Monday, April 21, 2025

शिंडलर लिस्ट-Schindler List



#SchindlersList 

दूरस्था: पर्वता: रम्या:,वेश्याः च मुखमण्डने ।

युद्धस्य तु कथा रम्या,त्रीणि रम्याणि दूरतः ॥


अर्थ :- पर्वत,गणिकेचे मुख शृंगार और युद्धाच्या कथा रम्य असतात पण हे सर्व दूर असताना.

 खरोखरच या श्लोकाचे तंतोतंत उपययोजना 'शिंडलर लिस्ट' सिनेमा पाहताना समजली.

दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या क्रौर्याने परीसीमा गाठली होती.त्याने चालवलेले ज्यू लोकांचे शिरकाण माणुसकीला काळिमा फासणारे,थरकाप उडवणारे होते.सर्वत्र पसरलेल्या या अंध:कारात शिंडलर इवलासा किरण होता.ज्याच्यामुळे आज हजारो ज्यू वंश या भू तलावर जन्म शकले.शिंडलर हा जर्मन उद्योजक होता.पण त्याचं ह्रदयात माणुसकी होती.ज्यू लोकांना पकडून त्यातले म्हातारे, कामासाठी अयोग्य लोकांना निर्दयपणे मारले जात.तेव्हा शिंडलर हेही लोक कसे कामाचे हे पटवून देत त्यांचा जीव वाचत.


फांदीवर विसावलेल्या पक्ष्यांना जसे शिकारी टिपतो अगदी तसेच कामातून जरा क्षणभर विसावलेल्या ज्यू कामगारांना क्रूर जर्मन सैनिक अधिकारी दुरूनच गोळी मारत टिपत.निरोगी ज्यू बाजूला करताना सर्व स्त्री व पुरुषांना निर्वस्त्र करत मेंढरांसारख्या गर्दीतून वरवर न्याहाळत  दोन तीन सेकंदात तो डॉक्टर निरोगी वा रोगी गटात टाकत.पण रोगी गटाला ना ना प्रकारचे त्रास देऊन मारले जात.


असाच एक मोठा गट मेंढरांसारखा एका आगगाडीच्या तीन चार डब्यात कोंबला होता,उन्हाची लाही लाही त्यात गर्दीचा कोंडमारा ज्यूंचा आक्रोश सुरू होता.जर्मन अधिकारी हसत होते .शिंडलर आगुंतकपणे तिथे येतो.तो म्हणतो" यांच्यावर पाण्याचा जोरदार फवारा करायला पाहिजे".अधिकाऱ्यांना शिंडलर टॉर्चरचा प्रकार सुचवत आहे असे वाटते ,ते होकार देतात.शिंडलर पाण्याचा फवारा रेल्वे डब्यात मरतो.अंगाची लाही लाही झालेले ते जीव पाणी अंगावर ,घशात गेल्याने जरा सुखावतात.इतकच नाही तर पाईप अपुरा पडला म्हणून तो घरून अजून मोठा पाईप आणायला लावतो.हे शिंडलर भूयदयेने करतोय हे एका अधिकाऱ्याने ओळखले.जिथे ज्यू स्त्रियांना शिव्यांची लाखोटी वाहिली जाई तिथे शिंडलरने एका ज्यू स्त्रीचे सर्वांसमोर चुंबन घेतले,हेच कारण देत त्याला जेलमध्ये त्या अधिकाऱ्याने टाकले.पण शिंडलरने आपल्या गोड गोड जाळ्यात अनेक मोठे आसामी बांधले असल्याने तो सुटतोच.


पुढे शिंडलर एक मोठे पाऊल उचलतो.तो युद्ध सामुग्री तयार करण्याच्या नवीन कंपनीत कामगार पाहिजे या कारणास्तव त्याच्या विश्वासू अकाऊंटंच्या मदतीने ११०० ज्यूंची यादी तयार करतो.आणि एका भ्रष्ट अधिकाऱ्याकडून यांना भरपूर पैसे देत विकत घेतो.कंपनी काही काळात घाट्यात येते पण तरीही सहा महिने तो या साऱ्या कामगारांना तोट्यातही माणूस या नात्याने सांभाळतो.त्याचा विश्वास असतो ,कधीतरी हे थांबेल आपणच यांना सांभाळून वाचवले पाहिजे.तो दिवस अखेर येतो.


युद्ध समाप्ती होते.हे सर्व ज्यू स्वतंत्र होतात.तेव्हा शिंडलर जे बोलतो ते खरंच माणसाच्या जीवनावर विश्वास असायला हवे हे दाखवते.तो म्हणतो "मी अजून लोकांना वाचवायला पाहिजे होतं,ही कार ही हातातली अंगठी मी का नाही विकली? अजून २-४-१०  लोक या बदल्यात वाचवता आले असते."

डोळ्यांतले पाण्याचं खळ संपूर्ण सिनेमा भर आटत नाही,डोळे वाहत राहतात.


शिंडलर लिस्ट(१९९३) सिनेमाचे दिग्दर्शन स्पीलबर्ग यांनी केले.तरयात शिंडलरची भूमिका लियाम नीसन , एसएस अधिकारी अमोन गॉथची भूमिका राल्फ फिएनेस आणिशिंडलरचा ज्यू अकाउंटंट इत्झाक स्टर्नची भूमिका बेन किंग्सली यांनी केली आहे .

या नामवलीतच कलाकृतीच्या महानतेबाबत सारे काही येत आहे.मग ऑस्कर कसे दूर राहू शकेल.

-भक्ती

OTT-Prime

Friday, April 18, 2025

पेडगाव -धर्मवीर गड-पारगाव

 #पेडगाव -धर्मवीर गड-पारगाव

















दोन-तीन महिन्यांत १२००-२००० वर्षे जुनं पुरातन काळ्या पाषाणात कोरलेल्या,सहज नैसर्गिक भावमुद्रेत अनंत काळापासून उभ्या मूर्ती पाहिल्या नाही की काळाच चक्र", पुढेच जात आहे ,जरा मागे डोकावून पहायला हवं असं वाटतं. तेव्हा आज परत धर्मवीर गड-पेडगाव, भीमेच्या काठावरचे  सौंदर्य पाहायला गेले.


श्रीगोंदा पासून १२ कि. मी अंतरावर धर्मवीरगड आहे. 

