता ह्यांचे उंडे करत पोळी प्रमाणे लाटून तेल लावले.व नीट पाच ते सहा घड्या करून परत गोल उंडा केला.


वाफवणे: मिश्रणापासून तयार उंडे वाफवण्याच्या भांड्यात(इडली पात्रात) पाणी गरम करून ठेवून १५-२० मिनिटे वाफवून घ्या, ज्याने त्या शिजतील.


तळणे: वाफवलेले उंडे थंड होऊ द्या. नंतर त्या लहान तुकड्यांमध्ये कापून घ्या. कढईत तेल गरम करून या तुकड्यांना हलक्या तळलेल्या तळून घ्या.

-भक्ती

Friday, June 13, 2025

नदीष्ट - नदीच्या काठावरती विस्तारलेले भावविश्व




गप्पीष्ट, रागिष्ट किंवा नादीष्ट या शब्दांच्या गोतावळ्यात लावला असता नदीच्या प्रवाहाच्या छंदात  मग्न तो नदीष्ट!


#मनोजबोरगावकर यांची नदी काठच्या, रोजच्या  अनेक  व्यक्ती, प्रसंग, निसर्ग सापेक्ष अनुभव आहेत, ते या कादंबरीतून प्रवाहासारखे वाहत आपल्यापर्यंत पोहचतात.


लेखक अनेक वर्षांपासून चाकोरीब‌द्ध १०-५ कार्यालयीन जीवनानतही  आवर्जून सकाळी वा संध्याकाळी गोदामायेच्या प्रवाहात पोहायला जात. अगदी दादारावांच्या प्रशिक्षणात पट्‌टीचे पोहणारे झाले. एका काठापासून दुसयाकाठगपर्यंतचा पोहण्याचे काम ते लीलया करत. एकदा काही मुलं या गोष्टीचे कौतुक करताना, अचानक लेखकाला पोहताना प्राण उरत नाही, तेव्हा मुलांसमोर पोहण्याची बढाई करताना इगो जागृत झाला आणि पोहणेही सर्व कठीण झाले याची लेखक कबूलीच देतो.


अशाच अनेक जन्म, मृत्यू, समाजजीवन, विविध  मानवी भावना नदीकाठी भेटलेल्या काही विशेष व्यक्तीमुळे लेखक सहज पण ठळकपणे दाखवून देतात.


सकीनाबी ही एक भिकारीन नदीकाठी अनेकदा भेटायची, पण अचानक ती नदीवर यायची बंद झाल्यावर तिची कहाणी लेखकाने तिचा शोध घेत सांगितली. तसाच भिकाजी सुरुवातीला अबोल पण लेखकाच्या संवादाने मायेची जाणीव झाल्याने बोलू लागला. तेव्हा त्याच्या आयुष्यातल्या सर्व जखमा आपल्यालाही रक्तबंबाळ करतात.मांजरीच्या द्वेषापायी त्याची बहिण, आई. आणि पोटची मुलगी... सारेच विरून जातात, हे समजते, या द्वेषापायीच तो  १-१.५ वर्षाच्या र पोटच्या मुलीचा अनवधाने बळी घेतो. उरले सुरलेले नातेही तटकन तुटून जाते.भिकाजी कैदी होतो आणि आयुष्याचा अभागी फेरा भिकारी होण्यापर्यंत पोहचतो.

पुस्तकालील अजून एक रोचक गोष्ट म्हणजे नदीतील 'हर्जिन जागची वाळू'' मिळवण्यासाठीची त्याने केलेली घडपड. आताच्या काळात वाळू उपासा प्रचंड प्रमाणात असताना अशी  अस्पर्शित जागा नदीत कुठे असेल का? हे नदीपात्र, खोल म्हणजे तिचे गर्भशयच! पण वाळू उपस्याने तिच्या गर्भाशयालाच इजा खोलवर करतो, हे हल्ली कोणाच्याच ध्यानी नाही, हे संवेदनशील पणे लेखक मांडतो.


कालूभैय्या, पुजारी हे लेखकासाठी त्रयस्थ असूनही त्याला पोहण्याबाबत कायम खबाबदारी घ्यायला सांगणारे, तो नदीत असेपर्यंत वा लवकर परततांना दिसला नाही की ही मंडळी  काळजीत पडत.


विषारी नाग पकडणाऱ्या प्रसादने अनेक रोमांचकारी किस्से लेखकाला सांगितले.त्याने एकट्याने पहिल्यांदा नाग पकडला तेव्हाची धाकधूक!


पण कादंबरीत जी व्यक्तीरेखा गारुड घालते, ती सगुणा एक तृतीयपंथी. प्रारंभी लेखक हिच्यापासून दूरच राहत,  सगुणाच्या जीवनपटावर तो तिचा 'जान' होतो. तृतीयपंथी सगुणाबरोबर माणूस म्हणून लेखक ज्या संवेदनांनी वागतो, बोलतो ते समजून घेताना, नकळत या समाजाविषयी आपलीही आपुलकी पुढे येत राहते, नव्हे ते माणूस' आपण स्वीकारतो. सगुणा तिचा तृतीयपंथी होव्याचा प्रवास, त्यांच्या चालीरीती, गूढ भाषा, मित्र-समाज गोतावळा या सर्वांविषयी कुतुहलपूर्ण माहिती लेखकाला देते.आईला भेटण्याची धडपड किती सर्वसामान्य प्रमाणे पण अशक्य कोटीची तिच्यासाठी आहे हे जाणवते.


