रासपुतीन ते पुतीन -
लेखक-पंकज कालुवाला
आंतरराष्ट्रीय राजकारणातील गतिविधिमध्ये सामान्य गती असणारी मला यात उत्सुकता निर्माण झाली आहे. गाथा इराणी हे पुस्तक वाचतांना तेलासंबंधी आखाती देश व आंतरराष्ट्रीय देश यांचे राजकारण कसे सतत उतार-चढाचे हे समजले. ग्रंथालयात् रासपुतीन ते पुतीन हे पुस्तक दिसले. यात आतापर्यंत रशियाचे नेतृत्व ज्यांनी केले त्यांच्या कारकीर्दीचा संक्षिप्त आढावा आहे. रशिया एका मोठा भूभाग असलेला प्रदेश इतकीच सामान्य माहिती. रशियाबाबत बरीच माहिती मिळाली, इतर वाचकांसाठी ही माहिती अधिक नसेल पण माझ्यासाठी भरपूर म्हणावी लागेल.
१.रशियात झाररराज्याचे साम्राज्य कायम संकटात होते, कामगारचळवळ महायुद्ध अशा अनेक संकटात रासपुतिन सारख्या पाखंडी बाबाचा त्यांनी आधार घेतला? सुरूवात वैयक्तिक कारणांमुळे - मुलाची तब्येत ठीक करणे होते. पण या रासपुतिनने हळहळू सर्व घराणे, इतर लोकांना कट्पुतली केले होते.
२.१९१७ मध्ये रशियन क्रांतीनंतर सोव्हिएट कम्युनिस्ट पर्व सुरु झाले. यात 'बोल्शेिविक' (Majority faction] मेन्शिविक (Minority) हे रशियन डेमोक्रेटिक पार्टीचे भाग समजले.
३.लेनिन व स्टॅलिन यांची वैयक्तिक माहिती समजली. लेनिनचे मार्क्स विचारांनी भारून जाणे, त्याच्या भावाला विद्यार्थी दशेत सरकार विरोधात कामे केल्याने फाशीची शिक्षा सुनावली होती.
४.स्टॅलिनने सत्तेमध्ये राहण्यासाठी अनेक लोकांचे शिरसंधान केले हे वाचून शिसारी वाटली. पण तरीही तो लोकप्रिय होता?
५.नंतरच्या काळातल्या अध्यक्षांच्या कारकीर्द देखील सत्ता सांभाळण्यात कशा घडत होत्या ते समजले. जवळपास सर्व अध्यक्षांचे लहानपणीचे आयुष्य हलाकीचेच होते. कोणीही फार शिकलेले नव्हते
६.ज्याप्रमाणे काळ्या पाण्याची शिक्षा ही अत्यंत क्रूर , अमानुष जाणली जाते.त्याप्रमाणे रशियात सायबेरिया सारख्या अत्यंत थंड हवामान असलेल्या शहरात आरोपींना नजरकैद/तडीपार केले जात.जिथे जगणे खुपच कठीण होईल.अनेक जण पळून फ्रान्सला व इतर ठिकाणी जात.
७.पुढे १९९१ ला de-Stallinization करायला अनेक अध्यक्षांनी वेळ दिलाच पण सैन्य ताकदही सर्वांनीच कायम वाढवली.
८.१९९१-सोव्हियट युनियनची पडझड होऊन एक मुक्त व्यापर-संस्था उदयास येऊ घातली. यात पहिले अध्यक्ष होते बोरिस येल्तसिन, पण त्यांच्यावर अनेक भष्ट्राचाराचे आरोप झाले. एकंदरीत मुक्त व्यापार स्वीकारतांना भष्ट्राचाराची कीड रशियाला लागली.
९.२००० पासून आतापर्यंत व्लादिमिर पुतीन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष - उपपंतप्रधान - राष्ट्राध्यक्ष आहेत पुतीन हे लहानपणा-पासून हुशार, कराटे चंपियन होते. ते रशियन गुप्तहेर संस्थेत २६ वर्षे कार्यरत होते. पुलिन हे मितभाषीपण अत्यंत खंबीर नेतृत्व म्हणून रशियाच्या सत्तेत वारंवार निवडून आले.अनेक वर्षे सत्तेत राहूनही २०१२ मध्ये घटनाबदल करून ते पुन्हा सत्तेत आले.
पुतीन यांनी आधीच्या काळात अमेरिकेशी संबंध सुधारलेले होते एडवर्ड स्टोनेडच्या निमित्ताने ते बिघडले आजपर्यंत. आता प्रश्न असा की पुतीननंतर पुढील अध्यक्ष कोण असेल? जो अजूनही उदयास आलेला दिसत नाही...