इ.स.१३ व्या शतकात यादव काळात किल्ल्याचे भुईकोट स्वरूपात असे याचे बांधकाम झाले,तेव्हा याचे नाव पांडे- पेडगाव ओळखले जायचे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे पणजोबा वेरूळचे बाबाजीराजे भोसले हे देऊळगाव राजे येथे वास्तव्यास असताना

त्यांच्याकडे हा भुईकोट गड देखभालीसाठी) होता. त्यानंतर निजामशाहीची सत्ता कालांतराने मोगलांच्या ताब्यात हा किल्ला गेला. औरंगजेबाचा दुधभाऊ बहादुरखान कोकलताश हा वा किल्याचा त्यावेळी किल्लेदार होता. त्यास त्याने किल्याची काही प्रमाणात डागडुजी केली व किल्ल्यास स्वतःचे नाव -'बहादूरगड' दिले. छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वरला पकडल्यानंतर औरंगजेबाने आपली स्वतःची अकलुजला असलेली छावणी पेडगावला आणली. याच किल्यावर छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबासमोर हजर करण्यात आले. औरंगजेबाच्या मागण्या छत्रपती संभाजी महाराजांनी नाकारल्या नंतर त्यांचा व कवी कलश यांचा अनन्वीत छळ याच ठिकाणी करण्यात आला.


हा किल्ला भिमानदीच्या काठावर असुन याची दक्षिणेकडील तटबंदी भिमानदीला समांतर अशी आहे. साधारण आयताकृती आकाराच्या धर्मवीर गडाच्या भोवती साधारणता सहा ते सात वेशी स्वस्थितीला पहावयास मिळतात. मुख्य प्रवेश मार्ग गावाच्या बाजुला आहे. किल्यामध्ये असलेल्या अनेक वास्तु आज उद्ध्वस्त झालेल्या आहेत. तटबंदी बऱ्यापैकी उभी आहे. किल्यावरील दुमजली इमारतीच्या खिडक्यांमधुन भिमानदीचा देखावा सुंदर दिसतो. किल्ल्यामध्ये सुबक नक्षीकाम केलेली पाच मंदिरे आहेत. या मंदिरांपैकी लक्ष्मी नारायण मंदिर चांगल्या अवस्थेमध्ये आहे. या मंदिरांमध्ये अलंकृत स्तंभ तसेच बाहेरील मूर्ती सुंदर आहेत. साधारणता ११० एकरावर हा किल्ला पसरला आहे.

या किल्ल्यावरील काही ऐतिहासिक घटनांनी मराठीला दोन म्हणी देखील दिल्या -"आले मोठे पेडगावाचे शहाणे" आणि "येड पांघरूण पेडगावला जाणे"

त्याची कथा अशी की-

पेडगावचे शहाणे*


*६ जून १६७४,ला शिवराज्याभिषेक संपन्न झाला. ह्या अद्वितीय सोहळ्या साठी एकूण साधारण १ कोटी रुपये खर्च आला. हा खर्च राजांनी मुघलांकडून कसा वसूल केला ?*


*त्याची ही गमतीशीर हकीगत आणि गनिमीकाव्याचे एक उत्कृष्ट उदाहरण

*अहमदनगर जिल्ह्यात 'पेडगाव' नावाचं एक गाव आहे. तिथे बहादुरखान कोकलताश नावाचा औरंगजेबाचा महामुजोर सुभेदार होता. आपल्या शिवाजी महाराजांना अशी खबर मिळाली की २०० उच्च प्रतीचे अरबी घोडे आणि साधारण १ कोटी रुपये (तेव्हा होन ही मुद्रा होती, रुपये नव्हते) बहादुरगडावर आले आहेत. आणि तिच्या रक्षणासाठी मोठी फौजही तैनात आहे. ही सगळी मालमत्ता लवकरच दिल्लीस रवाना होणार आहे. आता महाराजांनी आज्ञा दिली की २००० चं सैन्य बहादुरगडावर चढाई करेल आणि ही सर्व लूट लुटून आणेल (बलाढ्य ऐवज आणि ते २०० उमदा अरबी घोडे).*

*कोणासठाऊक कशी पण खानाला ही बातमी समजली , तेव्हा तो मजूर्डा चेष्टेने हसत म्हणाला, "सिर्फ २००० मराठा मावळे ! उनके लिये तो किले के दरवाजे खोल दो. अंदर आतेही खदेड देंगे,काट देंगे."*

*तारीख १६ जुलै १६७४, पेडगावच्या त्या बहादुरगडातून मुघल सैन्याला दूरवर धूळ उडताना दिसली. घोडदौड येत आहे हे त्यांच्या लक्षात आले. धोक्याच्या तुताऱ्या वाजल्या आणि गडावर, आधीच तयार असलेली खानाची प्रचंड सेना सज्ज झाली. त्यांनी किल्ल्याचे दरवाजेही उघडले. जसे गाफील मावळे जवळ आले, तो लगेच खानाच्या सेनापतीने चढाईचा हुकूम दिला. अनपेक्षित पणे झालेल्या या प्रतिकाराने सगळे २००० मावळे बिथरले आणि जीव वाचवायला ते मागे फिरले पण त्यांचे घोडे जोरच पकडत नव्हते. मात्र खानाची संपूर्ण फौज जशी जवळ येऊ लागली, खूप जवळ आली तशी त्यांचे नशीबा बलवत्तर म्हणून घोड्यांनी वेग पकडला आणि मावळ्यांनी पाठ दाखवून मागे धूम ठोकली. बहादुरखान स्वतः त्यांच्या समाचारस मुघल सैन्याच्या पुढे होता. अनेक कोस ही घोडदौड चालत राहिली. कारण मावळ्यांच्या घोडदौडीतली भीती बहादूरखानास चेव आणीत होती. शेवटी मावळे पार पसार झाले, संपूर्ण २०००ची फौज वाचली खरी, पण आपले शिवबा हरले रे !*