मागे तारा भवाळकर ज्याप्रमाणे म्हणाल्या की 'भाषा, ही जैविक आहे.' त्याच आशयाप्रमाणे लेखकही पूर्वीच म्हणाले (लिहले) की नदीही जिवंत सजीव - living organism आहे. नदीच्या काठी अनेक संस्कृती, मानवी जीवन, तिच्या पाण्यात अनेक जीव जीवन साकारत राहते, ते बदलते, धडपडते, घडते.

-भक्ती

Saturday, June 7, 2025

पंचमयकोश

 #पंचमयकोश

साधारणतः सर्वांकडे जी समस्या सुरू होते तिच समस्या आमच्याकडे सुरू झाली आहे.

"१०-१२ वर्षांतील मुलांचा चिडचिडेपणा"

मुलांच्या बाबतीत आपण खुप गोष्टी ठरवल्या असतात.पण मुलांचे किंचित बंड चिडचिड वाढलेली दिसते.त्यात नोकरी करणारी आई म्हणजे मुलांच्या वाढीमध्ये तारेवरची कसरत ,अनेक गिल्टी पणाने ग्रस्त व्हायला होते.वरती समाजाकडून उठणारे बोटं तो तर वेगळाच विषय..


यावर उपाय म्हणजे आपण हात उगारणे,त्यांना सतत धाक दाखवणे,शिक्षा करणे हे नसते.तर आपण संयमाने सतत तूही संयम दाखव हे दोघांवर बिंबवत राहणे हे असते.

याबद्दलचा एक व्हिडिओ पाहण्यात आला.यात भारतीय गुरूकुल पद्धतीत , पूर्वीच्या काळी कशाप्रकारे मुलांशी संवाद वागणूक होते हे सांगितले.

https://youtu.be/qWb7gewSGbI?si=TqEnJ614vIrFn73c

"तुमच्या मुलांना सर्वांपेक्षा हुशार बनवण्यासाठी वैदिक युक्ती (पुरावा!)" हा हायपर क्वेस्ट व्हिडिओ पंचकोश सिद्धांतात खोलवर जातो


(पंचकोश सिद्धांत) वैदिक परंपरेतील, समग्र मानवी विकासासाठी एक चौकट.


हे प्राचीन भारतीय शैक्षणिक तत्वज्ञान असे मानते की मानव पाच परस्पर जोडलेले "म्यान" किंवा थरांनी बनलेले आहेत:



१. भौतिक शरीर (अन्नमय कोश), 

साधारणतः ३ वर्षांपर्यंत मुलांना योग्य आहाराने वाढ होण्याची अधिक लक्षपूर्वक ध्यान ठेवण्याची गोष्ट आहे ‌.


२.तद्नंतर ९ वर्षांपर्यंत जीवन ऊर्जा (प्राणमय कोश) म्हणजे व्यायाम,योग, खेळातील  शिस्त हे गुण अंगी वाढवण्यासाठी सोपे होते,ती ऊर्जा चॅनॅलाईज होते.


३.

१०-१५ वर्षांपर्यत मन (मनोमय कोश) यावर काम हवं .या वयात मन चंचल असते .नाना प्रकारचे राग विकार मुलांच्या मनात उफाळत असतात.अशावेळी संयम शिकवावा.वाचनाची, निसर्ग निरीक्षण समजावून सांगावे.याने एकाग्रता वाढते.


४ .

१६- २१ वर्षांपर्यंत बुद्धी (विज्ञानमय कोश) यात अधिक अभ्यास पूर्ण वाचन, शिक्षणानू तर्क विचारशक्ती जागृत होते.ती परिपूर्ण करण्यासाठी खुप अभ्यास अगदी झोकून देऊन करावा‌


५. आनंद (आनंदमय कोश) या नंतर विकसित होतो तेव्हा आतापर्यंत योग्य ज्ञानामुळे यापुढे आयुष्यात सृजनाचा आनंद सहज मिळतो.


व्हिडिओमध्ये असा युक्तिवाद केला आहे की प्राचीन गुरुकुल प्रणालींमध्ये प्रचलित असलेल्या विकासाच्या योग्य टप्प्यांवर प्रत्येक कोशाचे पालनपोषण करून, व्यक्ती अति-बुद्धिमत्ता आणि संतुलित अस्तित्व प्राप्त करू शकतात, ही पद्धत आधुनिक पाश्चात्य शिक्षण प्रणालींनी देखील स्वीकारली आहे. भौतिक शरीरासाठी योग्य आहारापासून ते आनंद आवरणासाठी आनंद आणि सर्जनशीलता जोपासण्यापर्यंत, या थरांना समजून घेणे आणि जाणीवपूर्वक पोषण करणे, सुदृढ आणि अपवादात्मकपणे सक्षम मुलांचे संगोपन करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.