*खानाच्या फौजेत एकच जल्लोष झाला. शिवाजीच्या फौजेला हरवून पळायला लावलं हे काही छोट काम नाहीच. शिवबांची फौज हरली, पळ काढला! ही जीत औरंगजेबास कळाल्यावर आपल्याला केवढे इनाम मिळेल ? ह्या आनंदात बहादूरखान छाती फुगवून घोड्यावरून डौलत डौलत परतत होता. तितक्यात सगळं सैन्य एकदम शांत झालं आणि डोळे विस्फारून दूरवर असलेल्या बहादुगडाकडे बघू लागलं. धुराचे मोठ मोठे लोट किल्ल्यातून बाहेर पडताना दिसत होते. खानाने भीतीने आवंढा गिळत किल्लेदाराला विचारलं, "अगर हम सब यहाँ हैं, तो किलेपर कौन है?" "कोई नही जहांपन्हा. आपकाही हुकुम था की सबने मिलकर शिवाजी के उन २००० मावलों पर चढ़ाई करनी है ". आता किल्लेदार, सेनापती, आणि स्वतः खानाचे धाबे दणाणले. कारण काय आक्रित झालं असणार ह्याचा त्यांना अंदाज आला. आणि त्याच सोबत छत्रपती शिवाजीराजे ही काय चीज आहे हे ही ध्यानात आलं.* *आणि ज्याची भीती खरी ठरली. एक घोडेस्वार दौडत आला, आणि , "हुज़ूर, गज़ब हो गया, हम सब लुट गए, बर्बाद हो गए. आप सब वहां २००० मराठाओं के पीछे दौड़े, और यहाँ किलेपर ७००० मराठाओंने हमला करके सब लूट लेके चले गए हुज़ूर!".*


याशिवाय, ह्याच बहादूरखानाला महाराजांनी तहाची बोलणी झुलवले होते, औरंगजेबाचे शाही फर्मान येईपर्यंत महाराजांनी आपले गडकोट मजबूत करुन ठेवले, राज्याभिषेक पार पाडला आणि फर्मान आल्यानंतर बहादूरखानाने महाराजांना सांगावा धाडल्यावर तुझी पात्रता ती काय असे म्हणत चांगलेच फटकारले होते.

*अशा प्रकारे राज्याभिषेकाचा खर्च एक कोटी ही वसूल, शिवाय २०० उच्चप्रतीचे अरबी घोडे छत्रपतींच्या ताफ्यात. आणि हे सगळ नाट्य घडलं एकही मावळा न गमावता, रक्ताचा एक थेंबही नसांडता.*

आता लक्षात आलं का ? की हे सगळं नाट्य घडलं कुठे, तर पेडगावला. खानाला वेड बनवलं ते त्या पेडगावात. आणि म्हणून, पेडगावचे शहाणे

आणि वेड पांघरून पेडगावला जाणे.(सौजन्य -आंतरजाल)


अशा या काळजाला यातना देणाऱ्या गडावर एक मंदिरही भारताच्या ऐतिहासिकपणाची साक्ष देत उभे आहे.'लक्ष्मीनारायणाचे मंदिर"!मंदिराच्या बाह्यभागातील कोरीव काम पाहूनच डोळ्याचे पारणं फिटले. खिडक्यांवरची विविध आकाराची नक्षी खुपच मोहक आहे. मंदिराभोवती भिंतीवर अनेक वराह, नृसिंह अवतार,विष्णू,भैरव व अग्नी ,वायू देव या मूर्तीही कोरल्या आहेत. अगदी भिंतीवरच्या इंच न इंच पूर्ण भरीव कोरीव मूर्तींनी भरलेला आहेत. मंदिराला तीन मोठमोठे,पायऱ्यांनी सजलेले प्रवेशद्वार आहेत. मंदिराच्या आतील चार खांब चौरंग, गोल, आयतकृती, तोरण असे  वेगवेगळे आकार एकमेकांवर कोरीव कामासह साकार झाले आहे .गाभऱ्यात कोणतीच मूर्ती मात्र नाही.


या मंदिरासमोरच शंकराचे कोरीव सभामंडप असलेले सुंदर मंदिर आहे. भीमेच्या तटावर चाफ्याच्या सुवासात मंदिरातील 'शिवलिंग ध्यानस्त.भासत शाहते.

भीमा नदीवर सध्या मात्र जलपर्णीची अवास्तव वाढ झाली आहे.


याच मंदिर परिसरात पुढे मल्लिकार्जुन हेही पुरातन मंदिर आहे. तसेच या भाग विविध मंदिरात अनेक वीरगळ, सतीशीळा आहेत.


अशा पद्‌धतीने मनाला त्या ५००-८००वर्षांच्या  जुन्या दगडांचा श्वास ऐकल्यावर प्रफुल्लित वाटले. परतीच्या वाटेवर असताना आता नेत्रकमळांनी चैत्र वैभव टिपायला नकळत सुरुवात केली. उन्हात-चांदणं टिपायला सुरुवात केली.


गुलाबी, शुभ्र पंचपाकळ्यांचा देवचाफा फांद्या फांद्यांवर गच्च फूलले होते. बहव्याचे पिवळे झुंबर वाऱ्याच्या झुळकीने डोलत राहिलेले. गुलमोहराच्या, पळसाच्या रक्तवर्ण शलाका उन्हाच्या धगीला सोबत करीत पसरल्या होत्या. शेवग्याचा बहर, लांब सडसडीत हिरव्या शेंगा झाडाला लटकून एकमेकांशी गप्पा मारत होत्या.


अशा फुलांच्या उत्सवात फळांचा गोडसर शाहीथाटही कमी नव्ह‌ता. श्रीगोंद्‌यातील पारगाव हे 'द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे. द्राक्षांच्या मांडवात

ऊन सावलीच्या नक्षीदार गालीचा पसरलेला असताना द्राक्षांच्या घडांनी वेली लगडलेल्या होत्या. वेलीवर निसर्गाची गोड किमया खुप आनंदित करुन गेली.


डाळिंबाची झाडे, कसलस पांढरं कापड पांघरून वर ओढून होती. कदाचित उन्हापासून संरक्षणासाठी ते असेल .आंब्यासा झाडांची - त्यांच्यावर पिकणाऱ्या पाडाची तर मोजदातच करता येणार नाही .उन्हाळ्याचा राजा' आंबा काही काळातच आता जोमात सगळीकडे 

मिरवणार, उन्हाळ्याचे वैभव आता शिगेला पोहचणार..

-भक्ती

Wednesday, April 16, 2025

खेळ मांडीयेला-भातुकलीचा खेळ
















#खेळमांडीयेला
#भातुकली
#दीपालीकेळकर 
#उज्वलाढमढेरे
#विलासकरंदीकर
लेकीला म्हटलं "आज आपल्याला भातुकलीचा खेळ पाहायला जायचं आहे" ती म्हणाली "भातुकलीचा खेळ म्हणजे काय?"

मनात‌ल्या मनात म्हणाले की "एका भातुकलीच्या खेळाची किंमत तुम क्या जानो, जेनझी(generation z)"

तिला म्हणाले "अंग किचन सेट पाहायला जायचय"

" ओके , बार्बीपण असेल का तिथे ?"
"चल तुला ठकीच आणते"😉
ती आपली शांतपणे माझ्याकडे पाहत होती आणि मी शांतपणे 'भातुकली 'शब्दाचा वनवास आजच्या काळात अनुभवत होते भातुकलीच्या विचाराने मन भूतकाळात गेले.
मी लहानपणापासूनच शांत, एकटीच रमणारी हे सांगतांना नेहमी म्हणायची "आमची भक्ती, बाहेर खेळायला जा सांगितले तरी ती जायची नाही. तिची भातुकली ती फ्रॉकमध्ये भरून या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात मांडत दिवसभर घरातच एकटीच खेळायची." असं ती सगळ्यांना सांगायची 😂

"अच्छा, माझ्या इंट्रोव्हर्ट पणाचा  उगम इथपासून आहे तर" अशा विचार मनात येऊन मी हसत राहिले. 😊😘

 उज्वला ढमढेरे यांनी मेहनतीने वेगवेगळ्या ठिकाणाहून सुंदर अशी वेगवेगळ्या भातुकलीचे खेळ जमवले आहेत.अगदी सोन्या चांदीचीही भातुकली त्यात आहे. मातीच्या भातुकली अतिशय सुबक होती तांब्याची पितळाची भातुकलीतली विळी, पाण्याची भांडी विविध आकारतली  छोटी मोहक वाटत होती. कागदाची, पानांची,कापडी पर्यावरण पूरक ‌भातुकलीही होती.

 भातुकलीतले बंब, सूप ,घंगाळे,चूल, पाण्याचे फिल्टर ,तीन ताळी डबा होते. स्टील, प्लास्टिक भातुकलीचे खेळ खूप प्रकारची होते.

प्रदर्शन पाहायला जायच्या आधी भातुकलीविषयी आंतरजालावर माहिती शोधत होते. तेव्हा भातुकली वरच चक्क एक अनोखचं पुस्तक दिसलं .दिपाली केळकर यांनी अभ्यासपूर्ण नजरेतून अनेक
मान्यवरांच्या भातुकलीच्या विविधांगी विचारांचा समावेश 'खेळ मांडीलेया' हे पुस्तक लिहिले आहे. या भातुकलीच्या खेळाचे प्रसिद्ध संग्राहक विलास करंदीकर यांच्याकडे जवळपास ३००० भातुकलीचे खेळ होते. ज्याची लिम्का बुकमध्येही दखल घेण्यात आली. या पुस्तकात या अवलियांची-
विलास करंदीकर आणि उज्वला ढमढेरे यांचीही मुलाखत आहे.. ज्यांनी वाढता वाढता वाढे अशा पद्धतीने बहुविध भातुकलीचा संसार कष्टाने प्रचंड मोठा केला आहे.
मग या पुस्तकाविषयी अजून काही माहिती शोधताना, दिपाली केळकर यांचे 'खेळ मांडीयेला' पुस्तकावरचे एक व्याख्यान ऐकायला मिळाले. या पुस्तकाची अनुक्रमणिका पाहिला असता लक्षात येईल की भातुकली खेळ के मुलांच्या मनोविश्वात डोकावण्याचा खेळच आहे. पुस्तकातील "काही काही गंमतीशीर, सखोल गोष्टी खुप मनोरंजक आहेत."मोठ्यांच्या ज‌गात डोकावण्यासाठी दिलेला  दरवाजा म्हणजे भातुकली "-माधवी पुरंदरे 
राजीव तांबे सांगतात, भातुकली एकटीने, किंवा सवंगडी जमवून किंवा कुटुंबातील व्यक्तीची भूमिका घेऊन लहान मुले खेळतात, जणू पुढील संसाराची सरावच भातुकली आहे.

भातुकली खेळ नेहमी मुलींनाच भेट देऊन, मुलगा-मुलगी असमानता दर्शव‌ली नकळत वाढत जाते, अशावेळी मुलग्यालाही भातुकली देऊन स्वयंपाकाची कला त्यालाही लहानपणापासून देता येईलच. अशाप्रकारे अनेक मान्यवरांचे भातुकली खेळाचे विचार समजून
घेत असतानाच, अगदी विश्वनिर्मितीचे अध्यात्मिक विचार भातुकलीच्या खेळाशी धागे अलका मुतालिक या  जाणकारांनी उलगडले आहे. इतक सुंदर भातुकलीवस्व पुस्तक वाचायची उत्सुकता आता वाढली आहेच पण पुन्हा लहानग्या भाच्याला भातुकलीचा खेळ भेट देऊन भातुकलीचा वसा पुढे देत राहण्याची इच्छा लवकर पूर्ण करायची आहे. तुमच्या काही आठवणी भातुकलीच्या ?
-भक्ती
खेळ मांडीयेला -अनुक्रमणिका

१) गोष्ट भातुकलीच्या राजाची 
२) भातुकली १८ प्रकारची
३) निर्मिती भातुकलीची आणि भांड्यांची
४) भातुकलीच्या राज्यात (मान्यवरांच्या नजरेतून भातुकली) 

-डॉ. गो. बं. देगलूरकर भातुकलीम्हणजे आपली संस्कृती 

-प्रतिभा रानडे
भातुकलीचा इतिहास आधुनिक स्वरूपात यायला हवा

-वामनराव देशपांडे भातुकली खेळणं हा भाग्यकुंडलीतला योग 

-डॉ. माधवी वैद्य
नाट्यकलेचा उगम भातुकलीत

-शोभा भागवत
भातुकली एक शांत खेळ

-हेमा लेले भातुकली खेळाला विविध कंगोरे 

-माधुरी पुरंदरे
 भातुकलीच्या माध्यमातून घडतं भाषाशिक्षण

राजीव तांबे
-भातुकली म्हणजे जगण्याचा सराव

-नरेंद्र लांजेवार 
मुलांचं भावविश्व समृद्ध करणारी भातुकली

-शुभदा चौकर
आत्मनिर्भर होण्यासाठी पहिली पायरी म्हणजे भातुकली

-आश्लेषा महाजन भातुकली म्हणजे स्वतःचा अवकाश शोधणं 

-आसावरी काकडे सर्जनशीलतेला वाव देणारा खेळ

-अविनाश बिनीवाले
भातुकली कालबाह्य होत आहे

-अविनाश धर्माधिकारी
व्यवस्थापन कौशल्य शिकवणारा खेळ

-डॉ. संजय उपाध्ये
लहान मुलांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा मार्ग

-स्वाती चांदोरकर
बालपणीच्या आठवणी मोठं सुख

-प्रज्ञा कुलकर्णी भातुकली म्हणजे संस्कार

-सुहासिनी कीर्तिकर
बालपण भारून टाकणारा खेळ

-डॉ. अनुपमा उजगरे बिनभांड्यांची भातुकली

-डॉ. सिसिलिया 
हरपले श्रेय

-प्रवीण दवणे
भातुकली : स्वप्नांची पाऊलवाट

*संतसाहित्य आणि भातुकली तसेच इतर खेळ

-डॉ. रामचंद्र देखणे
खेळ ही अध्यात्मातील मध्यवर्ती कल्पना

-अलकाताई मुतालिक
अंतःकरणाची मशागत करणारा खेळ भातुकली

-सीमा गोखले
संतांच्या नजरेतून भातुकली आणि तत्सम खेळ

*डॉक्टरांच्या दृष्टिकोनातून भातुकली

-डॉ. स्नेहलता देशमुख नव्या-जुन्याची सांगड हवी

-डॉ. वैजयंती खानविलकर
भातुकलीप्रमाणेच मैदानी खेळही महत्त्वाचे


Thursday, April 3, 2025

लोकमान्य(होमरूल -स्वराज्य संघ)

 #लोकमान्य

#होमरूल -स्वराज्य संघ






१८८८ ला स्थानिक परिषदेतून टिळक कॉंग्रेसमध्ये आले.कर्झनच्या अन्यायकारी बंगालच्या फाळणीच्या कारस्थानानंतर कॉंग्रेसमध्ये जहाल मतवाद्यांची फळी त्यांनी प्रस्थापित केली.परंतू जहाल -मवाळ वादात जहाल मतवाद्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले,कॉंग्रेस फुटली.पुढे टिळकांना पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश मिळावा यासाठी ॲनी बेझंट यांनी प्रयत्न केले.त्यांनी दुभंगलेल्या कॉंग्रेसला जोडण्याचे नेहमी प्रयत्न सुरू ठेवले.


होमरूल ध्वज -
पाच लाल आणि चार हिरव्या आडव्या पट्टे. वरच्या डाव्या चौकोनावर संघ ध्वज होता , जो चळवळ ज्या अधिराज्याचा दर्जा प्राप्त करू इच्छित होती त्याचे प्रतीक होता. वरच्या बाजूला पांढऱ्या रंगात एक चंद्रकोर आणि सात टोकांचा तारा आहे. हिंदूंसाठी पवित्र असलेल्या सप्तर्षी नक्षत्रात ( उर्सा मेजर नक्षत्र ) सात पांढरे तारे मांडलेले आहेत 

ॲनी बेझेंट या थिऑसफी(थियोसोफिया म्हणजे दैवी ज्ञान, म्हणजेच जाणीवेची अशी अवस्था ज्यामध्ये ऋषी किंवा गूढवादी त्याच्या मनाच्या पलीकडे जातो आणि सत्याची थेट, अव्यवस्थित, धारणा प्राप्त करतो. हा थियोसोफीचा प्राथमिक अर्थ आहे.) प्रसारासाठी भारतात आल्या होत्या.त्यांनी १८९८ ला बनारस (आता वाराणसी) येथे सेंट्रल हिंदू स्कूल आणि कॉलेजची स्थापना केली . काही वर्षांनंतर तिने सेंट्रल हिंदू स्कूल फॉर गर्ल्स सुरू केली .त्या कॉंग्रेसच्या अधिवेशनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष (१९१७) म्हणूनही ओळखला जातात.

ब्रिटिश अंमलाखालील आयरिश देशात होमरूल चळवळ यशस्वी होती.त्या पार्श्वभूमीवर भारतात अशी चळवळ सुरू होण्यासाठी टिळक आणि अॅनी बेझंट यांचे योगदान आहे.टिळकांनी मंडालेच्या सुटकेनंतर १९१६ ला बेळगाव येथे होमरूल चळवळ उर्फ स्वराज्य संघ यांची अनुयायांच्या मदतीने स्थापना केली.तसेच बेझंट यांनाही मद्रास येथे दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेखाली होमरूल लीगची ची स्थापना केली.

या दोन्ही चळवळी स्वतंत्रपणे परंतु भारताच्या स्वतंत्रपणाच्या हक्कासाठी लढत होत्या.

टिळकांचा पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश बेळगाव येथे झाला.पुढे लखनौ सभेत याच होमरूल चळवळ प्रमाणे स्वराज्याची मागणी मंजूर करण्यात आली.

त्याकाळातील या स्वराज्याच्या मागणीमुळे टिळकांवर राजद्रोह खटला दाखल केला पण तो नंतर रद्द करण्यात आला.अॅनी बेझंट यांनाही मुंबई येथे डिफेन्स ॲक्ट नुसार येण्याची बंदी घातली  तर नंतरमद्रास येथे आल्यावर अटक करण्यात आली.पण लोकप्रियतेमुळे त्यांची लवकर सुटका झाली.


दरम्यान महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताला युद्धोत्तर स्वतंत्र हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे याची जाणीव दोन्ही होमरूलच्या गटांना आलीच होती.

१९१८ ला स्वतंत्रपणे इंग्लंडमध्ये विविध प्रकारच्या मागणीसाठी हे दोन्ही होमरूल गट गेले.परंतू टिळकांच्या राष्ट्रहिताच्या गोष्टींना डावलून बेझंट यांचे विधायक ब्रिटिश पार्लिंमेंटमध्ये पुढे गेले.टिळकांनी खुप समजावूनही बेझंट यांनी एकत्र विधायक सादर करण्याचे मान्य केले नाही.

यामुळे दुरावा निर्माण झाला.याचा समाचार टिळकांनी केसरीतून घेतलाच होता.


होम रूल चळवळ (Home Rule Movement, १९१६–१९१८)

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाची राजकीय चळवळ, जी लोकमान्य टिळक आणि अॅनी बेझंट यांनी स्वराज्याची मागणी करण्यासाठी सुरू केली.  


---

१. पार्श्वभूमी आणि उद्देश:

- कारण:ब्रिटिश सरकारच्या अधिकाराविरुद्ध निष्क्रियतेमुळे (उदा., १९०९ च्या मॉर्ले-मिंटो सुधारणांचा अपयश) नव्या चळवळीची गरज निर्माण झाली.  

- उद्देश: 

  - "होम रूल" (Self-Government)मिळवणे, म्हणजे ब्रिटिश साम्राज्यातील डोमिनियन स्टेट (कॅनडा/ऑस्ट्रेलियासारखे).  

  -कायदेशीर मार्गाने जनजागृती करून ब्रिटिशांवर दबाव निर्माण करणे.  


---२. प्रमुख नेते आणि संस्था:

अ) लोकमान्य टिळकांची होम रूल लीग (एप्रिल १९१६, पुणे)

- क्षेत्र:महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रांत.  

- घोषणा:"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे!"*  

- पद्धती:जनसभा, वृत्तपत्रे (केसरी), सार्वजनिक प्रबोधन.  


- अॅनी बेझंटची होम रूल लीग (सप्टेंबर १९१६, मद्रास

- क्षेत्र:बंगाल, युनायटेड प्रॉव्हिन्सेस, दक्षिण भारत.  

- पद्धती:व्याख्याने, पुस्तिका (इंग्रजीमध्ये), युवकांना संघटित करणे.  


-३. चळवळीची वैशिष्ट्ये:

1. कायदेशीर आणि शांततापूर्ण मागणी (क्रांतिकारक चळवळीपेक्षा वेगळी).  

2. महिला आणि युवकांचा सक्रिय सहभाग(उदा., सरोजिनी नायडू, जवाहरलाल नेहरू युवावस्थेत सामील झाले).  

3. ब्रिटिशांवर दबाव पहिल्या महायुद्धात (१९१४–१८) ब्रिटनच्या अडचणीचा फायदा घेऊन स्वराज्याची मागणी.  


४. ब्रिटिश प्रतिक्रिया आणि दडपशाही:

- टिळकांवर बंदी: १९१६ मध्ये त्यांच्या भाषणांवर बंदी आणि राजद्रोहाचा खटला (पण शिक्षा झाली नाही).  

- अॅनी बेझंटला अटक: जून १९१७ मध्ये त्यांना नजरकैदेत ठेवले, पण लोकप्रियतेमुळे सोडवण्यात आले.  


५. यश आणि परिणाम:  

1. १९१९ च्या मॉन्टेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा:होम रूल चळवळीमुळे ब्रिटिशांना भारताला मर्यादित स्वायत्तता देण्यास भाग पाडले.  

2. गांधीयुगाचा पाया:ही चळवळ महात्मा गांधींच्या असहकार आणि सविनय कायदेभंग चळवळीला (१९२०) प्रेरणा दिली.  

3. जनतेत राजकीय जागृती:स्वराज्याची कल्पना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली.  


६. मर्यादा: 

- काँग्रेसचे पूर्ण समर्थन नव्हते(उदा., मध्यमवर्गीय नेते गोपाळ कृष्ण गोखले यांना टिळकांच्या आक्रमक पद्धतीवर आक्षेप होता).  

- १९१८ नंतर ओहोटी: गांधींच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळीने होम रूलचे स्थान घेतले.  


---

संदर्भ आणि पुष्टी:  

- "India’s Struggle for Independence" – बिपन चंद्र (होम रूल चळवळीवर विस्तृत विवेचन).  

- "लोकमान्य टिळक" – डी.डी. कीर(टिळकांच्या भूमिकेचे विश्लेषण).  

- केसरी (१९१६–१८) चे अंक – टिळकांचे लेख आणि भाषणे.  


होम रूल चळवळ ही भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक पूल होती, ज्याने उग्रवाद आणि अहिंसा यांना जोडले. टिळक-बेझंट यांच्या या प्रयत्नांमुळेच १९२० पर्यंत "पूर्ण स्वराज्य"ची मागणी पुढे आली.

-संदर्भ

-लोकमान्य एकमेव (लोकसत्ता प्रकाशित १९२०)

-अड्यार टीएस

-त्रिमूर्ती केसरी

-ए आय माहिती स्त्रोत 

-फोटो-लोकमान्य आर्चिव्ह

Wednesday, April 2, 2025

लोकमान्य (राजद्रोह खटला)

 #लोकमान्य

#राजद्रोहखटला



टिळकांच्या या खटल्यापूर्वीच भारतीय लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक दमनाची प्रशासकीय आणि कायदेशीर चौकट ब्रिटिशांनी उभारून ठेवली होती. जी कुठली घडामोड ब्रिटिशांच्या मते त्यांचे भारतावरील नियंत्रण नाकारू पाहणारी ठरू शकेल, त्यामागील व्यक्तींवर 'राजद्रोहा'चे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार वाढत होते. ब्रिटिश सरकारविषयी तिरस्कार वाढविणारे, त्या सरकारचा अवमान करू पाहणारे किंवा त्या सरकारविषयी अप्रीती निर्माण करू पाहणारे कोणतेही वर्तन 'राजद्रोह' ठरविले जाऊ शकत असे.


टिळकांवर हा राजद्रोहाचा आरोप एकंदर तीनदा ठेवला गेला. पहिल्यांदा १८९७ मध्ये, नंतर १९०८ आणि लगेच १९१६ मध्ये.


१. १८९७ चा राजद्रोह खटला (पहिला खटला):

-कारण: १८९७ मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीमुळे ब्रिटिश सरकारने जोरजबरदस्तीचे उपाय (घरफोडी, जबरदस्ती हस्तांतरण इ.) केले. याविरुद्ध टिळकांनी 'केसरी' वर्तमानपत्रात तीव्र लेख लिहिले. त्यांनी प्रसिद्ध केलेला "शिवाजीची गुरिल्ला युद्धपद्धती" हा लेख ब्रिटिश सरकारला राजद्रोही वाटला.  

-आरोप: भारतीय दंडसंहितेच्या १२४A कलमाखाली (राजद्रोह) आणि १५३A (धार्मिक तणाव निर्माण करणे) अंतर्गत खटला चालवण्यात आला.  

- निकाल:टिळकांना १८ महिन्यांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आणि त्यांना मंडाले (बर्मा) येथील तुरुंगात पाठवण्यात आले.  


२. १९०८ चा राजद्रोह खटला (दुसरा खटला):  

- कारण:१९०८ मध्ये बंगालच्या क्रांतिकारकांनी खून केल्याच्या प्रयत्नांना टिळकांनी केसरीमध्ये समर्थन दर्शविले. त्यांच्या "अन्यायाचा परिणाम हिंसाचार होतो" या लेखामुळे ब्रिटिश सरकारने पुन्हा राजद्रोहाचा आरोप टाकला.  

- खटल्याची प्रक्रिया:हा खटला बॉम्बे हायकोर्टात चालविण्यात आला. टिळकांनी स्वतःच बचाव केला, परंतु न्यायाधीश डी.डी. डेव्हिडसन यांनी त्यांना दोषी ठरवले.  

- शिक्षा: यावेळी त्यांना ६ वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली गेली आणि पुन्हा मंडालेच्या तुरुंगात पाठवण्यात आले.  

- परिणाम:या शिक्षेमुळे भारतभर हलचल निर्माण झाली. महात्मा गांधी, गोपाळ कृष्ण गोखले यांसारख्या नेत्यांनी टिळकांच्या सुटकेसाठी आवाज उठवला. १९१४ मध्ये सक्तमजुरीची शिक्षा पुरी झाल्यानंतर टिळक सुटले.  


ऐतिहासिक महत्त्व:

- टिळकांच्या या खटल्यांमुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीला गती मिळाली.  

- "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" हा टिळकांचा घोष या काळात प्रसिद्ध झाला.  

- ब्रिटिश सरकारच्या राजद्रोह कायद्याविरुद्ध (१२४A) भारतीयांमध्ये जागृती निर्माण झाली.  


टिळकांच्या या संघर्षामुळे भारतीय जनतेत स्वातंत्र्याची भावना दृढ झाली आणि त्यांना *"लोकमान्य"* (जनतेने मान्यता दिलेला नेता) ही पदवी मिळाली.

आपले निरीक्षण बरोबर आहे. १९१६ मध्ये लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा (Sedition) खटला चालविण्यात आला होता, ही माहिती अनेक ऐतिहासिक स्रोतांमध्ये उपलब्ध आहे. हा खटला प्रसिद्ध "केसरी" वर्तमानपत्रातील लेख आणि होम रूल लीगच्या चळवळीदरम्यानच्या भाषणांवर आधारित होता.  


---


१९१६ चा राजद्रोह खटला: माहिती

1. पार्श्वभूमी:

   - १९१६ मध्ये टिळकांनी होम रूल लीगची स्थापना केली आणि "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" या घोषणेसह जनजागृती केली.  

   - त्यांची भाषणे आणि केसरीमधील लेख ब्रिटिश सरकारला राजद्रोही वाटले.  


2. आरोप:  

   - भारतीय दंड संहितेच्या कलम १२४अ (राजद्रोह) अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली.  

   - त्यांच्या पुणे आणि मुंबईतील भाषणांमध्ये ब्रिटिश सरकारविरुद्ध उद्गार टाकल्याचा आरोप होता.  


3. खटल्याची प्रक्रिया:  

   - ब्रिटिश सरकारने त्यांच्या भाषणांवर बंदी घातली आणि केसरीवर सेंशन लागू केले.  

   - परंतु, या वेळी टिळकांना कारावासाची शिक्षा झाली नाही, कारण त्यांनी कायदेशीर पद्धतीने चळवळ केली होती आणि ब्रिटिश न्यायालयातून तात्पुरती सुटका मिळाली.  


4. परिणाम:  

   - हा खटला १९०८ च्या खटल्यापेक्षा कमी गंभीर होता, पण त्यामुळे टिळकांच्या स्वराज्य चळवळीला आणखी प्रसिद्धी मिळाली.  

   - १९१९ मध्ये मॉन्टेग्यू-चेम्सफर्ड सुधारणांनंतर ब्रिटिश सरकारने राजद्रोह कायद्यावर माफी जाहीर केली.  


---


ऐतिहासिक संदर्भाची पुष्टी  

- "The Trial of Tilak" (१९०८ आणि १९१६)– प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी टिळकांच्या राजद्रोह खटल्यांचा उल्लेख केला आहे.  

- "Keer’s Biography of Tilak" – डॉ. डी.डी. कीर यांनी १९१६ मध्ये टिळकांवरील खटल्याचा उल्लेख केला आहे.  


-निष्कर्ष

- १९१६ मध्ये टिळकांवर राजद्रोहाचा खटला होता, पण त्यांना शिक्षा झाली नाही.  

- हा खटला होम रूल चळवळीशी निगडीत होता आणि ब्रिटिश सरकारने त्यांच्या भाषणांवर बंदी आणली.  

- १९०८ च्या खटल्यापेक्षा हा कमी गंभीर होता, परंतु त्यातून टिळकांची "कायदेशीर स्वातंत्र्यलढा" ची भूमिका स्पष्ट झाली.  


१९०८ ला दोन लेखांबद्दल टिळकांना अटक झाल्यानंतर त्यांची जामिनाविषयीची सुनावणी न्या. दावर नामक न्यायाधीशांपुढे झाली. एक प्रकारे न्यायाधीशांसाठीच्या वर्तनसंकेतांचा भंग ठरणारी बाब म्हणजे याच न्या. दिनशॉ दावर यांनी टिळकांवरील त्यापूर्वीच्या राजद्रोह खटल्यात १८९७ मध्ये टिळकांची बाजू मांडणारे वकील म्हणून काम केले होते. त्या खटल्यात अॅडव्होकेट दावर यांनी मोठ्या हिकमतीने टिळकांसाठी जामीन मिळविला होता आणि जामिनाचा तो निकाल पुढेदेखील अनेक स्वातंत्र्यसैनिकांना जामीन मिळवून देण्यास आधारभूत ठरलेला होता. मात्र १९०८ च्या खटल्यात या न्यायाधीश महोदयांनी आपणच १८९७ सालच्या खटल्यात टिळकांना जामीन मिळवून देण्यासाठी केलेले युक्तिवाद नामंजूर ठरविण्याचा मार्ग चोखाळला. त्याहून खेदाची बाब अशी की, त्यांच्या या निकालाने त्यापुढील काळात स्वातंत्र्यसैनिकांचे जामीन नाकारण्याचा धोकादायक पायंडा पडला.


 कुणाकडे वकीलपत्र न देता टिळकांनी स्वतःची बाजू स्वतःच मांडण्याचे ठरविले. 


टिळकांवरील या खटल्याची सुनावणी सुरू होताच प्रश्न आला तो ज्यूरीच्या निवडीचा. खटल्याच्या वेळी न्यायाधीशांखेरीज पंचांसारखे ज्यूरी नेमण्याची ही पद्धत ब्रिटिशकालीन होती. ती स्वातंत्र्योत्तर काळात थांबविण्यात आली. न्यायाधीशांचे समकालीन आणि सहकारी असे लोक ज्यूरी म्हणून नेमले जात. टिळकांच्या खटल्यात मात्र ब्रिटिश सरकारने निराळा अर्ज करून ज्यूरी-निवडीची पद्धत या खटल्यापुरती बदलून 'विशेष ज्यूरी' नेमावेत आणि त्यांची निवड ही 'मालमत्ता, प्रतिष्ठा आणि शिक्षण' यांआधारे व्हावी हे ठरले.तेव्हा सात युरोपीय आणि दोन पारशी ज्यरींची उच्चशिक्षित असल्याने नेमणूक झाली.


खटल्याची सुनावणी दोन गंभीर विसंगतींनी पुरेपूर भरलेली असल्यामुळे हे अख्खे कामकाज विषमताधारित ठरते, अशा अर्थाचा मुद्दा मांडताना टिळकांनी दोन बाबींकडे लक्ष वेधले. आरोप ज्यांबद्दल केले गेले, ते दोन्ही लेख आपली मातृभाषा असलेल्या मराठीत आपण लिहिले आणि ते अन्य मराठीभाषकांनी वाचावेत यासाठी लिहिले; असे असताना त्या लेखांचा मराठीभाषकांवर परिणाम 'राजद्रोह' ठरतो की नाही, याचा निवाडा करण्याचे काम मात्र मराठी भाषेशी, त्यातील संदर्भाशी आणि या भाषकसमूहाच्या आयुष्यक्रमाशी तसेच राहणीशी काहीही संबंध नसलेले युरोपीय आणि पारशी ज्युरी करीत आहेत. याखेरीज मूळ लेखांवरूनइंग्रजीत आणवलेल्या ज्या तर्जुम्यांवर पूर्णपणे विसंबून राहून ज्युरी त्यांचे मत बनविणार आहेत, ते खर्डे कामचलाऊ आणि अर्धकच्चे असून, मूळ लेखाच्या म्हणण्याशी त्या भाषांतराचा काहीएक संबंध नाही, असाही युक्तिवाद टिळकांनी केला.


दुसरा मुद्दा टिळकांनी मांडला तो इंग्लंडमधील अनेक खटल्यांतून संपृक्त होत गेलेल्या 'केस लॉ'विषयीचा होता. राजद्रोहाबाबतच्या इंग्लिश 'केस लॉ'चे अनेक संदर्भ देऊन टिळकांनी असे म्हणणे मांडले की, आपल्या कृतीस पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचे संरक्षण आहे. हा महत्त्वाचा मुद्दा नामंजूर करताना ब्रिटिश सरकारने, भारतीय न्यायालयांमध्ये इंग्लंडमधील 'केस लॉ' लागू ठरत नाही, अशी भूमिका मांडली आणि म्हणून टिळक दोषीच ठरतात, असेही म्हणणे मांडले. यातून न्यायिक मानकांमधील तफावत दिसून आली.


वासाहतिक काळातील फौजदारी कायदेव्यवस्था ही दमनकारीच होती हे गृहीत धरले तरी त्या संदर्भातसुद्धा अयोग्य आगळीकच ठरावी, अशी एक सूचना न्यायाधीशांनी या खटल्यातील ज्युरींना केली... ती म्हणजे- टिळकांच्या शब्दांचा सर्वांत धोकादायक अन्वयार्थ कोणता लागू शकेल हे त्यांनी सांगावे. टिळकांच्या युक्तिवादाचे काय होणार, हे जणू ठरलेलेच होते आणि तसेच झाले. सर्व युरोपीय ज्युरींनी टिळकांना राजद्रोहाबद्दल दोषी ठरविले. ज्युरींतील दोघा पारशी सदस्यांनी त्यास असहमती दर्शविली. परंतु अल्पसंख्यांची असहमती म्हणून ती कुठल्या कुठे वाहून गेली.


टिळकांचे दोषी ठरणे हे ब्रिटिश अंमलाखाली भारतीयांना 'दुय्यम नागरिका'सारखेच वागविले जाणार, याचीच पुन्हा आठवण देणारे होते. याचे कारण असे की, ब्रिटनमध्ये राजद्रोहासारख्या गंभीर आरोपाविषयी सर्वच्या सर्व ज्युरींनी एकमुखी निर्णय दिला तरच खटला निर्णायक अवस्थेला जाई. टिळक खटल्याबाबत तसे न होताच न्यायाधीशांनी निर्भर्त्सनायुक्त शब्द वापरत, टिळकांची रवानगी सहा वर्षे ब्रह्मदेशात करावी, अशी शिक्षा सुनावली. ही शिक्षा त्या न्यायालयाच्या इतिहासातील सर्वाधिक कठोर होती.

शेवटी टिळकांनी लोकांना उद्देशून केलेले विधान आजही मुंबई हायकोर्टाच्या त्या दालन क्रमांक ४३ बाहेर कोरलेले आहे.

ते विधान सदर फोटोत दिले आहे.

-संदर्भ-लोकसत्ता  -एकमेव लोकमान्य या लोकमान्य स्मृतिशताब्दी अंकातून साभार आणि खटल्यांची माहिती AI कडून 

हा अंक ऑडिओ स्वरूपात स्टोरीटेल ॲपवर ऐकू शकता.

I would like to give you a tip about a story on Storytel:


https://www.storytel.com/in/series/loksatta-ekmev-lokmanya-50771?appRedirect=true